STORYMIRROR

Prabhakar Pawar

Tragedy

3  

Prabhakar Pawar

Tragedy

परतीचा पाऊस

परतीचा पाऊस

1 min
209

आज केले पावसाने, अन्न माती मोल सारे

पाठराखण कोण करतो, पोपटाचे बोल सारे


पावसाची सर नव्हे ती, तप्त धातू धार होती

छिद्र केले काळजाला, आसवांचे ओल सारे


घाम माझा व्यर्थ गेला, काय खावे लेकरांनी

वेदनाही आर्त झाली, दु:ख गेले खोल सारे


छत जगाचे फाटलेले, दूरवर पाणी साचलेले

कोण घेतो आसर्‍याला, सर्व दिसते गोल सारे


आमचेही बापजादे, हारले ना संकटांना

रक्त माझे तेच आहे, पेलतो मी तोल सारे


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy