दिपमाला अहिरे

Others

2  

दिपमाला अहिरे

Others

हिरवळ.. लघुकथा

हिरवळ.. लघुकथा

1 min
5


"अहो तात्या तुम्ही तरी समजावा ना आईला दोन दिवसांपासून मी आणि शालीनी सांगतोय तुम्हांला दोघांना..पण तुम्ही आहात की,ऐकायला तयारच नाही..काय ठेवलं आहे इथे या खेड्यात माझ्या सोबत मुंबईला चला ना दोघेही.."

तात्यांचा मुलगा अवी आईवडिलांना आपल्या बरोबर घेऊन जाण्यासाठी आला होता पण त्यांना जायचे नव्हते..ते अवीला म्हणाले 

"अवी बाळा तुझ्या सुट्ट्या वाढताहेत.तु सायंकाळ च्या बस ने जा.आंम्ही तुझ्या सोबत नाही येऊ शकत.आंम्हांला आमचा हा गावच बरा वाटतो गड्या..त्या शहरातल्या दमट हवामानात आंम्ही नाही राहु शकत.. आम्हांला गावाची ही मोकळी हवा आणि आमची माळरानावर ची , आमच्या शेतातील हिरवळ आवडते..आंम्हाला इथेच चांगले वाटते.."


Rate this content
Log in