तिरंगा (अलक कथा)
तिरंगा (अलक कथा)
बघा सिग्नलजवळची वेडी काय करते आहे
रोज हिचा काही ना काहीतरी वेडेपणा चालूच असतो.
ती वेडी नाही गं तीच खरी हुशार आहे.
कालचा स्वातंत्र्यदिन संपला
लोकांनी रस्त्यावर, कचऱ्यात फेकलेले झेंडे उचलून ती त्या हुतात्मा स्मारकासमोर जमा करते आहे.
शहाण्यांच्या दुनियेत ही एक
वेडीच खरी शहाण्या सारखी वागते आहे.
