Prabhakar Pawar

Romance Tragedy

4.0  

Prabhakar Pawar

Romance Tragedy

अविवाहित विधवा

अविवाहित विधवा

11 mins
817


बापाला बदनामीची भीती होती. म्हणून ती गर्भातच नको होती. .कारणही तसेच होते. तिची आत्या घरातून पळून जाऊन आंतरजातीय झाली होती. .आजोबांनी खोट्या मानपान प्रतिष्ठेसाठी आत्महत्या केली होती. .आता त्यांना घरात मुलगी नको होती. .

घरात पत्नी व सून हवी होती. पुढे वंशवेल वाढायला. पण मुलगी आणि बहीण कदापिही नको होती. .घरातील पुरूषाने बाहेरख्यालीपणा केला तरी चालतो. त्याने एक सोडून अनेक लग्न केलेली चालतील. .कारण ते पुरूष होते. त्यांचे नियम त्यांनी त्यांच्या फायद्यासाठी त्यांनी रितसर बनवले होेते. .ते पराक्रमी होते. त्यांच्या पिढ्यांचा उद्धार ते करणार होते. .मुलगी घरात जन्मा येईल आणि दुसर्‍याच्या पिढ्या उद्धारायला जाईल ?. .पुन्हा तिने बाहेर शेण खाल्लच तर किती बदनामी ?. .पुरूषाने शेण किती खाऊ द्या. .कारण त्याने जरी शेण खाल्ल तरी जिच्या जोडीला खाल्लय ना तिच दोषी. .हा तर पुरूष आहे. .ह्या एक ना अनेक कारणाने मुलगी नको होती. .

तशी अमृता पण नको होती बापाला. .जरी आईला हवी असली तरी तिचे मत कोण विचारतय ?. .तिचे काम फक्त पोटात वाढावायचे आणि जन्म द्यायचा. .कारण ती पण एक स्त्री आहे आणि ती जिवंत आहे. हीच ह्या पुरूषप्रधानतेनी तिच्यावर केलेली मेहरबानी होती. .

चोरून गर्भ निदान चाचणी केली. त्यात ही दिसली बापाला. मग प्रयत्न झाले हीचे अस्तित्व विश्वात येऊ नये म्हणून. डाॅक्टरांनी नकार दिला गर्भपाताला. मग अनेक रामबाण आैषधांचा वापर केला. .पण नकळत विसरले की रामबाण निरापराधाला वधायला नव्हताच कधी ?. .सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आणि जोराने रडत अमृता जगात आली. .बाळाच्या रडण्याने आनंद होतो घरात. .पण निराश होऊन बापाची मान खाली गेली. .

बारा दिवसात नामकरण विधी होतो. .पण हीचा लगेच झाला. .बाप म्हणाला. .

"काय पाप केले मी म्हणून ही अवदसा माझ्या घरी जन्माला आली ?. ."

अवदसा का तर मोठी झाल्यावर वाकडे पाऊल पडेल. .आपली बदनामी होईल. .ह्याच नाहक भीतीने अनेक कळ्या फुलण्या अगोदर गर्भातच खुडल्या गेल्या. .पण अमृताचे नशीब की ती जन्माला येऊ नयेच म्हणून बापाने प्रयत्न केले. . पण तरीही तिचा शेवटी जन्म झाला. .

रूढी परंपरा जगाच्या लाजेने पाळायच्या म्हणून मग पाचवी बारसं झालं. .बारश्याला कोणीतरी अमृता नाव सुचवलं. पण तिची आजी तिला आवाज देतांना. .

"ये अवदशे. ."

अशीच बोलवायची. तिला अवदसा म्हणजे काय हे सुरवातीला माहीतच नव्हते. . जसे त्या शब्दाचा अर्थ माहीत झाला. ती दु:खी झाली पण तक्रार करायची कुणाकडे. .येथे कुंपणच शेत खात होते. .लहान असल्यापासूनच तिच्यावर निर्बंध लादले गेले. .

मुलीच्या जातीने जास्त खिदलायचे नाही. उड्या मारत फिरायचे नाही. .परक्या माणसा बरोबर बोलायचे नाही. सातच्या नंतर घराबाहेर पडायचे नाही. .कपडे संपूर्ण अंगभर वापरायचे. .

गावात सातवी पर्यंत शाळा होती. .सातवीला चांगल्या गुणांनी पास झाली. .पण पुढे शिकायला पाठवली नाही. .तिकडे तिने काही केले तर. तिचा बाप नावाचा प्राणी ह्या एक नि अनेक दक्षता घेत होता. .आता ती वयात आली आणि जणू जिझिया कर तिच्यावर लादला गेला. तिच्या अनेक जाचक अटींच्यामध्ये वाढ झाली. .जवळजवळ घराच्या बाहेर पडणे मुश्कील होऊन गेले. .पुरूषांशी बोलणे तर दूर तिच्या मैत्रिणी बरोबर बोलणे पण कमी झाले. .

एक दिवस धनंजय पाहुणा म्हणून तिच्या गावात आला. .भारतीय लष्कर सेवेत असणारा. त्याची आत्या तिच्या गावात राहत होती. .गावात सहज फेरफटका मारत असता. .

अमृताची आणि धनंजयची नजरानजर झाली. .तिने लगेच नजर बाजूला फिरवली. .आता समोरून तो निघून गेला असेल. म्हणून तिने वर मान करून पाहीले. .तर तो तिच्याकडे एकटक पाहत होता. .पुन्हा नजरानजर झाली. .आणि ही तेथून निघून गेली. .कारण नकळत नयन बाण दोघांच्या ह्रदयात घुसले होते. .

धनंजयला ती मनातून आवडली होती. मित्राकडून चाैकशी केल्यावर समजले की तिच्या घरातील वातावरण तिच्या किती आणि कसे विरोधात आहे. .लष्करातला धनंजय आणखीच तिच्या प्रेमात पडला. ती दिसावी म्हणून धडपडू लागला. .अमृतालाही धनंजयला बघावे असे सारखे वाटत होते. .अनेक दिवसाच्या एकमेकाच्या पाहण्यात किती दिवस घालवायचे ?. .म्हणून त्याने तिला भेटायचे ठरवले. .पण ते सहज शक्य नव्हते. हीला तर घरातून बाहेर निघायची चोरी होती. .

आता जे होईल ते होऊन जाऊ दे. .अश्या विचारा अंती त्याने तिला निरोप देऊन भेटायला बोलावले. .भेटण्याचे ठिकाण गावातील नदी आणि वेळ संध्याकाळची. कारण तेथे कुणी नसणार. पण कुणालाही जोडीला न घेता. .

धनंजय नदी किनार्‍याला जाऊन तिची वाट पाहत होता. .हाताच्या बोटांनी ती येईल असे लिहीत होता. .पण ती नक्की येईल का?. .मनात ह्या प्रश्नाने खळबळ माजवली होती. .

त्याला सहज येणं शक्य होते. पण तिला अनेक अडथळे पार करायचे होते. .काहीतरी खोटं सांगायचे होते घरात. मग हळूच सर्वाच्या नजरा चुकवून त्याला भेटायचे होते. .पण तिने त्याला भेटायचे निश्चित केले होते. .आणि ती मैत्रिण आजारा आहे. मला बर्‍याच दिवस भेटली नाही. हे कारण सांगून घरातून बाहेर पडली. .लपतछपत नदीच्या दिशेने निघाली. .

धनंजय तिची वाट पाहत होता. येव्हाना त्याला येऊन दोन तास उलटून गेले होते. .अंधाराने बर्‍यापैकी बालसे घेतले होते. .शेवटी निराश होऊन तो उठला आणि जायला निघाला. .

त्याची घोर निराशा झाली होती. काही अंतर तो चालला आणि पुन्हा विचार करू लागला. आपण निघून गेलो आणि ती जर आली. .तर तिच्या नजरेत आपण उतरून जाऊ. .धनंजय लगबगीने पुन्हा माघारी येऊन बसला. .दहा पंधरा मिनीटं झाली असतील आणि. .

त्याच्या कानावर पैंजणांचा मंजुळ स्वर पडला. .तिच्या येण्याने जणू पाणी त्याला थरथरल्या सारखे वाटले. .तो सर्वोच्च आनंदाने मनात भरला होता. .युद्धात शत्रूवर विजय मिळवल्यावर जसा आनंद होतो तशी त्याची अवस्था झाली. .आणि देहभान हरवून नाचावे अशे त्याला वाटत होते. .ती मंजुळ पावलांनी येऊन त्याच्या शेजारी बसली. .तो तिला आणि ती त्याला निरखीत होती. पण त्यांना अंधाराने तो आनंद घेऊन दिला नाही. .पण दिवसा एकमेकाला चोरट्या नजरेने पाहीलेलं रूप समोर होतेच. तिचे बोलके डोळे त्याला बरेच काही सांगून गेले होते. .खर्‍या प्रेमाला हेच वरदान असते. अबोल म्हणा किंवा मुके शब्द म्हणा. . तरी डोळे एकमेकाशी मनसोक्त बोलत असतात. .त्यांनी अगोदरच एकमेकाच्या डोळ्यातून संवाद साधला होता. .आता फक्त एकमेकाला दोघांचा आवाज ऐकायचा होता. .

पुढारकार घेऊन धनंजयने तिचा हात हातात घेतला. आणि आयुष्यातील पुरूषाचा स्पर्श तिने पहिल्यांदा अनुभवला. त्या स्पर्शात आपलेपणाच्या भावनेचा तिला अनुभव आला. सर्वांगात एका वेगळ्या चैतन्याचा जणू तिच्यात समावेश झाला होता. .धनंजयने विचारले तिला. .

"सखे मला तुझे नाव ज्ञात आहेच. .पण ते तुझ्या मुखातून ऐकायचे आहे. ."

अमृताची गात्र थरथरत होती. .आता कुंद हवेनेही आपली मुजोरी सुरू केली होती. .शब्द सहज उमटायला तिला सायास पडत होते. .

" अमृ. .ता..!"

तो जगातला पहीला आवाज होता. ज्यात कंप होता. पण त्याने ह्रदय द्रावले होते. .सिनिअरचा पहाडी आवाज आणि त्याला प्रतिक्रिया देतांना याचा पहाडी आवाज असायचा. .पण आजचा साैम्य आणि मितभाषी आवाजात संवाद घडत होता. .त्याने तिचा हात सर्वोच्च प्रेमाने हळूवार आवळला. नाजूक चुंबन त्याला घेतले. .तो हात तसाच घेऊन ह्रदयाशी कवटाळला. .अमृताला पुरूषाकडून असे प्रेम प्रथमच लाभत होते. नकळत तिच्या डोळ्यात अश्रूंचा पूर दाटला. .याने विचारले तिला.

" काय झाले प्रिये. .का रडतेस. ."

"आयुष्यात मला असे प्रेम प्रथमच लाभते आहे. आयुष्यात आज पर्यंत अपमानकारक वागणूकच मिळाली. येव्हढे प्रेम कधी मिळाले नाही. .आणि मिळेल याची शास्वती नव्हती मला. "

नकळत त्याने तिला कवेत घेतले. आणि ती अोक्साबोक्शी रडत होती. जणू तो बापाच्या मायेने तिला पाठीवर थोपटून गप्प करत होता. .आता नकळत कुंद हवेची मुजोरी थांबली होती. .ती स्वैर अलामत झाली होती आणि तो प्रेम काफिया जणू. .

त्याला तिच्या लहानपणापासूनची माहिती मिळाली होती. .नकळत त्यांनी नदी, कुंद हवा, आकाश व आकाशातील चंद्राला साक्षी मानून एकमेकाला पतीपत्नी म्हणून स्विकारले होते. .समाज मान्यता असावी हा आग्रह दोघांचा नव्हता. .विवाह नंतर जे पुरूष आणि स्त्रीत घडते. .ते विवाहपूर्व अमृता आणि धनंजय मध्ये नकळतच घडून आले. .कारणं दोघं संपूर्णपणे जगाला विसरले होते. .

त्यांनी तेथेच जन्मोजन्माच्या संगतीच्या आणाभाका घेतल्या. .पुढच्या सुट्टीत तो तिला समाजमान्यतेने अर्धांगिनी बनवणार होता. .

आज ती खूपच आनंदी होती. नकळत स्वत:च्या पायांनी नदीच्या पाण्यात असलेल्या चंद्राला ती नाचवत होती. .तिच्या आनंदात विरजण पडायला नको म्हणून तो चंद्रही नाचत होता. .अमृता आणि धनंजय दोघे एकमेकाच्या सहवासात एव्हढे वाहत गेले होते की, रात्र अर्ध्यावर येऊन ठेपली. .धनंजयच्या लक्षात आले खूपच उशिर झाला होता..आता निघायला हवे. .दोघे एकमेकाचा निरोप घेऊन निघाले. दुसर्‍या दिवशी संध्याकाळी सात वाजता ते भेटणार होते. न चुकता . .

इकडे अमृताच्या घरातील वातावरण अतिउष्ण झाले. .रात्रीचे बारा वाजले होते. साडेचारला मुलगी घरातून गेली होती. .बापाने आईला शिव्या देता देता. मारझोड केली होती. .भाऊ, बाप,काका तसेच शेजारचे अमृताला शोधायला निघाले होते. .सर्वांनी शोधाशोध केली ती सापडली नाही. तशे सर्व पुरूष माघारी आले. .

अमृता घरातून इतका वेळ बाहेर असणं हे प्रथमच घडत होते. तिच्या काळजीने घरात आईच व्याकूळ होती. बाकी सर्वांच्या चेहर्‍यावर संताप दाटला होता. .आणि तेव्हढ्यात अमृता घरात प्रवेशली. .

बाप ताडकन उठला आणि त्याने तिच्या कंबरेत लाथ घातली. .ती जाऊन भिंतीवर आदळली. आई रडतरडत तिला उचलायला धावली. बापाने आईच्या कानाखाली लगावून दूर लोटली. .शेजारची काकू आईला आवरू लागली. .घरातील समस्त पुरूष वर्ग तिला मारझोड करू लागला. .पण पुढे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. .

अमृता त्यांच्या मारझोडीला भीक घालीत नव्हती. जणू ती अमृत प्राशून अमर झाली होती. तिच्या चेहर्‍यावर आनंदी भाव होता. ह्या सार्‍या घडणार्‍या प्रकाराची तिला पुर्व कल्पना होती. .ती समयाशी सादर झाली होती. मारझोड करणारे हात शरमले. .सर्वांनी निष्कर्ष काढला. हीला भूत झोंबले आहे. .

स्त्रीयांना भूत झोंबण्याचे प्रकार तसेही पुरूषाच्या मानात जास्त असते. याचे कारण विज्ञानाने शोधले आहे. पुरूषांच्या मानात स्त्रीयांवर अत्याचार जास्तच झाले आहेत. तिच्या मनातील अव्यक्त भावना दाबल्या जातात. त्यातून येणाऱ्या मानसिक रूग्णतेला. भूत झोंबल्याच्या नावावर खपवले जायचे. .

अमृतलाही भूत झोंबले होते. पण ते प्रेम भूत होते. धनंजय नावाचे. .तिला धनंजयचा आभाळा एव्हढा आधार वाटत होता. .ज्यो बलाढ्य शत्रू संगे लढू शकतो. त्याच्या पुढे माझ्या ह्या घरातील पुरूष पासंगाला तरी पुरतील का?. .हाच आधार तिला निडर जगण्यास बळ देऊन गेला. .

आज खूप दिवसात आई तिला कुशीत घेऊन निजली होती. .रोज ती अाजीच्या खोलीत कोपर्‍यांमधे झोपायची. एकटीच असायची. .आज तिच्या चेहर्‍यावर समाधानाची झळाली होती. .तर आईच्या चेहर्‍यावर चिंता होती. तिच्या केसातून आई हात फिरवत होती. .डोळ्यातून अश्रू गाळीत होती. .कुठूनतरी देवाची विभूती आणून तिच्या आईने तिच्या कपाळावर लावली. .तेजःपुंज चेहर्‍यावर विभूती आणखीनच शोभून दिसत होती. .

अमृता सकाळी उठली. संध्याकाळ कधी एकदाची होते आणि मी धनंजयच्या मिठीत जाऊन स्थिरावते. .असे तिला वाटत होते. .आज ती कुणाची पर्वा न करता घरातून सर्वांच्या समोर धनंजयला भेटायला जाणार होती. .भले तिला बापाने पुन्हा घरात घेतली नाही तरी तिला काही पर्वा नव्हती. .ती सर्वा समक्ष धनंजयच्या बरोबर निघून जाणार होती. .

संध्याकाळ झाली आणि ती निघाली. तिला वाटले होते घरातील मला कुणी आडवेल. .कुठे चाललीस म्हणून विचारेल. .पण असे काही घडले नाही. .

घरच्यांना आज ती नक्की कुठे जाते ते पहायचे होते. .नक्की भूतबाधा आहे की आणखी काही प्रकार. .ते त्यांना जाणून घ्यायचे होते. .ती जायला निघाली तसे सर्व तिच्या मागावर जाण्यासाठी तयार झाले. .पण तिला संशय येऊन द्यायचा नव्हता. .ती पुढे निघाले आणि घरातले पुरूष मागावर निघाले. .

ती सर्वोच्च आनंदाने झपझप पावले उचलत होती. .मनात बोलत होती. .

"धनंजय कालच्या सारखा कधीचा येऊन थांबला असेल. माझी वाट पाहत असेल. .ह्या विचाराने ती अक्षरशः पळत होती. .तिच्या पळण्याने मागावर असणारी माणसं पण पळत होती. .आणि ती नदीवर पोहचली. .पण . .

पण धनंजय तेथे नव्हता. .ही सैरावैरा नदीच्या काठावर धावत होती. .धनंजयच्या नावाने टाहो फोडत होती. .खूपच अक्रोश करीत होती. .पण धनंजय आलाच नाही. .तेव्हढ्यात. .

आठदहा टाॅर्चचा उजेड तिच्या अंगावर पडला. .अाक्रोश करून छाती पिटून. .कढत दु:खाश्रूंनी ती जमिनीवर कोसळली. .अनेक टाॅर्चचे उजेड शोध घेत होते. आजूबाजूला काही आहे का? . .ते पहात होते. .आणि त्यांची शंभर टक्के खात्री झाली की हीला भूतबाधा झाली आहे. .

रात्री धनंजय अमृताला भेटून निघाला. .तो पण आज खूपच आनंदात होता. .त्याला खरं प्रेम मिळाले होते. अमृतासारखी मुलगी त्याच्या नशीबात आली होती. साध्या राहणीमानात त्याला अमृताच्या रूपात अमृतच लाभले होते. .नैसर्गिक साधे राहणीमानातून खर्‍या साैंदर्याची त्याने पारख केली होती. .तो आत्याच्या घरी पोहचला. .

त्याची वाट पाहत त्याचा भाऊ येऊन थांबला होता. .त्याच्या नावाने तार आली होती. .आणि रजेवर असणार्‍या सैनिकांना हजर व्हायला सांगीतले होते. .सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. .त्याला सकाळी घरून तात्काल निघायचे होते. .प्रत्येक सैनिकाला भावनांचा त्याग करावाच लागतो. .आणि धनंजय त्याला अपवाद कसा ठरणार. तो निघून गेला सीमेवर . .

इकडे अमृता नजरकैद झाली. .आता भूतबाधा दूर होई पर्यंत तिला घरातून बाहेर निघता येणार नव्हते. .आता धनंजयच्या आठवणीत ती दिवस कंठित होती.. .

निसर्गाने त्याची कामगीरी चोख बजावली. .धनंजयच्या प्रेमांकुराचे हीच्या गर्भात गुंजन सुरू झाले. हीला समजले नाही. .पण हीच्या आईने अनुभवाने जाणले. .अमृतावर अजून पर्यंत हात न उचलणार्‍या आईने प्रथमच तिच्यावर हात उचलला. .

"बोल घुबडी. .कुठं शेण खाऊन आलीस. बापानी जन्माला आल्यावर तुझं अवदसा नाव ठेवलं. त्याच नावाचे पांग फेडलेस. ."

आणि आई अोक्साबोक्शी रडायला लागली. हीच्याही लक्षात आले. .त्या दिवशीच्या विश्वाला विसरून एकमेकाच्या बाहूपाशात आपण गुन्हा करून बसलो. .ती गप्प होती. .धनंजय भेटला नव्हता. .तसा तो गावात पाव्हणा होता. त्याने आपला फक्त वापर तर केला तर नसेल ना?. तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. . पण लगेच स्वत:ला सावरत मनाची समज घालत ती स्वत:शी बोलली. .नाही तो असं करेल हे शक्यच नाही. .त्याला काही समस्या उद्भवली असणार. .तो समोर येऊन साक्ष देईल तरच जगाला हे पटेल. .कारण आमच्या प्रेमाला साक्षीदार होते. नदी अंधार थंड वारा. आकाश आणि त्यातील चंद्रमा. .पण त्यांची साक्ष हा समाज स्विकारणार नाही. .म्हणून मुग गिळून गप्प बसल्या शिवाय पर्याय नाही. .

आईला मोठा प्रश्न पडला. .पण आता तिच्या बापाला सांगायची चोरी होती. .ह्या प्रकाराने अमृताला तिचा बाप जिवंत ठेवणार नाही. .

इकडे धनंजय मातृभूमीच्या रक्षणार्थ लढतांना शहीद झाला. त्याचा पराक्रम अतुलनीय होता. पण शत्रूच्या एका गोळीने त्याचा वेध घेऊन वीरमरण त्याला प्राप्त झाले. .

इकडे निसर्ग नियमाने बाळाचे शरीर आकार घेत होते. .कारण कोंबडं झाकले तरी सूर्य उगवायचा राहत नाही. .बाळाच्या आकाराने आता सर्वांना माहीत झाले. .अमृता बाहेर शेण खाऊन आली आहे. .पण तिने शेण नव्हतेच खाल्ले. .आयुष्यात तिला प्रेमामृत प्राशन करायला मिळाले होते. .पण धनंजय स्वत: येऊन कबूली देण्याची ती वाट पाहत होती. .

घरात बापाने भावाने तिला बेदम मारहाण केली. .बाहेरख्याली पासून छिनाल रंडी अशी विशेषणं बहाल केली. .पण ती सहन करीत होती. .तिला कुठल्याही प्रकारच्या बदनामीची भीती नव्हती. तिचे डोळे फक्त धनंजयच्या प्रतिक्षेत होते. .आणि गावात बातमी आली धनंजय शहिद झाला. .आता होती ती आशा पण धुळीला मिळाली. .ती कोपर्‍यात कुणाच्या नजरेत येणार नाही अश्या ठिकाणी बसून खूप रडली. .

तिला धनंजयचे नाव उघड करायचे नव्हते. .एका शहिदाला कलंकित तिला करायचे नव्हते. .त्याने तिला फसवले नव्हते. तो तिच्या अगोदर देशाचा होता. तिचा हक्क देशापेक्षा कमीच होता त्याच्यावर. .तो जन्माला आला होता फक्त मातृभूमीच्या रक्षणार्थ. ती मनात म्हणत होती. .

"तसा त्याच्यावर माझा हक्क नव्हताच. मी स्वार्थी झाले होते. जी त्याच्यावर हक्क सांगत होते. .वेडी होते मी. .चला आता जगून तरी काय फायदा. .असेल आत्महत्या करणं पाप. पण आज ते पाप पण मला पुण्यापेक्षा कमी नाही. कारण मला बाळाला जन्म देऊन एका शहिदाला कलंकित करायचे नाही. ."

आणि ती घरातून निघाली. नदीच्या दिशेने. त्या दोघांच्या प्रेमाचे जे साक्षीदार होते. .त्यांच्या समक्ष तिला शहिदाला न्याय द्यायचा होता. .ती नदीच्या डोहावर पोहचली. आणि डोहात उडी घेण्या अगोदर मनात विचार आला. .तसेही आपल्याला जीवन संपवायचे आहेच. .मग एकवेळ शेवटचं धनंजयच्या पार्थिवाचे दर्शन तरी घेऊ या. आणि मग मृत्यूला कवटाळायला आपण मोकळे. .ती धनंजयच्या गावी निघाली. .धनंजयचे पार्थिव अजून आले नव्हते. पण कित्येक हजारोचा जनसमुदाय तेथे उपस्थित होता. .त्याला निरोप द्यायला एव्हढा जनसमुदाय बघून गर्वाने तिची छाती फुगली. .

तेव्हढ्यात धनंजयचे पार्थिव आले. ठिकठिकाणी स्क्रीन लावल्या होत्या. त्यावर धनंजयचे पार्थिव दर्शन सर्व जण घेत होते. .अमृतानेही पार्थिव दर्शन घेतले आणि डोळे पुसून ती वळली. .आता तिला तिच्या कायेचे विसर्जन करायचे होते. .आणि ध्वनिक्षेपकाद्वारे एक आवाज तिच्या कानावर आला. .ती थांबली व आवाजाच्या दिशेने पाहू लागली. .

"मेरे प्यारे भाई आैर बहनो ।. .कृपया ध्यान दिजिये।. .मेरे हात मे शहीद वीरजवान धनंजय की यह लिखी डायरी है। . इसमे उन्होने यह लिखा है की, मैने अमृता नाम के लडकीसे प्यार कीया है।. वह मेरी दुल्हन है ।. .जंग छेडने के पहले हम एक रात साथ मे थे!. .मै अगर खुन की चादर लपटके भारत माता के गोदमे हमेशा के लिये सो गया ।. तो मेरे पार्थिव पे उसे रोने से कोई न रोके !. ."

आवाज ऐकून अमृता पार्थिवाच्या दिशेने धावली. तिला धनंजयने न्याय दिला होता. .आणि ती त्याच्या पार्थिवावर पडून रडत होती. . उपस्थित समुदायाला अश्रू आनावर झाले. .


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance