विस्थापित
विस्थापित
वर्तमानातील कोरोनाचे सावट आज सर्वं प्राणीमात्रांना वर काळरात्री सारखे पसरले आहे. आज सर्व मानवजातीवरब उपासमारीची वेळ येऊन ठेपली असून या काळात कसे जगावे यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे,,,, कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या गेल्या, लोकं देशोधडीला लागले.. हात आहेत पण त्या हातांना काम नाही... अर्थव्यवस्था कोलमडून पडली...नागरिकांचे विस्थापन झाले..कसा आणि किती हाहाःकार देशात झाला हे उघड्या डोळ्यांनी सर्वानी पाहिले.
मरण किती सोपं असतं आणि जगणं किती कठीण असतं हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करीत असताना किती प्रकर्षाने जाणवतात ......कुठलं स्वातंत्र्य आणि कुठली लोकशाही,,, याच काळात भारतीय संविधानाचा अपमान आणि अवमान होतांना पाहिला,,,, ज्या संविधानामुळे संपूर्ण देश चालतो , याचा अपमान म्हणजे देशद्रोह,,, पण ह्या देशद्रोहाला न जुमानता काही समाजकंटकांनी देशाच्या राजधानीत हेच संविधान जाळण्याचा प्रयत्न केला म्हणजे ह्या पिसाटलेल्या अर्भकांना आवळ न घालता त्यांना प्रोत्साहन दिले जात आहे हे स्पष्टपणे दिसून येते,,,,,सामान्य जनतेला धर्माच्या अफूची गोळी देऊन त्यांना जणू धर्मचं सर्वस्व आहे आणि त्यासाठी मरणे किंवा मारणे हाच एकमेव मार्ग आहे आणि त्यासाठी लोकं एकमेकांच्या जीवनाशी खेळायला तयार झालेत हीच मोठी खेदाची गोष्ट आहे..... आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की अडाणी माणूस जास्त विचारवंत आणि जागरूक वाटतो पण शिकला सवरलेला माणूस मूग गिळून गप्प बसून फक्त आणि फक्त उंटावरून शेळ्या हाकतांना दिसतो.
एक सामान्य माणूस जेव्हा नोकरी नको, भोजन नको पण मंदिर हवे असे बेंबीच्या देठापासून ओरडून ओरडून सांगतो तेव्हा धर्म सत्ता कोणता खेळ खेळत आहे हे कुणाच्याच कसे लक्षात येत नाही, प्रसार माध्यमातून पसरलेले विष लोकांच्या नसानसात भिनल्या गेले. वर्षानुवर्षे विविधतेने नटलेल्या देशात सर्व नागरिक ते मग कुठल्याही जाती धर्म किंवा पंथाचे असोत , प्रेमाने आणि सलोख्याने राहत होते. एका विशिष्ट प्रकारच्या धर्माच्या नावावर अल्पसंख्याक समुदायाच्या लोकांवर सतत टिप्पणी करणे,,,,त्यांचा पूर्वग्रहदूषित मनाने द्वेष करणे, त्यांचं नागरिकत्व नाकारणे, दीन दलित, वंचित, शोषित, अल्पसंख्याक लोकांचा तिरस्कार करणे, त्यांना देशोधडीला लावणे, त्यांच्या जीवनातील आनंद हिरावून घेणे, फक्त जिवंत राहणे हाच विकास आहे.... बुद्धीला गहाण ठेवून कसलाही विचार न करता, शिक्षणाच्या हातावर तुरी देऊन जगण्याचा अधिकार काढून घेणे हेच कटकारस्थान सर्रास दिसत आहे..... कधी कधी वाटते ह्याला कारणीभूत आपणचं तर नाही आहोत ना?????
बाबासाहेब म्हणतात , "आपण आपल्या जीवनाकडे, कर्तव्यधर्माकडे आणि संस्कृती कडे दुर्लक्ष करीत आहोत, थोडे अंतर्मुख होऊन विचार केला तर आपली जीवनमूल्ये आणि सांस्कृतिक मूल्ये कशी करपून जाताहेत याचे भेसूर चित्र डोळ्यासमोर उभे राहील, कारणे काहीही असोत पण आपण अधःपतनाच्या, अवनतीच्या मार्गावरून जात आहोत असेच आढळून येईल, तेव्हा तत्परतेने सावध होऊन आपण आपली मूल्ये जपली पाहिजेत, प्रगतीचे माप करणारी आणि इतिहास दर्शविणारी दोन अस्त्रे आहेत, एक म्हणजे आपली लेखणी आणि दुसरी वाणी,,,,,,," म्हणून जे सत्य आणि समाजाच्या भल्याच असेल मग ते जहाल जरी असले तरी ते लिहावे लागेल आणि बोलावे पण लागेल दुसरा पर्याय नाही हे प्रत्येकाने समजून घेणे गरजेचे आहे.
आज समाजात किंबहुना देशात शिक्षणाचा कंटाळा करणारे आणि खोडकर स्वभावाचे धर्मभिरु लोक 
;जिभेला हाड नसल्याप्रमाणे तोंडात जे आले ते बोलताहेत, कारण कायद्याची जी भीती होती ती संपुष्टात आली आहे, संविधानाची नीतिमूल्ये पायदळी तुडविल्या जात आहे . "सरदार आम्ही ,आम्हाला काय कुणाची भीती" असं एकंदरीत प्रकरण देशात चालू आहे,,,,, कारण साहित्यिक लोकांची मुस्कटदाबी सरकारने सुरू केली,, आणि पांढरपेशा वर्गाला समाजाची तमा उरली नाही....."आम्ही सत्तेत आलो ते संविधान बदलण्यासाठी",,,,,,हिंदू राष्ट्र झालेच पाहिजे,,,,,, तलवारी बाहेर काढाव्या लागतील,,,,पुस्तक बंद करा आणि युद्धाला सज्ज व्हा,,,,,हा प्रकार याच्या आधी एव्हड्या उघडपणे कधीच झाला नव्हता,,,,,,उचलली जीभ लाभली टाळल्या.... . एवढी हिंमत येते कुठून?????ही वादग्रस्त मुक्ताफळे सर्रास टेलिव्हिजन दाखवली जाते तरी पोलीस कार्यवाही होत नाही,, याला काय समजावे????? जे तथाकथित लोकं स्वतःला अध्यात्मिक समजतात त्यांना शासन प्रशासनाच्या कामाचे एवढे काय अप्रूप असायला पाहिजे,,,,,, तुम्ही अध्यात्मिक अभ्यास करून स्वतःचे कल्याण करा,,,,,मोक्ष प्राप्त करा,,,,शासन प्रशासन सांसारिक लोकांसाठी राहू द्या ना,,,,,,पण नाही..... कारण सत्ता हातात असली तर कायदा मुठीत असतो,,,,न्यायव्यवस्था तुमच्या बाजूने काम करते आणि आपण आपले उद्दिष्ट साध्य करण्यात यशस्वी होतो..... एका विशिष्ट वर्गाला संविधानाची चीड आधीपासूनच आहे,,,,,येनकेन प्रकारे कसेही करून सत्तेत आलो की वादग्रस्त विधाने करून लोकांचा गैरवापर करून समाजात तेढ निर्माण करणे.... धर्माच्या नादी लावणे,,,,,शिक्षणाचा बट्ट्याबोळ करणे,,,,,,,हळूहळू बुद्धीचा विकास अवरुद्ध करून देशाला गर्तेत ढकलणे हा प्रकार फार किळसवाणा आहे . जगाची भरभराट होत असताना आपले तथाकथित राजकीय नेते जातीच्या आणि धर्माच्या जाळ्यात लोकांना अडकवून , जातीजाती मध्ये वितुष्ट निर्माण करून राग व द्वेषाचे वातावरण निर्माण करून नेमके काय साध्य करणार आहेत कोणास ठाऊक. ,हे असे वागणे म्हणजे स्वतः स्वतःचे पंख कापून ते वाऱ्यावर फेकून देण्यासारखेच आहेत....ह्याचा एकदा तरी ह्या राजकिय नेत्यांनी आढावा घ्यावा. ह्या घडीला देशाची एकरूपता, एकसंधता पार विस्कळीत झाली आहे.......
ह्याचे आकलन बाबासाहेबांना आधीच झाले होते, ते खूप मोठे द्रष्टे होते ,ते म्हणतात "The entire destiny of the society depends upon the intellectual class of the society......आपले उद्दिष्ट काय आहे ते नीट समजून घ्या. शासनकर्ती जमात बनणे हेच आमचे उद्दिष्ट व आकांशा हे तुमच्या मनात ठसू द्या....तुमच्या घराच्या भिंतीवर ते कोरून ठेवा म्हणजे दररोज तुम्हाला आठवण राहील.... थोड्याश्या नोकऱ्यांसाठी किंवा सवलतींसाठी आपला लढा नाही..... आमच्या अंतःकरणातील आकांशा फार मोठ्या आहेत.... शासनकर्ती जमात बनणे हीच आमची आकांक्षा आहे, म्हणून दुखीतांचे तप्त अश्रू पुसण्यासाठी तुमचे नेत्र झरले पाहिजेत,,,,रंजल्या गांजलेल्याच्या सेवेसाठी तुमचे हृदय पाझरले पाहिजेत, आणि संकटग्रस्तांच्या रक्षणासाठी तुमचे बाहू स्फुरले पाहिजेत" बाबांचा हा संदेश काळजात कोरून ठेवला पाहिजे प्रत्येकाने.... तरच येणारी पिढी भविष्याचा वेध घेईल., आम्हाला फार मोठ्या दिव्यातून जावे लागेल.... जी एकंदरीत आजची परिस्थिती निर्माण झाली आहे ही फार कठीण,अवघड आणि न भरणारी क्षती आहे.....आपल्याला फार संयमाने आणि विचारपूर्वक समोरचे पाऊल उचलावे लागेल.... कुणाचाही तिरस्कार न करता हा समानतेचा रथ पुढे हाकावा लागेल त्याशिवाय दुसरा काहीही मार्ग नाही., अन्यथा सामाजिक विषमतेने देश उध्वस्त होईल