दिपमाला अहिरे

Children Stories

2  

दिपमाला अहिरे

Children Stories

निळे आकाश..(लघुकथा)

निळे आकाश..(लघुकथा)

1 min
10


"आकाशातला तो तारा पाहिला का? किती छान चमकतोय ते?एक आई कधी कधी वाटतं तो तारा इथे आपल्या घरात घेऊन यावा.अगदी माझ्या हातात असा..असा... घट्ट पकडून ठेवावा.जसा काजवा चमकतो ना तसाच चमकेल तो."

छोटीशी मिनु छतावर पडुन पडुन आकाशाकडे पहात आईशी बोलत होती..

"हो गं वेडाबाई असं कधी होतंय का तो तारा आणि तुझ्या हातात??तु आणि तुझ्या कल्पना काय करावे बाई?? चला झोप आता सकाळी शाळेसाठी लवकर उठायचे आहे.."

आईने हसुन मीनुच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले.पण ही छोटीशी मिनु हिला त्या निळ्या आकाशाचे आणि त्या चमकणाऱ्या ताऱ्यांचे फार अप्रूप वाटायचे.

त्या निळ्या आकाशाला गवसणी घालण्याचे तिचे स्वप्नं तिने पुर्ण केलेच तर मोठी होऊन एक हुशार पायलट बनुन तिने ते आकाश आणि तारे जणु आपल्या मुठीत घेतले होते...


Rate this content
Log in