ओंजळभर प्रेम
ओंजळभर प्रेम
ती येईल म्हणून तो रोजच त्या झाडाखाली उभा असायचा..ती येतांना दिसली की, गालातल्या गालात हसायचा.त्याच्यासाठी ती एक परीच होती उंचपुरी, ऑफीसात जाणारी स्वप्नातली
ती गोरीपान, सुंदर,हसरी, गुलाबी ड्रेस वाली. तो तिच्या वर खुप प्रेम करायचा..
आईचे प्रेम कसे असते?त्याने पाहिले नव्हते.कारण अनाथाश्रमातला सहा वर्षांचा तो निरागस मुलगा होता. ती रोज येऊन ओंजळभर खाऊ त्याला द्यायची.
तिच्या त्या "ओंजळभर प्रेमातच" तो आईचं प्रेम शोधायचा...