Prabhakar Pawar

Horror Fantasy Thriller

4.5  

Prabhakar Pawar

Horror Fantasy Thriller

चेटूक

चेटूक

11 mins
704


चेटूकमेटूक

मिळेल ती गाडी पकडून अभय निघाला. फाॅरेस्ट आॅफिसर म्हणून त्याला कालच काॅल लेटर आले होते. शहरात जन्माला येऊन लहानाचा मोठा झालेला अभय. आज जंगलात वनअधिकारी म्हणून रूजू झाला. नोकरी मिळण्याचा बेस हाच होता की त्याला बारावीला चांगले मार्क्स होते. आणि पदवीला पण प्रथम वर्ग मिळाला होता. घरातल्यांनी त्याच्या नोकरीला नापसंती दर्शविली होती. पण अभयच्या हट्टापुढे घरच्यांचे काही चालले नाही. .

जंगलातील फाॅरेस्ट डिपार्टमेंटचे कार्यालय होते. कार्यालयापासून थोड्या अंतरावर पंधरावीस घरांची वनवासी लोकांची वस्ती होती. जंगलात फिरायला डिपार्टमेंटकडून मोटारसायकल मिळाली होती. गाडीला किक मारली आणि जोडीला एक शिपाई घेऊन अभय जंगलाची माहिती करून घेण्यासाठी निघाला. फेरफटका मारून झाल्यावर येतांना वस्तीतल्या एका घरासमोर गाडी थांबवली. पाणी पिऊन पुन्हा हाॅफिसला येण्याचा विचार होता. .

ज्या घराजवळ गाडी थांबवली त्या घरातील पन्नाशीच्या आतील स्त्री मातीच्या भांड्यात पाणी घेऊन आली. कमरेला साडी होती. तिने पदर घेतला नव्हता. छाती झाकायला पोळके होते. गळ्यात काहीतर लाकडाच्या मण्यांचे दागिने होते. .

मातीच्या भांड्यातले थंडगार पाणी दोघे पिले. पाणी पिल्यावर तृप्तीचा आनंद दोघांना झाला. त्या स्त्रीने तरूण अभयला पाहिले. उंचपुरा रंगाने गोरा असा अभय सहज कुणाच्याही कोणत्याही स्त्रीच्या मनात भरणारा होता. .स्त्रीने थोड्याश्या वाकड्या नजरेने अभयला पाहिले. आणि बाजूच्या शिपायाला विचारले. .

"दादा !. .साहेब नवा आलाया का ?. .ड्युटीला रानात. ."

शिपाई जुनाच होता. त्याला त्या वस्तीतली माणसं अोळखित होती. .त्याने पण तिला उत्तर दिले. .

"हो दोडके बाय. .आजच आलेत साहेब. आपल्या हद्दीला. ."

मातीचे भांडे शिपायाच्या हातातून परत घेतांना. ती स्त्री पुन्हा म्हणाली. .

"बरं !. .अाता बसा जराक येल म्या जेवायले बनवते. ताज्या माश्याचे कालवण बनवते नि नाचनीच्या भाकर्‍या बनवते."

अभयला पण हायसे वाटले. चला पहिल्या दिवसाला सहज जेवायला मिळते आहे. नाचनीची भाकरी आणि ताज्या माश्याचा मेनू. ऐकूनच अभयच्या तोंडाला पाणी सुटले होते. त्याने तात्काळ होकार दिला. नंतरच्या जेवणाचे नंतर बघू. .शिपायासह अभय त्या झोपडीच्या वसरीवर बसले. .सहज अभयने शिपायाला विचारले. .

"दादा ह्या लोकांना पाणवठ्याची सोय काय ?. ."

शिपाई सांगू लागला. .

"बाजूला एक नदी वाहते. तिला पावसाळ्यात पाणी असते. उन्हाळ्यात कोरडी असते. पण तिला एक डवरा खोदला आहे. त्याच्या तळाला थोडेफार पाणी असते. त्याला एक लहान झरा आहे. पाणी उपसा झाला की एक दोन तास थांबून पाणी साचण्याची वाट पाहची. पाणी साचले की भरून आणायचे. वस्ती लहान असल्याकारणाने पाणी सहज पुरते सर्व वस्तीला. बाकी कपडे वगैर धुवायचे असल्यास. आठवड्यातून महीन्यातून घरातल्या स्त्रीया भल्या पहाटे उठून आठदहा किलोमीटरवर एक नदी आहे. तिकडे जातात. त्यांना यायला संध्याकाळ होते.. "

पाण्याची बिकट समस्या पाहून अभय हळहळला. कठिण शहरी जीवन किती सुखी आहे. सर्व सुखसोई उपलब्ध असतात. .पण अचानक अभयच्या लक्षात आले. .पाणवठ्यांची सोय इतकी दूरवर आहे. मग ही स्त्री ताजे मासे आणि नाचणीची भाकरी बनवते बोलली. मग हिला ताजे मासे नक्की कुठून मिळणार. सहज अभय उठून ती स्त्री काय करते ते पाहू लागला. .

ती स्त्री झोपडीत कुठे दिसली नाही. ती झोपडीच्या मागे कुंपणा जवळ उभी होती. हातात एक लहान मातीचे पातेल्या सारखे भांडे होते. अभयने तिच्या लक्षात येणार नाही अश्या अंतरावर उभे राहून पाहिले. .

तिचा चेहरा मघाशी भेटल्या नंतरचा आणि आताचा वेगळा वाटत होता. डोळ्याची बुब्बुळं पांढर्‍या रंगाची झाली होती. तोंडाने ती काही असभ्य बडबड करीत होती. कुंपण झुडपाचे होते. कुंपणाची अर्धा बोट अाकाराची काटकी तोडून भांड्यात टाकत होती. कुंपणाची काटकी टाकल्यावर भांडे हळत होते. भांडे का हळते म्हणून अभयने बाजूला असलेल्या दगडावर चढून पाहिले. तर कुंपणाच्या निर्जीव काटकीचा जिवंत मासा तयार होत होता. .

तो अश्या जंगलातील घटना अगोदर ऐकून होता. म्हणजे ही बाई आपल्याला अशे चेटूक विद्या केलेले मासे खायला घालणार की काय ?. फक्त कल्पनेने त्याच्या अंगावर काटा उभा राहिला. .तो धावत बाहेर आला. गाडी स्टार्ट केली आणि जोडीला असणार्‍या शिपायाला त्याने आवाज दिला. .

"पळ लवकर. निघ. ."

शिपायाला काही समजले नाही. हा एव्हढा घाईत का निघाला अाहे ?. .शिपाई गाडीवर बसल्यावर अभय थेट कार्यालयात आला. .त्याला झालेला प्रकार एक धक्कादायक वाटला. अश्या भुताटकी करणार्‍या स्त्रीया बद्दल तो ऐकून होता. अभयने खुर्चीत बसताबसता घडलेला प्रकार शिपायाला सांगीतला. ऐकून शिपायाच्या अंगाची लव उभी राहिली. अभयने शिपायाला विचारले. .

"तुम्ही इतके वर्ष इकडे आहात. तुम्हाला असला प्रकार आढळला नाही का ?. ."

शिपाई अभयला सांगू लागला. .

"मला आता तीन वर्ष झाली येथे. एकवेळ अधिकारी सुट्टीवर होता आणि जोडीदार पण आला नव्हता. दुपारच्या जेवणाला मी ह्याच वस्तीमधून कोंबडा विकत घेतला. थोडा भात शिजवला आणि त्याच्या जोडीला कोंबड्याचे कालवण बनवले. .शिजवत असतांना वस्तीतले एक जोडपे येथे आले होते. .मी त्यांच्या समोर स्वयंपाक शिजल्यावर जेवायला बसलो. .त्यांना जंगातली काही लाकडे हवी होती. त्याची संमती घ्यायला ते आले होते. माझे जेवण होई पर्यंत ते समोर बसले होते. .त्यांना मी पास बनवले आणि उद्या साहेब आले की सह्या घेऊन देतो असे सांगीतलं. .दुसर्‍या दिवशी माझा पाय आता आहे त्याच्या चार पट सुजला. खूप त्रास झाला. दुसर्‍या दिवशी जोडीदार आल्यावर घरी गेलो. ."

हे सांगत असता त्याच्या अंगावर काटा उभा राहिला होता. .अभयला काही समजले नाही. दुपारी त्या माणसा समोर जेवण्याचा आणि याचा पाय सुज मारण्याचा काय सबंध. .अभयने पुन्हा विचारले. .

"हे कसे शक्य आहे ?. ."

मला अगोदर विश्वास नव्हता. मी तुम्हाला असे काही सांगून तुमच्या मनात संभ्रम वा भीती नव्हती भरायची. पण आज झालेला प्रकार तुम्ही समोर पाहिला म्हणून सांगतोय. ."

अभयने त्याला कंटिन्यूय करायला सांगीतले. .

"घरी गेल्यावर अनेक उपचार केले. अनेक स्पेशालिष्टांना दाखवले. पण काही उपयोग झाला नाही. पायाची सूज कमी झाली नाही. आणि वेदनाही कमी झाल्या नाही. विश्वास नव्हता पण कुठल्याही उपायाने फरक पडावा म्हणून. माणूस सांगेल तो उपचार करून पहातो. तसेच झाले माझ्या बाबतीत मिसेसला कुणीतरी सांगीतले. ठाण्याच्या शेजारी एका गावात एक फकीर राहतो. तो जर बाहेरचे काही असेल तर अोळखतो आणि उपचार करतो. मग मिसेस सह मी त्या फकीराकडे गेलो. .त्याने बघितल्यावरच सांगीतले. तुम्ही कुठल्या माणसासमोर चिकन खाल्ले आहे का ?. तेव्हा माझ्या लक्षात आले. आपण जेवत असता समोरच्या माणसांना विचारले नाही. फकिराने पायात भरलेले चिकन बाहेर काढले. पाय बरा झाला. त्या फकीराने सांगीतले. त्या माणसांची जाऊन माफी माग म्हणून. त्यांची मग पुन्हा येऊन माफि मागीतली. आणि पाय बरा झाला. ."

अभयला काय बोलावे सुचले नाही. दुसरा शिपाई जो बाहेर गेला होता. तो पण हजर झाला. त्याने सामान ठेवले आणि पाणी पिऊन तो थोडा विसावला. जुना शिपाई त्याला दादा बोलत होते. नवीन आलेल्या शिपायाने अभयशी अोळख करून घेतली. त्याचे नाव तुकाराम होते. तोपण चाळीशीचा होता. आणि दादाची रिटायरमेंट जवळ आली होती. .

दादाने मघाशी घडलेला विषय तुकारामला सांगीतला. त्यावेळेस तुकाराम सांगू लागला. .

"साहेब इकडे जरा सांभाळून रहा बरं !. ."

अभय आता मजाक करण्याच्या मूड आला. .

"म्हणजे तुझ्याकडे पण काही स्टोरी आहे का ?. ."

तुकाराम त्याच्या बोलण्याने थोडा सिरिअस झाला. .

"साहेब तुम्ही वयाने लहान आहात. काही गोष्टीचा अनुभव तुम्हाला नाही. .पण इकडची वस्ती खूप भयानक आहे. ह्या लोकापासून जरा जपून रहा. .पाहिजे तर दादाला विचारा. ."

दादा त्यांच्यामध्ये बोलू लागला. .

"तुकाराम सोड ना !. .नको घेऊ कुठलेही विषय, साहेबांना जरा स्थिर होऊ दे. ."

पण अभयची उत्सुकता शिगेला पोहचली होती. त्याने तुकारामाचा पिच्छा पुरवला. .मग तुकाराम सांगू लागला. .

"साहेब इथल्या स्त्रीयांना एखादा तरूण आवडला तर त्या चेटूक करतात. ."

अभयला आता राहवले नाही. .

"म्हणजे नक्की काय करतात ?. ."

"त्याला अदृश्य करतात. .कोंबडा बकरा किंवा एखादा पाळीव पक्षी किंवा प्राणी बनवून घरात ठेवतात. जेव्हा गरज असेल तेव्हा वापरतात. ."

आता अभय पण आतून घाबरायला लागला होता. पण त्याने बाहेरून दाखवले नाही. .कारण काही वेळापूर्वी त्याने डोळ्याने कुंपणाच्या काटक्यांचे जिवंत मासे होतांना डोळ्याने पाहिले होते. .पहिलाच दिवस होता आजचा. अभयला तर एकवेळ मनातून वाटले. नोकरी सोडून निघून जावे. कुठे येऊन पडलो आहोत आपण. .तेव्हढ्यात कुणीतरी येण्याची चाहूल लागली. .तिघांचे लक्ष दरवाजाकडे गेले. .आणि तिघांना दरदरून घाम फुटला. .

ज्या स्त्रीने मघाशी कुंपणाच्या काटक्यांचे जिवंत मासे केले होते. त्यावेळेस तिच्या डोळ्याच्या काळ्या बुब्बुळांना पांढरे झालेले अभयने पाहिले होते. तिच स्त्री येत होती. हातात मातीचे भांडे होते. त्याला पळसाच्या पानाने झाकले होते. तिला पाहिल्यावर तिघांनी खुर्चीतच अंग चोरून घेतले. .ती स्त्री समोर येऊन उभी होती. .

"मघाशी तुमाले बसाया सांगीतलं तर तुम्ही बसला नाय. .म्हुण म्याच घेऊन आली. गरमागरम भाकर्‍या हायेत नि माश्याचा कालवण हाय. घ्या लगेच खाऊन. ."

भीतीने तिघांची चाळण उडाली होती. तरी दादा बोलला. .

"दोडकेबाय !. .तू जा आम्ही जेवतो. तुकाराम आताच आलाय. त्याला साहेबांना कागद समजून द्यायचे आहेत. ते काम झाले की आम्ही जेवतो. ."

आता तिचे डोळे पांढरे नव्हते. ती पूर्वी सारखीच होती. पण जाताजाता तिने अभयकडे एक कटाक्ष टाकला. त्याच्या जवळ गेली. न लाजता तिने अभयच्या गालाला हात लावला. आणि म्हणाली. .

"तुम्ही जास्त खावा. माझ्या हाताची चव तर घेऊन बघा. ."

अभयने अंग चोरले होते. .तिच्या स्पर्श त्याला आणखी किळसवाणा वाटला. .तरी तिला समजून न देण्यासाठी काहीतरी बोलणं भाग होते. .

"हो हो. .नक्कीच जास्त खाईन. ."

ती पुन्हा गालातल्या गालात हसली आणि निघाली. .

"संध्याकाळी परत येते म्या भांडी घ्यायाले. ."

बापरे ! . .ही पुन्हा येणार आहे. तिला संपूर्ण नजरेआड होऊन दिली. .तिघांनी भांडे उघडून बघितले. आत माश्याचे कालवण होते. लहानलहान अर्ध्या बोटाच्या आकाराचे मासे दिसत होते. .नाचणीच्या भाकरी होत्या. दुपारची वेळ भूक लागली होती. पण हे असे अभद्र जेवण पाहिल्याव जेवायची इच्छा तिघांची मरून गेली. अभयच्या जोडीला घरचा डबा होता आणि तुकारानच्याही. .

त्यांनी ते जेवण उचलले आणि फेकून द्यायचे ठरवले. तर दारात तेथेच रेंगाळणारा कुत्रा त्यांच्या नजरेत पडला. पण त्यांनी जेवण कुत्र्याला न टाकता फेकून द्यायचे ठरवले. .

तुकारामने भांडे उचलले आणि जेवण बाहेर उकिरड्यावर फेकून दिले. भाकरी बाजूला जाऊन पडल्या. भाजी पण खाली सांडली. जेवण फेकल्यावर कुत्रे पण खायला धावले. कुत्रे जसे जवळ गेले. खाली पडलेले मासे जिवंत होऊन फडफड करायला लागले. जसे की आताच त्यांना पाण्यातून बाहेर काढले आहे. कुत्र्याने भाकरीकडे ढुंकूनही पाहिले नाही. तो मासे खायला सरसावला. त्याने एका माश्यावर पंजा मारला आणि तो मासा उंच उडून त्याच्या तोंडासमोर फिरू लागला. कुत्रा त्याच्यावर भुंकून त्याला पकडण्याचा प्रयत्न करू लागला. आता हळूहळू एकएक मासा उंच उडू लागला व कुत्र्याच्या अंगाभोवती फेर धरू लागला. गांधीळ माश्यांच्या झुंडक्या सारखे मासे कुत्र्याच्यासभोवताली फेर धरू लागले. कुत्रे विचित्र आवाज काढून पळू लागले. ते सारे मासे त्याच्या मागे पळू लागले. कुत्रे फाॅरेस्ट आॅफिस पासून दूर पळाले. पण त्याच्या विचित्र विव्हळण्याचा आवाज येत होता. .बराच वेळ कुत्रे विव्हळत होते. नंतर त्याचा आवाज बंद झाला. .

अभयसह दोन शिपाई कुत्र्याला आता काय झाले असेल ते बघायला त्या दिशेने धावले. .त्यांनी कुत्र्याला पाहिले आणि भीतीने अवसान गळून तिघेपण मटकन जमिनीवर बसले. .

कुत्रे मरून पडले होते. त्याच्या पोटाचा सांगाडा शिल्लक राहिला होता. मास कदाचित माश्यांनी खाऊन टाकले होते. रक्ताच्या थारोळ्यात कुत्रे पडले होते. त्याचे डोळे सताड उघडे होते. जबडा वासलेला होता. .

तिघे भीतभीतच कार्यालयात परत आले. झालेल्या प्रकाराने तिघे भयभीत झाले होते. .आता तिची जेवण आणलेली भांडी परत करायची होती. .ते काम तुकारामला दिले. तुकाराम तयार नव्हता पण नाईलाजास्तव त्याला जावे लागले. त्याने मोटारसायकलवर जाऊन भांडी देऊन आला. तुकाराम सुखरूप परत आलेला पाहून दोघांना आनंद झाला. अभयने अधीरतेने विचारले. .

"काय झाले तुकाराम ?. .ती होती का घरात ?. ."

"हो होती. मला विचारले कसे झाले होते जेवण. .मी चांगले झाले होते. एव्हढंच बोललो आणि आलो. ."

सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. आता भुक लागली होती. जोडीला असणारे जेवण तिघांनी केले. समोर असणारी कामे अवरली. तुकारामने अभयला एक लिफाफा दिला. .अभयने लिफाफा उघडला. .वाचून झाल्यावर लिफाफा दोघांना वाचायला दिला. .नवीन काम येऊन ठेपले होते. .

अभयच्या अगोदरचा एक अधिकारी हरवला होता. त्याला पोलिस व डिपार्टमेंटची माणसं शोधून गेली होती. तरी काही सुगावा लागतो का ?. .ते अभय आणि टीमला शोधायला सांगीतले होते. .तुकाराम म्हणाला. .

"कदाचित त्या साहेबांना कोंबडा किंवा बकरा बनवून ठेवले असेल. ."

अभय बोलला. .

"शक्यात नाकारता येत नाही. पण ह्या बाईने मला तारगेट केले अाहे. पण मीपण घाबरून माघार घेणार नाही. ."

अभयला मित्रांच्या जोडीला दारूची सवय होती. त्याने दोघांना सांगीतले. .जोडीला पण तो सोय म्हणून दारू घेऊन आला होता. कारण आता जंगलात त्याला कुणाचे बंधन नव्हते. घरी मित्रांच्या जोडीला चोरून भीतभीतच प्यायला लागायची. आता तो बिनधास्त होता. .

रात्री दारू पिली जेवण केले. तुकाराम आणि दादा दारू पित नव्हते. अभय जास्त दारू पिला आणि झोपला. तिघेही झोपले. भिंतीवरचे घड्याळ टकटक आवाजात त्याचे काम इनामदारीने करीत होते. पंखा घरघर फिरत होता. अभय तर सामसूम झोपला. त्याने दारू पिली होती. त्याला शुद्ध नव्हती. पण आज झाल्या प्रकाराने तुकाराम व दादाला झोप येत नव्हती. .अंधारात भीती वाटते म्हणून त्यांनी लाईटचा दिवा मावळला नव्हता. .मनातील विचार झोप लागून देत नव्हते. दोघांचे कूस बदलणे सुरू होते. .

घड्याळाने बाराचा ठोका दिला. आणि अचानक दादाला आणि तुकारामला भिंतीवर हलचाल दिसली. दोघे भिंतीवर बघू लागले. दरवाजे खिडक्या सर्व बंद केल्या होत्या. .पण छत आणि भिंतीच्या फटीतून काहीतरी येतांना दिसले. प्रथम काळे तोंड आणि नाक दिसले. आता संपूर्ण मान दिसू लागली. ती एक काळी मांजर होती. आता तोंड जमिनीच्या दिशेने करून ती भिंतीवरून खाली उतरत होती. .तिचे पिवळसर रंगाचे डोळे चमकत होते. .दोघांनी तिला हाकलण्याचा प्रयत्न केला. पण ती मागे फिरली नाही. शेवटी तुकाराने काठी घेतली. मांजरीला हाकलायला तो तिच्यावर धावला. तर ती तुकारामवर गुरगुरू लागली. दात काढून त्याच्या अंगावर धाऊ लागली. आता दादनेही हातात काठी घेतली. दरवाजा उघडला आणि मांजरीला बाहेर हुसकवण्याचा प्रयत्न केला. आतली मांजर पळाली नाही. पण बाहेरच्या असंख्य काळ्या रंगाच्या मांजरी आत येऊन दोघंच्यावर गुरगुरू लागल्या. .दोघे घाबरून भिंतीला चिपकून राहिले. संरक्षणार्थ हातात काठी होती. .आता हतबल होऊन पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. .अभय शांत झोपला होता. एव्हढा गदारोळातही तो उठला नव्हता. .

जी भिंतीवरची मांजर होती. ती खाली उतरली होती. आता ती अभयच्या अंगावर चढली. त्याच्या तोंडाजवळ जाऊन तिने जीभ बाहेर काढली. आणि अभयचा चेहरा चाटायला सुरवात केली. .

तोंडात जीभ घालून मांजर अभयला चाटत होती. त्याच्या कपाळाला तिने चाटायला सुरवात केली. कान चाटले. अंगातल्या टीशर्टच्या आत घुसून मांजर अभयला चाटत होती. नंतर तिने त्याने घातलेल्या हाफपँटमध्ये शिरकाव केला. .दादा आणि तुकाराम पहात होते. पण दुसर्‍या मांजरींनी दोघांना रोखून धरले होते. .अभयचे संपूर्ण शरीर चाटून झाल्यावर ती मांजर आल्या पाऊली माघारी निघाली. आणि ह्या दोघांना ज्या मांजरीनी रोखून धरले होते. त्या पण भरभर बाहेर निघून गेल्या. .

तुकारामने दरवाजा नीट लावून घेतला. दादा अभयला हलवून जागे करीत होते. त्याने फक्त हूँ करून प्रतिसाद दिला. .पहाटे हे दोन शिपाई निद्रेच्या स्वाधीन झाले. .

सकाळी पक्षांच्या चिवचिवाट पहाट झाल्याची वर्दी देऊन गेला. अभय त्या दोघांच्या अगोदर जागा झाला. त्याने आवाज देऊन दोघांना उठवले. .तिघांनी तोंड धुतले. कारण अंघोळ करण्या इतपत पाणी उपलब्ध नव्हते. तुकारामने चहा ठेवला. न्याहारीला पोहे बनवले. न्याहरी झाल्यावर तिघे नदीच्या अंगाला फेरफटका मारणार होते. उद्देश हाच फेरफटका मारण्याचे काम होईल आणि येतांना अंघोळ उरकता येईल. .

रात्री घडलेला भयानक प्रकार अभयला सांगीतला. पण अभयचा विश्वासच बसेना. त्याला शुद्ध नव्हती पण ह्या दोघांची भीतीने तारांबळ उडाली होती. .

रात्री घडलेला प्रकार पुन्हा घडला. काळी मांजर येऊ लागली. अभयचे सर्व अंग चाटून जाऊ लागली. तो दारू पिऊन तर्रर्र असायचा. त्याला काही समजत नव्हते. आता या दोघांना सवय झाली होती. अभयला वाटायचे कदाचित हे दोघे मला घाबरवण्याचा प्रयत्न करीत असतील. .

एक दिवस अभयला अंगावर नखांचे व्रण दिसले. त्याने आता या प्रकाराचा छडा लावायचे ठरवले. रात्री तो जेवला पण आज दारू पिला नाही. त्याला रात्री काय प्रकार घडतो. ते जाणून घ्यायचे होते. .

रात्री पुन्हा तोच प्रकार घडला. पण अभय पूर्ण शुद्धीत होता. तो त्या मांजरीला विरोध करीत होता. पण याचा प्रतिकार थिटा पडत होता. जीभेच्या स्पर्श अंगाला गार लागत होता. पण हाताने दूर लोटण्याचा प्रयत्न केला तर मांजर जावा घेत होती. तिला दूर ढकलायला अभयचे बळ कमीच पडले. शेवटी तिला जे करायचे आहे. ते तिने केले आणि ती निघून गेली. रोज असा प्रकार घडतो या बद्दल अभयची खात्री झाली होती. .

आज त्याने काहीतरी ठरवले. आज रात्रीही त्याने दारू न पिण्याचे ठरवले. रात्री तो झोपला आणि पुन्हा तोच प्रकार घडू लागला. मांजर येऊन छातीवर बसली. याने मोका बघून जवळ ठेवलेल्या कोयत्याने मांजरीची मान उडवली. .मांजरीची मान धडा वेगळी झाली होती. .दादा आणि तुकाराम पण आज जागे होते. त्यांनीही घडला प्रकार पाहीला. .पण मांजर गायब झाली होती. .

इकडे ती दोडकीबाय मान तुटून पडली होती. टोपल्याखाली झाकलेल्या कोंबड्याचा माणूस झाला होता. तो लगेच धावत कार्यालयाकडे आला. तो गायब झालेला वनअधिकारी होता.  त्याने येऊन अभय आणि सहकार्‍यांना बातमी सांगीतली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror