Nalanda Satish

Children Stories Tragedy Inspirational

4  

Nalanda Satish

Children Stories Tragedy Inspirational

ती काळरात्र

ती काळरात्र

7 mins
375


क्या हो गया मॅडम, क्यो रो रहे हो,

और इतनी रात को बाहर क्यो बैठे हो

अपनी परेशानी मुझे बताओ .....पुरुषी

आवाज ऐकताच रश्मी भानावर आली,

गडद अंधारातून एखादा प्रकाशाचा किरण यावा तसा रश्मीचा चेहऱ्यावर भाव आला

पण हे काय.............

रश्मी पूर्णतः निःशब्द झाली होती, कुठल्यातरी अकल्पनिय संकटाची चाहूल तिला जाणवत होती,

रश्मीच्या तोंडातुन एक शब्द ही निघेना, रडून रडून चेहरा लालबुंद झाला होता, अवसाद तिच्या चेहऱ्यावर चक्क झळकत होता. काय करावे तिला कळेना,

रात्रीचे दोन वाजले होते आणि ती मुख्य दाराच्या पायरीवर हताश होऊन बसली होती, आतमधून दाराला कडी लागली होती, ती घरात जाईल तरी कशी, रडून रडून डोळ्यातील अश्रूंनी पण दगा दिला होता, काय करावे काहीच सुचेनासे झाले होते, त्यातून मध्यरात्रीच्या तो भीषण अंधार, ते किरकिरणारे किडे, मधेच चौकीदाराच्या काठीचा आवाज, ते कुत्र्याचे अपरिचित भुंकने, मनात येणाऱ्या जीवघेन्या शंका, काही विपरीत तर घडलं नसेल ना..

रश्मी स्वतः च्या मनाचा सतत ठाव घेत होती पण काही केल्या स्वतः ला सांभाळणे तिला कठीण होत होते, सिद्धार्थचा मोबाईल बंद होता, सिद्धार्थचा मोबाईल राहून राहून आउट ऑफ कव्हरेज हाच संदेश देत होता, एवढी हतबल आणि निराश कधीच झाली नव्हती रश्मी , अशी वेळ तिच्यावरही कधीतरी येईल ह्याचा स्वप्नातही तिने विचार केला नव्हता, काळरात्र कशाला म्हणतात ह्याची तिला पूर्ण प्रचिती येत होती. वेळ काही केल्या सरकत नव्हती, एक एक क्षण एका एका युगा सारखा भासत होता, मनातून भेदरलेली रश्मी तीळ तीळ तुटत होती. आज तिचं मन तिलाच खात होतं, कुठून दुर्बुद्धी सुचली आणि प्रमोशन स्वीकारले, जर प्रमोशन घेतले नसते तर आजचा हा दिवसचं वाट्याला आला नसता, रश्मी स्वतः लाच दोषी ठरवत होती, त्याला कारण ही तसंच होतं.......

रश्मीच्या पतीचा फार मोठा व्यवसाय असल्याने सिद्धार्थला वेळीअवेळी बाहेर जावे लागत असे, रश्मीला एकचं बाळ होतं, सिद्धार्थ बाहेरगावी गेला की रश्मी आणि बाळ दोघेच घरी राहत असतं. विभक्त कुटुंबाच्या शोकांतिकेला रश्मी आणि सिद्धार्थ दोघेही बळी पडले होते, सिद्धार्थ निपुण व्यवसायी होता तर रश्मी ही उच्च शिक्षित मल्टिनॅशनल कंपनी मध्ये उच्च पदावर आरूढ होती, कामात तरबेज, चाणाक्ष , विलक्षण बुद्धीमत्तेची रश्मी मालकीण होती, घर आणि कंपनी मध्ये रश्मीचं सामंजस्य वाखाणण्याजोग होतं.

नुकतीच रश्मीला नोकरीमध्ये बढती मिळाली होती, पण बाळाला सोडून बाहेरगावी राहणे रश्मीला पटत नव्हते, म्हणून तिने हेड क्वार्टर बदलून घेतले जेणेकरून ती रोज घरी येऊ शकत होती.

सकाळी आठ ते रात्रीचे आठ असा तिचा नित्यनियमचं झाला होता, घरकामाला बाई होतीच तरी बाळाला आपण पुरेसा वेळ न देण्याची सल तिला नेहमीच सलत होती,

आज अचानक सिद्धार्थाला व्यावसायिक मिटिंग साठी दिल्लीला जाणे भाग होते, मोठा काँट्रॅक्ट साईन करायचा होता, लगेच त्याने रश्मीला "आज रजा घे आणि घरी लवकर परत" चा सल्ला दिला आणि त्याने विमानतळाकडे धाव घेतली.

बाळ घरी एकटे राहील ह्या कल्पनेने रश्मीचे धाबे दणाणले, घडाळ्यात दुपारचे चार वाजले होते, घरी पोहचायला निदान तीन तास तरी लागतील, म्हणजे सातच्या आत घराला आपण पोहचू शकतो हा विचार करून तिने एका झटक्यात रजेचा अर्ज केला आणि मंजुरीची वाट न पाहता झपझप तिने बसस्टॉप गाठले, लगेच तिला बसही मिळाली, बस सुरू झाली आणि रश्मीच्या डोक्यात विचारांचे चक्रीवादळ सुरू झाले, कधी एकदा घरी पोहचते आणि बाळाला बघते असे रश्मीला झाले होते. जसजशी घराची वाट जवळ येत होती तसतशी रश्मीच्या हृदयाची धडधड वाढत होती. , तश्या बाळाला तिने तीन चारदा फोन करून काही सूचना दिल्या होत्या. , पाच वर्षांच्या बाळाकडून तुम्ही अपेक्षा तरी काय करणार , रश्मीचं मूल तसं सामान्य मुलांपेक्षा आणि वयोमानानुसार जास्तचं समंजस होतं.

आता अर्ध्या तासाच्या आत आपण घरी पोहचू ह्या कल्पनेत रश्मी सुखावली. बसच्या खिडकीतून येणाऱ्या गार झुळूकेने तिचा डोळा लागला पण बाहेरच्या कोलाहलामुळे तिची झोप खाडकन उघडली, रस्त्यावर खूप लांब जाम लागला होता, ट्रेन चे फाटक कदाचित बंद असेल असा निष्कर्ष काढून सारे प्रवासी बस सुरू व्हायची वाट पहात होते. रात्र व्हायला सुरुवात झाली होती, बाळ घरी एकटं , काय करावं रश्मीला काहीच सुचत नव्हतं. असेच दोन तास निघून गेलेत. रश्मीला राहवलं नाही, बसच्या खाली उतरून तिने चौकशी सुरू केली, इतर प्रवाश्यांना कडून कळले समोर बस आणि कार चा अपघात झाला होता, जखमी व्यक्तींना दवाखान्यात अंबुलन्स ने हलविण्यात येत होते. प्रवाश्यांची कुजबुज सुरू होती, विरुद्ध दिशेने कुणा नाते वाईकांना बोलावणे ही शक्य नव्हते. , कारण वाहनांची ये-जा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. पोलीस अपघात स्थळाचा पंचनामा करीत होते. रश्मीने परिस्थितीचा अदमास घेतला आणि बाळाला पुन्हा फोनवरून सुचना देण्यास सुरुवात केली, दार बंद करून झोपू नकोस, फोन सुरू ठेव, टिव्ही वर कार्टून लावून बघ म्हणजे झोप येणार नाही, काळजी करू नकोस, काही खाऊन घे, मी घरी आल्यावर तुला तुझ्या आवडीचं करून देईल. बाळ आपलं हो हो करीत होतं,

बाळाचं बोलणं ऐकून रश्मीला हायस व्हायचं, जीवात जीव यायचा.

पहाता पहाता रात्रीचे बारा वाजून गेले, पण अजूनही बस सुरू व्हायची लक्षणे दिसत नव्हती, रश्मीच्या मनात घालमेल होत होती, सगळे प्रवासी वैतागून गेले होते पण रश्मी सारखी मनस्तिथी कुणाचीच नव्हती.

रश्मीला धाय मोकलून रडावस वाटत होतं, ऊर सतत भरून येत होता, पण ती रडू ही शकत नव्हती, तरी डोळे गुपचूप अश्रूंना वाट मोकळी करून देत होते.

कशीबशी बस सुरू झाली, हळूहळू का होईना रश्मीने घर गाठले, रात्रीचा दुसरा प्रहर उलटत होता, रस्त्यावर भयाण शांतता, निर्जन रस्ता पाहून रश्मीचं काळीज धडधड करीत होतं, काही अनिष्ट घडू नये ह्या भीतीने रश्मी दुचाकी भरधाव वेगाने चालवीत होती, घराचे कंपाऊंड दिसताच जीव भांड्यात पडला . घराची डोअरबेल वाजवायला सुरुवात केली, बेल वाजत राहिली आतून काहीच प्रत्युत्तर नाही, पुन्हा पुन्हा बेल वाजवून बेलने वाजने बंद केले. बाळाला हाका मारून मारून रश्मीचा जीव कासावीस झाला होता, शेवटचा उपाय म्हणून दार वाजवायचं काय? शेजारांन्या त्रास तर होणार नाही ना , काळजात कालवाकालव होत होती, अंगात त्राण उरला नव्हता, बाळ आतमध्ये आहे की नाही, काही विपरीत तर घडलं नसेल, हातपाय थरथर कापायला लागले, दरदरून घाम सुटला, दार वाजवून ही काहीच फरक पडला नाही, पण शेजारचा मुलगा जो 22-25 वर्षाचा असेल, जागी झाला, त्याने रश्मीची विचारपूस केली, रश्मीने पूर्ण प्रसंग त्याला सविस्तर सांगितला, बाळ घरात, घरात दुसरं कोणी नाही, बेल बिघडली, मोबाईल ची बॅटरी संपल्यामुळे मोबाईल स्विच ऑफ , अर्धरात्री आई घराबाहेर, एकंदरीत परिस्थिती त्याच्या लक्षात आली, मुख्य दाराव्यतिरिक्त घरात प्रवेश करायला दुसरे दार नव्हते, हे त्यांच्या लक्षात आले.

आप शांत रहीये मै कुछ करता हूँ म्हणून त्याने रश्मीला शांत केले.

कुठली अवदसा सुचली आणि आपण प्रमोशन घेतले ही अपराध भावना रश्मीच्या मनात बळावत होती. रश्मी तशी नास्तिक, कधीच देवपूजा केली नाही किंवा देवाच्या वाटेला गेली नाही, पण आज तिने मनातल्या मनात त्या अदृश्य शक्तीचा धावा केला. , माणूस किती लाचार आणि दुबळा आहे ह्याची प्रचिती रश्मीने पुरेपुर अनुभवली.

तेवड्यात घराचे दार उघडले, समोर तोच शेजारी मुलगा उभा होता. रश्मीने आधी बाळाला पाहिले, टीव्ही सुरूच होता, बाळ वाट पाहून पाहून उपाशीपोटीचं सोफ्यावर झोपलं होतं, बाजूला मोबाईल बंद पडला होता.

रश्मी पार भांबावून गेली होती, तिने फक्त त्या मुलाला धन्यवाद दिला आणि बाळाला छातीशी धरून ओक्साबोक्शी रडली, तिच्या अश्रूंच्या ओलाव्याने बाळ ही उठले आणि आईला पाहून पुन्हा आई आई करत आईला बिलगले. दोघेही मायलेक खाऊन पिऊन झोपी गेले.

सकाळ झाली, रश्मीला अवघडल्या सारखं झालं, काल रात्री ज्या मुलाने आपली मदत केली त्याचे नावं काय, तो घरात कसा शिरला, काहीच विचारले नाही, पुन्हा आभार व्यक्त करण्यासाठी रश्मीने डोअरबेल वाजवली, तर वृद्ध आजीने दार उघडले, रश्मीला आश्चर्य वाटले, ती पुन्हा विचारात पडली, रश्मीने आजीला विचारले, तो मुलगा रात्री ज्याने माझी मदत केली त्याला बोलावता काय,

आजीला काहीच समजले नसावे, तसा अविर्भाव तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

रश्मीने पुन्हा आजीला हिंदी भाषेत विचारले कारण काल तो मुलगा हिंदीत बोलत होता

आंटी आप के बेटे से बात करना हैं, उनको जरा बुलाइये........रश्मीचे शब्द ऐकून आजी थोडी बुचकळ्यात पडल्या सारखी झाली, पण लगेच काही आठवल्यागत बोलली, अरे वो... वो.... मेरा बेटा नहीं हैं, मेरी छोटी बहन का लड़का हैं, कल कुछ कामसे शामको हैदराबाद से आया था, बस रातभर रुका और सुबह की ट्रेन से चला गया., वह कल USA जानेवाला हैं..........व्हाट ?????.. हाउ इट पॉसिबल ??? रश्मी किंचाळली ....पण लगेच भानावर आली....... नाइलाज........रश्मी जड पावलाने घरी परतली, रश्मी अस्वस्थ झाली, त्यादिवशी तिने आकस्मिक रजा घेतली.

सारखा विचार करून करून रश्मीचं डोकं दुखायला लागलं होतं, चौथ्या मजल्यावर फ्लॅट स्कीममध्ये मेन दरवाजा सोडला तर आत शिरायला कुठलाही मार्ग नाही, तो मुलगा घरात कसा शिरला एवढ्या मध्यरात्री, बाल्कनीची खिडकी तेवढी फक्त उघडी होती पण त्या बाल्कनी मधून ह्या बाल्कनी मध्ये ......छे ..छे.... शक्य नाही...... जीवावर बेतण्याचा प्रकार आहे...मग त्याने दाराची कडी कशी काढली............ रश्मीचं डोकं गरगरायला लागलं.... कालचं आला आणि सकाळी निघून पण गेला, ज्याचे आपल्याला नाव ही माहीत नाही .....ती काळरात्र संपून गेली होती पण काळजावरचे व्रण हसत होते अक्राळविक्राळ इशारे करून...........

बाळ शाळेत गेलं होतं, सिध्दार्थ चा फोन अजूनही आऊट ऑफ कव्हरेज दाखवत होता...... कोण होता तो...... रश्मीला काही केल्या उत्तर मिळत नव्हते..... शेवटी रश्मी स्वत:ला सावरत उच्चारली. आणि....उद्गारली तो दुसरा कोणीच नाही माझा देव होता.... माझा देव होता.............. आणि रश्मीने त्या अदृश्य शक्तीला नमन केले मनापासुन......आणि प्रमोशन बॅक साठी अर्ज केला.

समाप्त



Rate this content
Log in