Prabhakar Pawar

Tragedy Others

4.5  

Prabhakar Pawar

Tragedy Others

अशी एक होळी

अशी एक होळी

9 mins
577


अशी एक होळी

"डोरेमन पडला बघ. ."

संगीता हसून बाळाला बोलली. .त्यानेही हसून टाळ्या वाजवल्या. .मग पटकन संगीताने दूधात भिजवलेल्या चपातीचा घास त्याच्या तोंडात भरवला. .असच फसवून किंवा हसवून संगीता बाळाला भरवत होती. .नऊ महिनाचा बाळ झाला होता. .अंगावर पोट भरती होत नव्हती. .पण बाळाला कसे भरवायचे असते?. . याची उत्तम कला प्रत्येक मातेला अवगत असते. .

आणि अचानक. .

"धप्प"

एक दगड छतावर येऊन पडला. .आवाजने सावरत होतीच तर दुसरा दगड येऊन पडला. .आता अनेक दगड येऊन 'धप्पऽऽधप्प' घरावर पडत होते. बाहेर मोठा मुलगा भोकांड वासत धावत येत होता. .संगीता बाहेर आली. .तिने समस्येचे गांभीर्य अोळखले होते. .बाहेरचा गेट पटकन कुलूप लावून घेतला. .मोठ्या मुलास आत घेऊन. .घराचा मुख्य दरवाजा लावला. .मोठा मुलगा रडतारडता तिला सांगत होता. .

"बाबाला मारलं लोकांनी. .माझ्या पाठीलाबी हाणली एक. ."

जमाव लांबून दगड फेकणारा आता घराजवळ आला. .आता वाॅल कंपाउंड चढून गावातील माणसं घरात येण्याचा प्रयत्न करीत होते. .तोंडातून शिव्या सुरू होत्या. .

"भडव्या गावाच्या इरूध जातो का रं. .भाडखाव. .हरामी. .तू गेलास पळून पर तुह्या घराची रांडोळी करतो का नाय बघ आमी. ."

संगीता खूप घाबरली. .संजयने घराला शेप्टी डोअरची व्यवस्था होती. .तिने मागचा आणि पुढचा दरवाजा व्यवस्थित बंद केला. .जमाव आत घुसला होता. .खाली जेवणाच्या पडवीला साधा दरवाजा होता तो तुटला. .जमावाने सर्व सामानाची नासधूस केली. .घरातील पाणी अोतून दिले. .गॅसची शेगडी फोडली. .जमाव शेप्टी डोअर तोडण्याचा प्रयत्न करीत होता. .शेप्टी डोर तुटत नाही पाहिल्यावर काहीजणं घराच्या छप्परावर चढले. .त्यांनी ठरवले होते. .वरचे पत्रे काढून घरात प्रवेश करायचा. .दगड फेकीने अर्धीअधिक काैले फुटून गेली होती. .

तेव्हढ्यात आण्णा आजोबा हलती मान घेऊन पुढे आले. .वयाची पंचाऐंशी अोलांडलेली. .हातात काठी टेकत. .गर्दीला शिव्या हाडसत आजेबा पुढे येऊन थांबले. गेटच्यावर चढत असणार्‍या माणसांना त्यांनी काठीने बदडायला सुरवात केली. .

"निघा हरामखोरा वं बाहीर. .एका बाय माणसाले आणि तिच्या कच्यामिच्य्या पोरांवर मर्दानगी दाखिवतासा का रं. .जेंनी गावाला घोडा लावला त्यो तं तुमच्या हातून पळून गिला. .निंघा भाडखाऊ बटकीच्या पोटची आवलाद हरामी. .राजकारण राजकारणाच्या जागिव ठिवायच. .बायका पोरं तिथं आल्ती का ?. ."

आण्णा आजोबांचे ऐकून सर्व तोडफोड करणारी माणसं मागे सरली. .त्यां गावात मान सन्मान होता. .तसेच त्यांचा बाहेर असणारा मुलगा मोठा पोलिस अधिकारी होता. .त्यामुळे आण्णांना विरोध करायची कुणाची हिंमत नव्हती. .आता वयोमानानुसार ते घराच्या बाहेर निघत नव्हते. .पण आयुष्यभर दिसलेला अन्याय सहन केला नाही त्यांनी. .म्हणून ते संगीताच्या मदतीला धावले होते. .संगीताला आण्णांच्या रूपात देव गावला होता. .तिला आता संकट टळल्याची शाश्वती झाली होती. .

आण्णांची नातसून आली. .तिला कुणीतरी सांगीतलं जाऊन, आण्णा प्रक्षुब्ध जमावाला आवरायला गेलेत. .तिने आण्णांचा हात पकडला. .आणि घरी घेऊन जातांना बोलली.

"तुम्ही कश्याला आलात बाबा. .तुमाला चालव ना हलव काय गरज होती यायची. ."

आण्णा चिडले नातसुनेवर. .तिच्याकडे रोखून पहात होते. .त्यांची मान आता अधिकच हलत होती. त्यांनी रागातच हात सोडवून घेतला. आणि रोखून पहातापहाता बोलले. .

"सोड माह्या हात. .तुबी एक बायमाणूस हाय ना गं ?. .का मंग तुले वाटलं नाय. .संगीताचे मदतीला जाया पायजेल. ."

नातसूनेकडे उत्तर नव्हते. .तिला पण संगीतावर गावातील लोकांनी अन्याय केला होता. .हे मान्य होते. .पण ती गप्प राहिली होती. .

ह्या सार्‍या गदारोळात संध्याकाळ होऊन काळोख पडायचा सुरवात झाली. .मोठा मुलगा भितीने थरथर कापत होता. .लहाना रडूनरडून झोपी गेला. .मोठ्याला एका कुशीत आणि छोट्याला एका कुशीत घेऊन. .संगीता आजून कोपर्‍यात दडून बसली होती. .नवरा पळून गेला. .पण संगीताला मुलांना सोडून पळू जाता येत नव्हते. .कारण मुलांना जन्म देऊन होत नाही. .त्यांना मायेच्या पंखांखाली घेऊन अनेक प्रकारच्या संकटातून वाचवायचे असते. .त्यांच्यात पात्रता येई पर्यंत माता कधीही त्यांना अंतर देत नाही. .बापाने गावाच्या विरोधात जातांना बायकामुलांचा विचार केला नव्हता. .कदाचित त्याची कृती कुटूंबाच्या अर्थिक फायद्याची असेलही. .पण अंगावर आल्यावर स्वत:चा जीव वाचवण्यासाठी तो पळून गेला. .संगीताचे माहेर गावतलेच पण याच्याशी प्रेमविवाह केला. .म्हणून घरच्यांनी नाते तोडले होते. .गावतील काही माणसं याला पडद्यामागून सपोर्ट करायची. .पण त्याच्या अंगावर आले म्हणून त्यांनीही पळ काढला. .

याला ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध केला. .पण संरपंच निवडीला त्याने विरोधी पॅनलकडून मत दिले. .ग्रुप ग्रामपंचायत असल्याकारणानं दुसर्‍या गावाचा सरपंच झाला. .यांच्या गाव पॅनलच्या अकरापैकी सहा सदस्य असूनही सरपंचकी गावातून गेली. .आणि गावकर्‍यांनी तो पळून गेला म्हणून घरावर रोष काढला. .

अंधाराने त्याच्या साम्राज्याचा विस्तार वाढवायला घेतला. .गावातल्या टवाळांनी शुरता दाखवायला सुरवात केली. .अंधारात घरावर मधूनमधून दगड पडत होते. .तर छप्पराचे तुकडे राहूनराहून पडत होते. .मुलं झोपेतून जागी झाली. .

"मम्मी भूक लागली. ."

आता संगीताचा जीव तीळतीळ तुटायला लागला. .ती उठून किचनमध्ये उजेड करायला निघाली. .आता पर्यंत ती पिल्लांना घेऊन काळोखात बसून होती. .ती उठली पण पिल्ल पक्षिणीला सोडायला तयार नव्हती. .मग छोट्याला कडेवर आणि मोठ्याला हाताला धरून ती स्वैंपाक खोलीत आली. .घरात दाट अंधार होता. .पण पायाच्या स्पर्शाने तिने खोलीत लोकांच्या मनातील क्षोभ जाणला होता. .उजेडाचा कवडश्या आधाराने, मुलाच्या भुकेला शह देण्याचा तिचा केविलवाणा प्रयत्न होता. .पण सकाळी हाताला थंड मुलायम स्पर्श देणार्‍या काचेच्या बरण्या, फुटल्यावर पायात रूतून एव्हढा जीवघेणा त्रास देत असतील. .याचा अनुभव तिने घेतला. .तरी काचेच्या तुकड्यांना भीक घालणारी ती नव्हती. .

संगीताने मोठ्या मुलाला पण उचलून घेतले. .आणि असहाय्य वेदनेसह सुरक्षित जागी आली. .आता किचनमध्ये तिला कवडसा प्रकाश किंवा पिल्लांना दाणे मिळणे दुरापास्त होते. .आज अंध व्यक्तीच्या आयुष्यात किती अंधार असेल याचा ती अनुभव घेत होती. .थरथरत्या पायाला हाताने वर उचलून काचा तर तिने उपसल्या. .पण थांबणार्‍या रक्ताला आवरायला उपाय सापडणे जुळवायचे होते. .मग साडी फाडली अंगावरची. .भुकेल्या बाळांसाठी फ्रिजकडे वळली. .फ्रिजमधून पाणी झिरपले होते. .त्यातच हात अोले करून स्वच्छ केले. .दूधाच्या पातेल्यातून दूध कपातून बाळाला पाजले. .रात्रीचे शिळे अन्न मोठ्याला भरवले. .दगड पडत होते छप्परावर. .पण आता मुलासह तिला पण त्या आवाजाची सवय होऊन गेली. .

"ये लक्ष ठिवारं त्या संत्याव. .राच्याला आला घराले गाठीत त कामच काढा भाडखाऊचा. ."

घराच्या बाहेर आवाज येत होता. .ही पण दक्ष झाली. .लाकडं तोडायचा कोयता जवळ घेऊनच होती. .पण तिचा जीव नकळत नवर्‍यात आता गुंतला होता. .त्याच काय झाले असेल. .खूप प्रेम करायचे दोघे एकमेकावर. .

पहिली भेट तिला आठवली. .भर रस्त्यात त्यानी तिचा हात पकडला होता. .आणि बोलला होता. .

"संगेय मला तू ज्याम आवडतीस. ."

संगीताला त्याचे बिनधास्त बोल आवडले होते. .त्याचा स्पर्श तिला सुखावून गेला होता. .तो तिला हवाहवासा होता. .पण मुलीच्या जातीला मर्यादा असतात ना ?. .तिने घरी नाव सांगीतले. .मग काय संगीताच्या भावांनी संतोषला बेदम मारहाण केली होती. .तरी तो नमला नाही. .त्यांना मार खातांना बोलत होता. .मी तिलाच बायको करणार. .

संगीतावर एव्हढं प्रेम करणार्‍या संतोषला ती कशी नाकारणार. .घरच्यांचा विरोध होता. .शेवटी घरातून पळून जाऊन त्यांनी लग्न केले होते. .संतोषचे इतर भाऊ आईवडील बाहेर राहत होते. .त्यालाही ते बाहेर नोकरीसाठी जायला सांगत होते. .पण त्याच्या नकारघंटेला ते नाही थांबवू शकले. .संगीताच्या घरच्यांनी तिच्या नावाचे बाहुले बनवून. त्याला अग्निसंस्कार देऊन अंतेष्ठी केली होती. .आता घरच्यांना ती मृत होती. .

पुन्हा पिल्ल पक्षिणीच्या पंखांखाली झोपली. .मोठे मुल बापाची आठवण काढत होते. रोज त्याला बाबाच्या छातीवर झोपण्याची सवय होती. . पक्षिण जागी होती. .अन्न तिने मुलांसाठी राखून ठेवले. .तसेही तिच्या गळ्याखाली ते उतरतही नव्हते. .काळरात्र होती. .वैरीतर घराभोवताली फिरत होते. .नकळत कधी झोप लागली समजली नाही. .

दुसरा दिवस होळीचा होता. .गावात सणाची जय्यत तयारी सुरू होती. .प्यायला पाणी फेकून दिलेल्या भांड्याच्या तळाशी होते. .पण काचेची गॅस शेगडी फोडून टाकली होती. .चुळ पेटवायला लाकडं बाहेर होती. .शिळ्या अन्नावर मुलांचा दिवस ढकळला गेला. .पण रात्र झाली. बाहेर डफडं वाजायला लागले आणि मुलं हट्ट करायला लागली. .मोठा मुलगा साखर माळ मागायला लागला. .संगीताच्या डोळ्यात अश्रू होते. .आज तिला आयुष्याने खूप मोठी सजा दिल्याचा अनुभव येत होता. .धावपळीत मोबाइल कुठे कोपर्‍यांमधे गेला ते समजले नव्हते. .मोबाईलला घराच्या बाहेरच्या कोपर्‍यावर नेटवर्क मिळायचा. .पण तिने आता अनुभवले होते. .आपण घरात जास्त सुरक्षित आहोत. .

आज होळीच्या दिवशी तिला आयुष्याची होळी झाल्याची अनुभूती येत होती. .तिने कधी स्वप्नात पण हा विचार केला नव्हता. .तरी तिला भाऊ आईवडिल असतांना तिच्या वाटेला असे दिवस आले होते. .घरातला काही भाग फक्त तिच्या पायाखाली होता. .पायाची जखम त्रास देत होती. .पुन्हा रात्र जवळ आली. .आणि आजच्या रात्रीलाही तिने सामोरे जाण्याचे ठरवले. .

बाहेर उजेड दिसायला लागला. .कुणीतरी दरवाजा वाजवत होते. .ही घाबरली. .आता नवीन कुठले संकट येणार आहे देव जाणो ?. .

"संगेय दार उघड. ."

आवाज ऐकून संगीताच्या जीवात जीव आला. .पाण्यात बुडणार्‍या व्यत्कीला सुखरूप किनारा गाठतांना जसा आनंद व्हावा. .तसाच आनंद संगीताला झाला होता. .

सातवीची परीक्षा झाली आणि हायस्कूलला दुसर्‍या गावात मुलांना जायला लागायचे. .संगीता पण दुसर्‍या गावात हायस्कूलला जात होती. .तिथे वंदी आणि फातिमा तिल्या दोन मैत्रिणी भेटल्या होत्या. .तिघींची खूपच घनिष्ट मैत्री होती. .डबा खायला एकत्रच असायच्या. . त्यातील फातिमा हायस्कूलच्या गावातील होती. .दुपारी जेवायला तिघी फातिमाच्या घरी जायच्या कधीकधी. फातिमाची आई मुलींना चांगली बिरयानी तर कधी मटन चिकन करून खायला घालायची. .वंदी खूपच गरीब घरातली होती. .तिची वस्ती हायस्कूल पासून जवळच होती. .पण तिचे आईवडील खूपच मायाळू होते. .वंदी जवळ तिची आईबाबा रानमेवा पाठवून द्यायचा. .त्यांना हायस्कूलातली मुलं 'इना मिना डिका' म्हणून चिडवायची. .

तसेही वंदीच्या बाैद्ध वस्तीत कुणी जात नव्हता. .फातिमा मुस्लिम खाटकाची लेक होती. .पण संगीता मराठ्याची आणि आजोबा गावाचा पाटील. .मुलींना मैत्रीपुढे जातपात दुय्यम होती. .दहावीचा सेंडआॅफ झाला. .आणि संगीताला वाटले. .आपण पण मैत्रींनी घरी घेऊन जायला हवे. .म्हणून संगीता मुलींना घरी घेऊन गेली. .चांगला पाहुणचार झाला. .मुली जेवायला बसल्या होत्या. .संगीच्या आजीला कुणीतरी सांगीतलं. .संगीच्या जोडीला आलेल्या मैत्रिणी एक फारूख खाटकाची पाेरं आहे नि दुसरी बुद्ध वाड्यातली. .म्हातारीच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. .म्हातारी ताडताड उठली आणि संगीच्या पेकाटात लाथ घातली. .संगीला समजले नाही म्हातारी अशी का वागतेय. .

"हिजडेय गाढवी घर बाटवाय निघालीसा. .हेच थेरं कराया जाती का ?. .हायस्कूललात. .ये पोरीव निंघा पयले घरातल्या. ."

खूप मोठा मानवतेचा अपमान होता. .भरल्या ताटावरून माणसाला माणसाने कमी जातीचा ठरवून उठवले होते. .संगी फातिमाला आणि वंदीला निरोप देतांना खूप रडत होती. .आपण त्यांना बोलावले आणि घरच्यांकडून अशी वागणूक नव्हती मिळायला पायजेत. .संत्याने त्यांना पाहिले. .तो त्यांच्याच वर्गात शिकत होता. .त्याने रडण्यावरून अंदाज बांधला काय झाले असेल. .

"आर्र पोरीवो. .मी पुढल्या दारात तुमची पाट पायत व्हतो. .तुमी मागल्या दारात येऊन असा काय कालवा करून रायल्यात. .चला घरला माझ्या. .आई कवा धरून वाट पाहू रायले. ."

"नंगो आता आमी जातो. ."

वंदी बोलली आणि रडायला लागली. .संगी आणि फातिमा तिचे सांत्वन करीत होती. .संत्या बोलला.

"माझ्या आईला माणंस आवडत्यात जातपात नाय. ."

संत्याच्या घरी पोहचल्यावर संत्या अोरडला. .

"आई तुझ्या सूनबाईला घेऊन आलोय बघ. .जोडीला दोन करवल्याबी हायेत. ."

संगीने जोरात पाठीत बुक्का हाणला संत्याच्या. .वंदी नि फातिमा हसायला लागल्या. .संगी लटक्या रागात बोलली. .

"चला गं पोरींनो आपण जाऊ. .ह्यो मुडदा नाय सुधरायचा. ."

संत्याची आई बाहेर आली. .

"ये गप्प रं तू. .काहून तरास देतोसा पोरींना. .या गं पोरीव आत. ."

पोरींचे लाल डोळे पाहून संत्याच्या आईने विचारले. .

"का गं डोळं लाला दिसत्यात. .काय झाल्त रडाया ?. ."

संगी रडायला लागली. .तिने घडलेला प्रकार सांगीतला. .संत्याच्या आईने तिन्ही पोरींना एकत्र मिठीत घेतलं. .

"म्हतारीले ताटभं मटाण द्या वाढून. .मंग म्हतारी निस्ती दात नसलं तरी चूखून खायेल. .तवा तिला खाटीकबी चाललं. .शेतात धान्य पिकवाले बुद्धबी चालेलं. .पर बुद्धाचा नि खाटका घरचा मनुष्य तिला खपत नाय. ."

फातिमाला आणि संगीला बारवीच्या पुढे शिक्षण घेता आले नाही. .पण वंदी शिकून सरकारी नोकरी करीत होती. .संगीताचे आणि संतोषचे प्रेमप्रकरण चव्हाट्यावर आले होते. .संगीच्या घरच्यांचा कडाडून विरोध होता. .संगीच्या लग्नाच्या आदल्या दिवशी संत्यानी तिला पळवून नेली. .एक वर्ष गावाच्या बाहेर काढला. .त्यावेळी वंदीची आणि फातिमाची मदत दोघांना झाली होती. .एक बाळ झाल्यावर ते गावात परतले. .विरोध मावळला होता. .पण संगीता माहेरच्यांना कायमची मुकली होती. .आज जिवावर बेतलेल्या प्रसंगात कुणी मदतीला आला नाही. .पण त्या तिच्या मैत्रिणी दूरून आल्या होत्या. .त्यांना त्यांच्या घरून यायला दहाबारा तास लागले होते. .

संगीताच्या गळ्यात पडून वंदी आणि फातिमा अोक्साबोक्शी रडत होत्या. .फातिमाच्या भावाने घरातील वीज दुरूस्ती केली होती. .आता घरात लख्ख प्रकाश पडला होता. .वंदीने आठवणीत पोरांना डफडं आणि साखर माळ आणली होती. .वंदीचा भाऊ पोलिस पंचनाम्यात मदत करीत होता. .

"साहेब एक स्त्री तिच्या दोन लहान मुलांसह घरात होती. .आणि जमावाने तिला व तिच्या बाळांना घरात कोंडून मारण्याचा प्रयत्न केला. .जमाव हा गावातीलच होता. .एका स्त्रीला अंधारात एक रात्र आणि दोन दिवस कोंडून राहयला लागले. .स्वातंत्र्य भारतात आणि एकवीसाव्या शतकात असे घडते आहे. .गुन्हेगारांना वेळीच शासन व्हायला हवे. ."

पोलिस पिंजरा गावात दाखल झाला. .गावात जे पन्नाशीच्या आतील पुरूष होते. .त्यांना पकडून पोलिस घेऊन गेले. .काही पळून गेले. .होळीचा सण आणि गावात उरली लहान मुलं, स्त्रीया आणि वयस्कर माणसं. .

आता संगीताची मुलं डफडं वाजवीत होती. .संतोष पण घरी उगवला होता. .मोडतोड झालेल्या तसेच टाकावू वस्तूंची लाकडांची होळी पेटवली गेली. .

समाप्त. .


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy