Pratibha Chandurkar

Abstract

3.5  

Pratibha Chandurkar

Abstract

भूक

भूक

2 mins
219


सकाळी साडेसहा वाजता दरवाज्याची बेल वाजली. इतक्या सकाळी कोण आलं असेल असा विचार करून अनु ने दरवाजा उघडला. 

तर समोर थकलेली रखमा. " अग. इतक्या लवकर? रोज तर आठ वाजता येतेस की." अनु म्हणाली.

" आज लवकर जाग आली. म्हणून लवकर आले." अस रखमा म्हणाली खरी, पण ती खूपच दमलेली वाटत होती.

रखमा गेल्या महिन्यापासून अनुकडे कामाला येत होती. तिच्या मैत्रिणी कडे काम करायची. मागच्या महिन्यापासून अनुकडे काम करणाऱ्या विठाबाई आजारी पडल्या आणि मग अनुची धावपळ व्हायला लागली.

तिच्याच सोसायटी मधल्या एका मैत्रिणीकडे रखमा काम करत असे. तिनेच रखमाला पाठवलं. रखमा स्वभावाने शांत आणि काम ही खूप छान करायची. 

अनुला तिचं काम, स्वभाव आवडला. 

" माझ्यासाठी चहा करतेय आहे मी. तू ही घे चहा, ब्रेड खावून, दमलेली वाटतेस. काही झालंय का? "

त्यावर रखमा काहीच बोलली नाही. अनुने चहा आणि ब्रेड चे चार स्लाइस तिच्या पुढे ठेवले आणि तिने चहा चा घोट घेतला. 

रखमाला एकदम हुंदका आला. " अग.. काय झालं? " अनुने विचारलं. 

" ताई..लेकर..काल पासून उपाशी हायत. त्यांना नेऊन देते. घशाखाली घास जात नाय बगा." रखमा डोळे पुसत बोलली.

" अस कर..पटकन बटाट्याची भाजी कर. घरी ब्रेड आहे तो राहू दे आणि पैसे देते, अजून दोन ब्रेड ने..पोरांना खाऊ घाल, तू ही खा..मग ये. आज मी सुट्टीवर आहे. आम्हाला ही 

रखमा काही बोलणार तेवढ्यात अनु बोलली, " आता काही बोलू नकोस बर. पटकन कर सगळ. मी ही मदत करते. घरी आहे ब्रेड आणि भाजी ती होईल ब्रेकफास्ट ला. आवर पटकन." 

रखमाने भाजी बनवली. ब्रेड घेतला. पोरांना खाऊ घातलं, स्वतः ही जेवली आणि परत कामाला आली. 

" ताई..काय सांगू. ह्याला दारू लागती प्यायला. घरातले पैसे चोरून नेतो आणि मुत पीत बसतो. " रखमा संतापाने बोलली.

" तसा बरा असतो पण दारू प्यायला की विचारू नका. मैतर बेक्कार हायेत. " ती सांगत होती.

" हे बघ. अस कर. उद्या तुला बँकेत अकाउंट उघडुन देते. सगळ शिकवते. गरज पडली मी माझ्या कडचे घेऊन जात जा. परत अशी उपाशी पोरांना आणि स्वतः लाही ठेऊ नकोस. मला सांगत जा अडचण. लाजू नकोस. हे बघ, बाई सुशिक्षित असो किंवा अशिक्षित तिचा त्रास तिच्या जन्माबरोबर आला असतो. काही काळजी करू नकोस."

आज रखमाच्या पोटाचीच नाही तर माणुसकीची भूक ही भागली होती. 

समाप्त


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract