Pratibha Chandurkar

Horror

3.3  

Pratibha Chandurkar

Horror

पांढरी आकृती

पांढरी आकृती

2 mins
130


आज सकाळपासून वैभवला बेचैन वाटत होत..काहीतरी घडेल अस वाटत ना तसच काहीसं..

आरतीने विचारलं," अरे..काय झालं? अपसेट वाटतो आहेस.. कॅप्टन मोहनला रिक्वेस्ट कर, तुझी ड्युटी कर म्हणून.." 

" नको ग.. तस काही खास कारण नाहीये..कधी कधी अस होत की..जातो मी.." वैभव बोलला..

" अरे.. रजा ही शिल्लक आहेत..घे रेस्ट.." आरती परत बोलली..

" डोन्ट वरी..आय विल बी ओके डियर.." वैभव तिच्या खांद्यावर थोपटत बोलला..

सगळ आवरून निघाला..आज त्याची मुंबई टू बैंगलोर 

फ्लाईट होती..हा आठवडा तरी इंडीयातच फ्लाईट होत्या..

वैभव एका मोठ्या कंपनीत पायलट होता..आकर्षक व्यक्तिमत्त्व आणि हुशार ही..

एअरपोर्ट वर पोचला..नेहमीच्या फॉर्मलिटी पूर्ण केल्या..

आज को पायलट त्याची बेस्ट फ्रेंड नेहा होती..

तिच्या ही लक्षात आल, त्याच अपसेट होणं..तिने फक्त

त्याचा हात हातात घेऊन " मै हू ना " असा विश्वास दिला..

सर्व तयारी झाली... पॅसेंजर बसले.. अनाउन्समेंट झाली..फ्लाईट व्यवस्थित हवेत उडाल..थोड रिलॅक्स वाटल..

मुंबई ते बेंगलोर अंतर साधारण तास, सव्वा तासाच...

अर्धा तास झाला आणि अचानक एक पांढरी आकृती समोरून जाताना दिसली..

सुरवातीला वाटल भास असेल, म्हणून परत आपल्या कामावर लक्ष केंद्रित केलं..नेहाला ही जाणवलं..

थोडा वेळ गेला, परत ती आकृती...

चेहरा नीट दिसत न्हवता..पण भाव जाणवतं होते..कसे? ते माहीत नाही..

अस ही असू शकत..

भीती हा शब्द आत्ता कळला होता..

थंडगार केबिन मध्ये ही त्यांना घाम फुटला..

पायलट हा जॉब डेरिंग आणि तंत्रज्ञान सेव्हीचांच..त्यांनी भीतीकडे , दुर्लक्ष करत आपला प्रवास सुरूच ठेवला..

परत तीच आकृती...

आता ते थोडे सावध झाले.."छोड यार भीती" अस मनात म्हणत आणि पॅसेंजरची जबाबदारी..त्याची ही जाणीव झाली..

आता मात्र ती आकृती समोर आली, पण रागावलेली वाटत होती..काहीतरी सूचित करत होती..

आता मात्र ते दोघे सावध झाले..भीतीची जागा जाणिवेने घेतली होती..

ही आकृती काही तरी सुचवते आहे, हे त्यांच्या लक्षात आलं..

नीट लक्ष पूर्वक पाहिलं तर ती आकृती डाव्या दिशेला हात दाखवत होती..

" मला वाटत, ती दिशा बदल अस सुचवत आहे.." नेहा थोडी भीती, थोडी उत्कंठा अश्या संमिश्र शब्दात बोलली..

" येस..सेम गेस.." वैभव म्हणाला..

" पण तस कळवाव लागेल कंट्रोल रूम ला..अचानक कसा निर्णय घेणार? टू रिस्की.." वैभव बोलला..

आता फ्लाईट हलायला लागलं होत..काही सूचना नाही..अस कस होतंय?

काय करावं? 

सीट बेल्ट फास्टनची सूचना दिली नेहाने..

आता फ्लाईट जास्त जोरात हलायला लागल होत..काय करावं? 

आकृती तेच सांगत होती...

बदलली दिशा वैभवने..

तेवढ्यात काहीतरी सिग्नल आला..अचानक क्लायमेट कंडीशन क्रिटिकल असा मेसेज आला...

" प्लीज फास्ट युवर सीट बेल्ट " ची परत अनाउन्समेंट केली..एअर होस्टेसने चेक केलं..

फ्लाईट जास्तच हलत होत..

आता सगळेच घाबरले...

बरोबर केलं ना असा मनात विचार आला आणि तेवढ्यात, आता डिरेश्कन चेंज करा अशी सूचना आली..

वैभव आणि नेहाने एकमेकांकडे पाहिलं..

आता सगळ स्थिर झालं होत..

आणि ती आकृती परत समोर आली.. चेहऱ्यावर समाधानाची रेषा घेऊन..

तेवढ्यात विमानाची दिशा बदलली गेल्याने ती दिसेनाशी झाली..

वैभव, नेहा तिला शोधत होते...

ती डाव्या बाजूने खाली जात होती, वर बघत..

वैभव आणि नेहाने तिला अंगठा दाखवून 

धन्यवाद अशी खूण केली..

परत तेच भाव...समाधानाचे..कसे? कोण जाणे? 

कुठली तरी अदृश्य शक्ती...

रक्षण करणारी...


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror