दिपमाला अहिरे

Tragedy

3  

दिपमाला अहिरे

Tragedy

गुलाब शरबत (लघुकथा)

गुलाब शरबत (लघुकथा)

1 min
7


"आजोबा आता आपण रोज जायचं ना त्या नाक्यावरच्या टपरीवर ते छान गारेगार गुलाब शरबत प्यायला..हो बाळा जाऊयात ना.आता तु आला आहेस ना मग नक्की जाऊया."

मानस दरवर्षी उन्हाळी सुट्टीत आपल्या आजोळी येत असे संपूर्ण उन्हाळी सुट्टी तो आणि आजोबा फीरण्यात,मस्ती करण्यात, खेळण्यात घालवत.. आणि मानस चे सर्वात आवडते गुलाब शरबत प्यायला तर दोघेही रोज सायंकाळी जायचे..

आजोबा मानस ला घेऊन गुलाब घेऊन शरबत प्यायला गेले..

शरबत वाल्याने नेहमी प्रमाणे दोन ग्लास गारेगार शरबत आणुन त्यांच्या पुढ्यात ठेवले..

मानस आनंद घेऊन शरबत पिऊ लागला तो आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता..

आजोबा ने थरथरत्या हाताने ग्लास उचलला आणि एकटक त्याच्याकडे पहात होते... त्यांना पाहुन शरबत वाला बोलला "काय झालं काका काकु ची आठवण आली वाटतं.."

आजोबा बोलले "हो रे बंड्या तुला माहिती आहे ना.हे गुलाबी रंगाचे गुलाब शरबत तिला किती आवडायचे ते? पितांना तिच्या चेहऱ्यावर अगदी लहान मुलासारखा आनंद दिसायचा.. वाटलं नव्हतं ती एवढ्या लवकर साथ सोडून जाईल.. मागच्या वर्षी याच दिवसांमध्ये रोजच यायचो आंम्ही मानस ला घेऊन हे शरबत प्यायला..पण यावर्षी ती सोबत नसेल हे असं कधीच वाटलं नव्हतं रे.."

आजोबांच्या डोळ्यात अश्रू होते. ते त्या गुलाब शरबताच्या ग्लास कडे फक्त पहात होते...


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy