केसर आंबा (लघुकथा)
केसर आंबा (लघुकथा)
"ताई कोकणातला तो केसर आंबा खाण्याची मजा किती यायची ना? मामा होते तेव्हा..? सानीका चे बोलणे ऐकून ताईच्या डोळ्यात पाणी आले..कुणालाही ते दिसु नये म्हणून तिने आपल्या सुरकुतलेल्या हाताने ते अलगद पुसले..
आणि सानिका कडे पाहून म्हणाली
"हो गं अशी मामाला खुप आवडायचा तो केसर आंबा आणि त्याचा केशरी रंग.. कितीवेळा हातात घेऊन तो फक्त त्याच्या सुगंध घेत बसायचा आणि त्याचा तो आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसायचा.. दोन वर्षे झाली.माझा लेक पण येत नाही आणि तो केसर आंबा पण नाही.. त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसते मी अशीच नेहमी.."
एवढेच बोलून ताई पुन्हा शुन्यात पहात बसली..अवीनाश तिचा मोठा मुलगा कोकणात शिक्षक म्हणून नौकरी ला लागला होता...त्याचे गाव खान्देशात... दरवर्षी उन्हाळी सुट्टीत घरी येतांना तो केसर आंब्याच्या पेट्या घेऊन यायचा आपले आईवडील, भाऊ बहिण सर्वांसाठी भाचरां साठी तर ती आनंदाची लयलूट असायची.. दोन वर्षांपूर्वी असाच सुट्टी ल घरी येतांना त्याच्या बसचा अपघात झाला आणि त्याच्यात त्याचा मृत्यू झाला...