अलक
अलक
अलक ६
शिर्षक:- भिकारी
पायरीवरच्या भिकार्यांना चुकवत तो तोर्यातच मंदिराच्या गाभार्याकडे वळला. पाठमोरी अालेल्या कुजबुजण्याने तो पुरता वरमला. .
"पहिले आत जाऊन, त्याला मागू दे मुबलक. मग देईल कदाचित आपल्याला क्षुल्लक. ."
अलक ७
शिर्षक:- कन्या
तो:- चल पळून जाऊ. बसू दे घरच्यांना बोंबलत. .
ती:- नको !. माझ्या घरात गर्भातच मुली मारल्या जातील. .
अलक ८
शिर्षक:- मनात जागा
"नाना कुणाकडे थांबणार
आहात ?. .की रात्रीच्या गाडीने माघारी फिरणार आहात. ."
आठशे किमीचा प्रवास करून, फक्त थ्री बीएचकेच्या वास्तू पुजेला नाना आले होते. .
अलक ९
शीर्षक:- मिटींग
अत्यंत महत्वाची मिटींगसाठी तो अत्यंत घाईने निघाला. पंधरा मिनीटात पोहचायचे होते. .
तो पंधरा मिनीटात पोहचला पण हाॅस्पिटलमध्ये, तेही पंधरा दिवसांसाठी. .
अलक १०
मुलीवर जावयाने हात उचलला, प्रहार याच्या काळजावर झाला. सासरा का आयुष्यभर त्याच्याशी नीट वागला नाही. ते आता त्याला समजले. .