STORYMIRROR

दिपमाला अहिरे

Inspirational

3  

दिपमाला अहिरे

Inspirational

राखाडी रंग आवडीचा (लघुकथा)

राखाडी रंग आवडीचा (लघुकथा)

1 min
14

"अगं हे काय नेहा साखरपुड्याची साडी आहे ती.जरा चांगला रंग तरी घे हिरवा, लाल नकोच तर फिकट गुलाबी तरी घे.हा राखाडी रंग नको गं नाही चांगला वाटणार तो शुभकार्यासाठी."

नेहाची आई नेहाला समजावत होती..त्यांचे सर्व बोलणे नेहाच्या होणाऱ्या भावी सासु बाई ऐकत होत्या..त्याच वेळी त्या साड्यांच्या दालनात गेल्या आणि नेहाने निवडलेली राखाडी रंगाची साडी हातात घेऊन पाहु लागल्या.."छान आहे ना ही साडी नेहाची.तुला आवडली का? अगं राखाडी रंग माझ्या आवडीचा आहे.. आणि तुला ही आवडतो तर तु बिनधास्तपणे ही साडी घे साखर पुड्यासाठी माझी काहीही हरकत नाही.तुझे लग्न आहे तुझी आवड सर्वात आधी महत्वाची आहे..बाकी कुणाचाही विचार करु नकोस." एवढं बोलून सासु बाईंने दुकानदार ला ती साडी पॅक करायला लावली..

आपल्या सासु बाई समजुतदार तर आहेतच पण त्यांची आणि आपली आवडही एक आहे.या गोष्टीचा नेहाला खूप आनंद झाला..


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational