Participate in the 3rd Season of STORYMIRROR SCHOOLS WRITING COMPETITION - the BIGGEST Writing Competition in India for School Students & Teachers and win a 2N/3D holiday trip from Club Mahindra
Participate in the 3rd Season of STORYMIRROR SCHOOLS WRITING COMPETITION - the BIGGEST Writing Competition in India for School Students & Teachers and win a 2N/3D holiday trip from Club Mahindra

Prabhakar Pawar

Others


4  

Prabhakar Pawar

Others


सुप्रभात

सुप्रभात

2 mins 212 2 mins 212

कुंद हवा मुजोर झाली. आणि जाणवले मला पांघरूणाच्या हतबलतेचे प्रदर्शन. 'गेलास उडत' म्हणून मीही त्याला झिडकारले. तोंडाचा जबडा काहीसा ताणून आळसास बाजूला केले. गवाक्षाचे तावदान बाजूला सारून छातीठोकपणे मुजोर कुंद हवेला अंगावर घेतली. रोमरोमात वीज संचारल्याची अनुभूती आली. तावदानाला पुन्हा पूर्व स्थितीत आणतांना किंचितसे दूरच उभे केले. तेव्हा सुरक्षित उबदार निवार्‍याची खरी व्याख्या समजली. चिमूटभर फटीतून बाहेरचे विलोभनीय दृश्य पहाण्याचा मोह काही केल्या आवरता आला नाही. थंडीमध्ये पहाटेचे फिरणे कंटाळवाणे वाटते. पण उबदार कपड्यांच्या जोडीला पायताण चढवून दरवाजा कमी आवाज करील अश्या पद्धतीने ढकलून निघालो. उघड्या अंगाला गारठा जबरदस्ती केल्या सारखा झोंबत होता. .तेव्हढ्यात समोरून आई पुजेसाठी फुलं घेऊन आली. वडीलांनी अंगण काचे सारखे लख्ख केले होते. 'एव्हढ्या सकाळी का उठतात ?. .ना काम ना धाम तरी.' मनात आलेले वाक्य उच्चारणार होतो. पण आवरले स्वत:ला. 'पडिले वळण इंद्रिया सकल' आणि सकाळी उठणे शरीरा चांगले असते. त्याचे उत्तम उदाहरण त्यांच्या शिवाय दुसरे कुठले असणार ?. .शेजारच्या वाडग्यात जास्वंद लालेलाल झाली होती. मोठ्या भरगच्च लालबुंद पाकळ्या आणि तसाच लांबडा तुरा शोभिवंत दिसत होता. मला नेहमीच जास्वंद फुले आवडतात. त्यांचे शेकी मिरवणे पाहिले आहे मी. देवपूजेला या फुलांना जादा मागणी आहे. घराघरातील देवघरात गणेशाची मुर्ती आहे. गणेशाला प्रिय लाल फूल आहे. पुढे गेल्यावर तेरडा दिसला. याची फुले लालच होती. या फुलांची वेगळीच धाटणी. एखादी पुडी बांधावी अशी. पण छोटीछोटी लहान फुले अोंजळभरायला आवडतात. सूर्यकिरणात धुके लखलखत होते. एक वेगळाच सोनेरी साज निसर्गावर चढला होता. शेजारच्या मोठ्या झाडावर पक्ष्यांचा किलबिलाट वाढला होता. अन्नाच्या शोधात निघण्यासाठी सूर्य नारायणाची वाट ते पाहत होती. जणू त्यांच्यात चर्चा सुरू होती. कुणी कुण्या दिशेला जायचे. सुर्याला मनोभावे अर्घ्य देऊन एकएक पक्षी आकाशात झेपावत होता. .Rate this content
Log in