Independence Day Book Fair - 75% flat discount all physical books and all E-books for free! Use coupon code "FREE75". Click here
Independence Day Book Fair - 75% flat discount all physical books and all E-books for free! Use coupon code "FREE75". Click here

Prabhakar Pawar

Tragedy Inspirational Others


4.0  

Prabhakar Pawar

Tragedy Inspirational Others


अलक

अलक

1 min 446 1 min 446

अलक १


"तो आणि त्याची बायका मुलं, हेच विश्व समजून तो जगला. आई वडीलांना शब्दात विचारले नाही. ."


त्याचा आज्ञाधारी मुलगा तसेच जगतोय. शेवटी त्याचेच रक्त होते. .


अलक २


"अहो काका. ."

तळपायाची आग मस्तकात घेऊन मागे वळून पाहिले त्याने, दाढमिशातून आवाज आला होता. कालपरवा पर्यंत ही गाभरं दादा बोलायची. घुश्यातच पुढे चालत असता मोबाइल मेसेज रिंग वाजली. मेसेज वाचतांना चेहर्‍यावर स्मितरेषा झळकली. .


चाळिसाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा होत्या. .


अलक ३


बारावीला नव्वद टक्के मार्क्स मिळाले मुलाला. पण बाप हुंदका आवरेना आणि मुलगा फोटोतल्या हाराखालून हसत होता. .


अलक ४


"काकू एव्हढे बाराशे रूपये खर्च केलेस डाॅक्टरला. त्या मोटारसायकलवाल्या मुलांच्या कडून पैसे घ्यायचे ना. जसा काय रस्ता बापाचा समजता ?. वयस्कर माणसाला उडवून गेले. ."


"असू दे रे !. .माझीही नातवंड गाड्या फिरवतात. ."


अलक ५


गावात बावीस मुलामुलींची लग्न जमली. हीच्या दोन तरूण मुलींची लग्न जमता जमेना. .तरी ती आनंदात होती. .


कारण बावीस दिवस जेवणाचा प्रश्न संपला होता. .


Rate this content
Log in

More marathi story from Prabhakar Pawar

Similar marathi story from Tragedy