Pratibha Chandurkar

Abstract Romance

3  

Pratibha Chandurkar

Abstract Romance

गोड अपघात

गोड अपघात

3 mins
152


स्वरा धावतच लिफ्ट मध्ये शिरली.. धावता धावता कोणालातरी धक्का लागला. " सॉरी, सॉरी " म्हणत तीने कोणाला धक्का लागला हे पाहिलंही नाही.

आज स्वराचा इंटरव्ह्यू होता. गेली दोन वर्ष ती तिच्या जुन्या नोकरीला पकली होती. कधी एकदा ती नोकरी सोडते आणि नवीन नोकरी धरते अस तिला झालं होत.

काम ही भरपूर. बॉस ची कटकट. राजकारण तर असतच. ह्या सगळ्याला ती फार कंटाळली होती.

आणि आज नेमका इंटरव्ह्यू देण्यासाठी ती आली, तेव्हा तिला थोडा उशीर झाला होता. म्हणून ती धास्तावली ही होती. 

ऑफिस मध्ये शिरली तेव्हा दहा बारा मुल इंटरव्ह्यू साठी आली होती. तिने रिसेप्शन मध्ये जाऊन विचारलं. तर अजून इंटरवह्यू सुरू झाले न्हवते. तिने देवाचे आभार मानले. 

स्वरा लिमये अस नाव घेतल. " मे आय कम इन" अस म्हणत ती आत शिरली. थोडी सावळी, उंच आणि छान फीचर्स असलेली स्वरा. बघितलं की छाप पाडणारी. बोलणें ही उत्तम. 

" सीट" " अस ती आत गेल्यावर एक वयस्कर साहेब बोलले. ती बसली. समोर तीन पुरुष , दोन वयस्कर आणि एक तरुण असे, आणि एक लेडी होती.

तिला बरेच प्रश्न विचारण्यात आले. तिने सफाईने उत्तर दिली. त्या तरुण व्यक्तींनी तिला एक प्रश्न मिश्किल पणें शेवटी विचारला. " तुम्ही रस्त्यात समोर बघून चालता ना? "

ती गोंधळून गेली." अ. अ..हो" अस बोलली.

" नाही बघत हो तुम्ही. केवढा जोरात धक्का मारलात." खांदा चोळत परत तो मिश्किल हसत बोलला. 

" सॉरी, सॉरी सर..थोडा उशीर झाला ना, त्या गडबडीत आपल्याला धक्का लागला." ती घाईत बोलली.

" इट्स ओके. परत अस करू नका." अस तो हसत बोलला.

तिचं सिलेशन झालं. कंपनी जॉईन केली. काम आणि माणसं तिला आवडली. 

एक दिवशी फाईल घेऊन ती घाईत बॉसच्या केबिन कडे निघाली असताना अचानक समोरून एक व्यक्ती आली आणि परत त्यांचा एकमेकांना धक्का लागला. फाईल खाली पडणार , तितक्यात त्या व्यक्तीने ती शिताफीने पकडली. 

समोर पाहिलं तर तिचं व्यक्ती, इंटरव्ह्यू घेणारी. ती परत " सॉरी" म्हणाली.

बॉसच्या केबिनमध्ये गेली. फाईल ठेवल्या आणि चर्चा करत होती. तेवढ्यात टकटक करून मगाशी धक्का लागलेला तरुण आत आला. 

" डॅडी..आपल्या ऑफिस मध्ये धक्का मारणारे लोकं भेटतात. खास करून मलाच. " अस हसत बोलले.

" स्वरा.. हा माझा लेक राहुल. ह्या कंपनीचा मार्केटिंग डायरेक्टर आहे. बरेच वेळा बाहेरगावी असतो, कंपनीच्या कामासाठी." तिचे बॉस मिस्टर काळे बोलले.

"सॉरी सर..परत एकदा" स्वरा माफीच्या सुरात बोलली.

" सॉरी चालेल पण एका अटीवर. फर्स्ट क्लास चहा हवाय." राहुल हसत बोलला. 

" हो.हो.सर.येस" स्वरा बोलली. 

तिने चहा बनवला. तिघांनी घेतला. बोलता बोलता राहुल ने त्याची आणि तिची माहिती दिली आणि विचारली.

एक दिवस संध्याकाळी स्वराची आई म्हणाली ," आपल्याला एका फॅमिलीला भेटायला जायचं आहे संध्याकाळी. छान तयार हो. डिनर करायचं आहे." 

" ए बाई..कोणी मुलगा बिलगा बघायला येणार आहे का? मला लग्न करायचं नाहीये ह. आधीच सांगते." 

" नाही ग बाई. माझी काय हिंमत, तुला मुलगा दाखवायची? " स्वराची आई हसत बोलली.

डिनर ला टेबल बुक केलं होत. स्वराने गोल्डन कलर आणि त्यावर रेड नक्षी असा वन पिस घातला होता. केस सेट केले होते. हलका मेकअप आणि मॅचींग गळ्यात, कानात, हातात. खूप सुंदर दिसत होती.

थोड्या वेळाने तिथे राहुल, तिचे बॉस मिस्टर काळे सर आणि त्यांची मिसेस आले. 

स्वरा आश्चर्य चकित झाली. पटकन उठून उभी राहिली. " सर. आपण" अस म्हणत.

स्वराच्या आईने काळे सरांच्या पत्नीला मिठी मारली.

ते बघून तर अजूनच आश्चर्य वाटल. 

" ही माझी बाल मैत्रीण विशाखा." अशी स्वराच्या आईने तिची ओळख करून दिली. 

स्वराला आश्चर्याचे धक्के बसत होते. जेवण झालं. आणि शेवटी मिस्टर काळे म्हणाले, " तुम्हाला एकमेकांशी काही बोलायचं आहे का? "

दोघे ही " हो" म्हणाले. 

"चल. गाडीने राऊंड मारू या." राहुल बोलला. गाडीत बसण्यासाठी त्याने दार उघडलं आणि स्वरा गाडीत बसायला जाता जाता तिचा परत राहुलला धक्का लागला. 

सॉरी म्हणायला तिने ओठ विलग केले आणि राहुल ने तिच्या ओठावर हात ठेवला आणि म्हणाला, " हा गोड अपघात मला फार आवडला आहे."

स्वराने लाजून त्या गोड अपघाताला होकार दिला होता.

समाप्त



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract