हुंदका
हुंदका
दीर्घाच्या शाळेच्या जेमतेम परीक्षा संपून नुकत्याच उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या. दीर्घा दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची आतुरतेने वाट पहात होती. , कारण ही तशेच होते, प्रत्येक उन्हाळ्यात दीर्घा आणि दीर्घाची आई वर्षा आजोळी जात असत. समीर ला उन्हाळ्याच्या सुट्ट्याचा कधीच उपभोग घेता आला आणि तो घेण्याची शक्यता ही नव्ह्ती. समीर म्हणजे दीर्घाचे वडील शासकीय सेवेत अधिकारी म्हणून काम करत होते, त्यामुळे कामाचा व्याप हा जास्तच असल्यामुळे समीरला सुट्टी घेणे शक्य नव्हते., याउलट वर्षा ही शाळेची शिक्षिका असल्यामुळे तिला दरवर्षी उन्हाळ्याच्या पगारी सुट्ट्या मिळत होत्या. उन्हाळा म्हणजे खाण्यापिण्याची चंगळ. अभ्यासाचा ताप नाही की शाळेत जाण्याची कटकट नाही. मनाला आवडेल ते खाणे, सकाळी उशीरा झोपून उठणे, आपल्या आवडीनुसार टीव्ही वरील कार्यक्रम पाहणे, मैत्रिणी सोबत तासनतास मोबाईल वर गप्पा मारणे , शेवटी काय तर उन्हाळ्याच्या सुट्ट्याचा पुरेपूर मजेशीर उपभोग घेणे. वर्षाचे माहेर हे दुर्गम भागात होते जिथे नक्षलवाद्यांच्या कारवायाचें मुख्य सेंटर होते. ट्रेन शिवाय माहेरी जाण्यासाठी दुसरा मार्ग नव्हता पण वर्षाला कधीच भीती वाटत नव्हती कारण वर्षाला त्या भागाची खडानखडा माहिती होती आणि तिथली मूळ भाषा ही तिला येत होती त्यामुळे ती नेहमीच आश्वस्त असायची. वर्षाच्या लग्नाला जवळपास दहा वर्षे लोटली होती पण माहेरी जाताना कुठलाही कटू प्रसंग घडला नव्हता किंवा तसे काही घडल्याचे तिला आठवत ही नव्हते.
आजोळी जाण्याचा दिवस उजाडला तशी दीर्घाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती, कधी एकदा ट्रेन मध्ये बसते असे तिला झाले होते. , ट्रेन रुळावरून धावतानां पळणारी वृक्षवल्ली, एका मागून एक मागे सरणारी दृश्ये , दऱ्या खोऱ्या, मोठ मोठाले पहाड, सोबत चालणारे ढग आणि वाऱ्याशी गप्पा मारत अंतरिक्षाला फेरी घालणारं मन सैरभैर धावत होतं. वर्षा आणि दीर्घा दोघी मायलेकी ट्रेन पोहोचायच्या आधीच मनाने गावी पोहोचल्या होत्या. मधामधात येणारे फेरीवाले पोटाची भूक वाढवीत होते. दीर्घाची मज्जा सुरू होती, वर्षा आपल्या एकुलत्या एक लेकीच्या इच्छा पूर्ण करण्यात नानुकूर करीत नव्हती. समीर ने टू टियर मध्यें तिकीट आरक्षित केल्यामुळे वर्षा आणि दीर्घाची पूर्ण आरामात प्रवास करण्याची हमी होती.
डब्यातील प्रवासी बऱ्यापैकी सज्जन होते, सगळे आपआपल्या कामात व्यस्त, कुणी मोबाईल फोन वर गुंग तर कुणी आप आपसात गप्पा मारन्यात पटाईत, कुणी खाण्यात मग्न तर कुणी बाहेरचे दृश्य नजरेत साठवून घेत होता, कुणाच्या जुन्या आठवणी ना उजाळा येत होता तर कुणी भूतकाळात वावरून येत होताे, कुणाच्या भविष्याचा कल्पनेचं जाळ विणल्या जात होतं तर कुणी कुंभकर्ण होऊन निद्रेचा आस्वाद घेत होता.
दीर्घा मामाच्या गावाला सुट्टी कशी घालवायची ह्या गुंतागुंतीत होती तेवढ्यात ट्रेनचे कचकचून ब्रेक लागले, डब्ब्यात अंधार पसरला आणि काही कळायच्या आधी तोंडाला मुसके बांधलेले धिप्पाड पंधरा वीस मुसतंडे बोगीत शिरले, त्यांनी प्रवासी लोकांच्या डोक्यावर बंदुका ताणल्या होत्या, तोंडाला गुंडाळलेल्या काळ्या कपड्यातील लालबुंद डोळे भयानक दिसत होते. अचानक झालेल्या हल्ल्यात सगळेच प्रवासी
खूप घाबरून गेले , गाडीत एकचं गोंधळ झाला त्यासोबत भयाण शांतता पसरली, दीर्घा तर इतकी भेदरली की तिची दातकुळीचं बसली, वर्षा हादरली, अकस्मात झालेल्या हल्यात तिला दीर्घाची काळजी कशी घ्यावी, स्वतः ला सावरावे की लेकीला पाहावे, ध्यानीमनी नसतांना घडलेले कृत्य तिला भयानक स्वप्नासारखे भासत होते. पाहता पाहता लुटमार करीत नक्षलवादी ट्रेन मधील प्रवासांच्या जीवावर उठले होते. एक दोन जागरूक नागरिकांनी रेल्वे पोलीसानां संपर्क साधावा म्हणून मोबाईल लावला तर नक्षलवाद्यांनी सर्वांचेच मोबाईल फोन हिसकावून घेतले आणि अंधाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली.
वर्षाचे धाबे दणाणले, लेक अजूनही बेशुद्ध होती, काय करावे कळत नव्हते, कधीही, काहीही विपरीत घडू शकतं या भीतीने तिची जिव्हा जड झाली, तोंडातून एक शब्द फुटेना, अपराध्यांनी प्रवाश्यांकडुन सोनेनाणे, दाग दागिने, पैसे लुटायला केव्हाच सुरुवात केली होती, तेवढ्यात वर्षाजवळ एक नक्षलवादी आला, वर्षी खूप घाबरली पण काय कोण जाणे तिला ते बुरख्यामागचे डोळे ओळखीचे वाटले, तिने आदिवासी भाषेत काहीतरी बोलण्याचा तुटकफूटका प्रयत्न केला, कारण भितीने हुंदका गळ्यात अडकला होता, नक्षलवाद्यानी वर्षाच्या डोक्यावर बंदुक ताणली होती, पण क्षणात काही वेगळेच घडले, त्याने काहीतरी पुटपुट केली, वर्षा काय ते समजली आणि शांत झाली, तिचा सर्व त्राण हळूहळू कमी व्हायला लागला, गाडीला एक झटका लागला आणि क्षणार्धात सारे नक्षलवादी गायब झाले, तोपर्यंत गाडीचे गार्ड येऊन पोहोचले होते, काळ आला होता पण वेळ आली नव्हती, थोडक्यात काय वर्षा आणि दीर्घाचा जीव वाचला. गाडी पुन्हा रुळावर आली आणि हळूहळू वेग धरू लागली, वर्षाचे विचारचक्र सुरु झाले, भूतकाळात जाऊन ती त्या दोन डोळ्यांचा शोध घेऊ लागली, स्मरणशक्तीवर जोर देऊ लागली, ते ओळखीचे वाटणारे डोळे कुणाचे ?? त्याने आपल्या वर हल्ला कां नाही केला ??? त्याने आपल्याला कां सोडले ???
आपलं नशीब बलवत्तर की तो खरचं आपल्या ओळखीचा कोणी होता ???????
डोळे बंद करून वर्षा त्या डोळ्यांचा शोध घेत होती आणि क्षणार्धात तिच्या डोळ्यांमधून अश्रूंची धार लागली, तिला त्या डोळ्यांची ओळख पटली, पहिल्यानंदा तिने माहेरी न कळवता घरी जाण्याचा बेत आखला होता, तिला सरप्राइज द्यायचे होते, पण नियतीने तिला वेगळेच सरप्राईज दिले, ते कोण होते, होय ते वर्षाचे बाबा होते, बाबा------ बाबा----- नक्षलवादी, कसं शक्य आहे, नाही----नाही --- माझी काही चूक तर होत नाही ना --------बाबा---how it possible--- no--- no---- but yes, that eyes---- yes definately --- sure----
जड मनाने वर्षा आणि दीर्घा घरी पोहोचल्या, घरात पाय ठेवताच वर्षाने आईला विचारले, आई ---- बाबा कुठं आहेत गं----आईने प्रश्न ऐकून न ऐकल्या सारखा केला, वर्षाने तोच प्रश्न पुन्हा रिपीट केला, ह्यावेळेस आई उत्तरली
अगं तू कशी काय न सांगता आलीस, आधी कळवायचे तरी, तुझे बाबा टूरवर गेले आहेत, एक दहा दिवस तरी लागतील परत पोहोचायला. वर्षाला बाबांचा टूर कळून चुकला होता, तिने हुंदका गिळण्याचा पुष्कळ प्रयत्न केला पण --------तिला ते जमलेच नाही
वर्षाचे बाबा आज हरवले होते मनामधून----
वर्षा काळजातून किंचाळली बाबा--- बाबा--