कळी
कळी


कळीचे फूल कसे झाले?. .मनात आलेला प्रश्न चिमुरडीला काही शांत बसू देईना. तिने आईला विचारले. .
"आई!. संध्याकाळी वेलीवर एक लहान कळी होती. रात्री आपण सारेच निवांत झोपलो होतो. मग या कळीचे फूल झाले कसे?. कुणी बरे एवढे सुंदर फूल निर्माण केले.. "
आईला मुलीचा प्रश्न समजला, परंतु उत्तर काही देता आले नाही. अन् उत्तर दिल्याशिवाय मुलगी काही गप्प बसणार नाही. मग उत्तर द्यायचे म्हणून तिने दिले. .
"बाळा!. ते नैसर्गिक असते. कुठल्याही वृक्षवेलींना फळे फुले येतच असतात. आता सुंदर फूल आहे. तेच संध्याकाळी कोमेजून जाणार. ."
आईच्या उत्तराने मुलगी हिरमुसली. तिला रडू कोसळले. आईलाही नक्की समजले नाही. माझ्या उत्तराने ही रडायला का लागली?. .
"छकुली!. काय गं?. काय झाले?. ."
छकुली डोळे पुसतापुसता म्हणाली. .
"एक दिवस बाबाही मला म्हणाले होते. किती गोड आहे नाजूक फुलासारखी. मग मीही कोमेजणार का?. ."
"बाबांनाच विचार?. ."
अन् आई घरात निघून गेली.