आई
आई
माय ती ज्वलंत प्रखर
उपाय रामबाण समस्त रोगांवर
कडु निंबाचा पाला कधी कधी
अचूक जसा जीर्ण ज्वरांवर
मायची महती काय सांगावी ,एकच शब्द पुरे मायसाठी......माय ही माय असते आणखी दुसरे काहीच नसते-------आई हा शब्दचं एव्हढा पवित्र आहे की आई उदगारताच करुणेची मूर्ती डोळ्यासमोर उभी ठाकते... शिवबांची जिजाई , राहुलची यशोधरा,कृष्णाची यशोदा ,हिरकणी.... मायमाऊली ती कुणाचीच असो ,गरीब असो की श्रीमंत, राहती असो वा भटकंती, लहान असो वा मोठी, काळी असो वा गोरी, सुशिक्षित असो किंवा अनाडी, देशातील असो वा परदेशातील, माय ती मायचं असते.......तिची माया अपरंपार--- तिची छाया आपल्या लेकरांवर एकसारखीचं असते.म्हणूनच म्हणतात ना
जिच्या हाती पाळण्याची दोरी
ती जगाला उध्दारी
लेकरू हे आईसाठी काळजाचा तुकडा जणू--------आई ही सदा लेकरांची काळजी करणारी, त्याच्या चूका पोटात घालणारी, पदराखाली लपवणारी, मायेच्या पावसात चिंब भिजवणारी, डोळ्यांमधूनी लेकरांच्या संपूर्ण चित्रपट सृष्टी बघणारी, नुसत्या स्पर्शाने बाळाच्या वेदना जाणून घेणारी, बदलणाऱ्या ऋतूपासून हिवाळा-उन्हाळ्याचे चटके सोसणारी, उपाशीतापाशी राहून मुलांना भरपेट जेवू घालणारी, मुलांच्या सुखसोयी साठी हेलपाटे खाणारी, काही नडल्यास देवाला ही न सोडणारी ती माऊली मायचं असते.
जगाच्या पाठीवर देव ही जिच्या क्रोधाला घाबरत असेल ती माय असते.
माय असते दुधावरची साय.....
चालतं बोलतं विद्यापीठ......जीवनाचा अनमोल ठेवा.... जीवनात ,रक्तात, हाडांमासात, नसानसात, जळी ,स्थळी, काष्टी ,पाषाणी भिनलेली...हिऱ्यापेक्षा हिरा कोहिनूर ही तो फिका असतो मायपुढे...
प्रेमाची व्याख्या शिकावी माय कडून..
वात्सल्य काय असतं शिकावं मायकडून...मायेची ममता दगडाला पाझर फोडते एव्हढे सामर्थ तिच्या ममतेत असते... दयासागर , करुणेची घागर ----तिच्या सानिध्यात जीवन हे आपले नंदनवन आहे.
आईची माया काय वर्णावी , आई ह्या शब्दातचं आसवांन भिजलेलं बाळपण
आहे. गर्भात जीवनाचा अंकुरापासून जीवनाची सायंकाळ होईस्तोवर आई लेकराला प्रत्येक क्षण जपते., म्हणूनच म्हणतात ना-----
मायबाप आहे ज्याच्यापाशी त्याने न पहावी काबा काशी!!!
माय किंवा आई दोन शब्दांची जोडी, ती मग पशु पक्ष्यांची असो किंवा मानव जातीची भावना ,वेदना ,संवेदना ,सहनशीलता, लेकरांना जगविण्याची जिजीविषा तिच्या अंगात असते. एरवी नाजूक साजूक दिसणारी माय संकट आले की वाघीणी सारखी डरकाळी फोडते. कुठल्याही आणि कसलेही जीवघेणे प्रसंग असो ती काडीचाही विचार न करता सामोरी जाते.
बाप गेला तर माय संसाराचं रहाटग
ाडगं जीवनाच्या संघर्षाला न जुमानता एकटीचं मुलांचं संगोपन करते.....मुलांची ती मायबाप दोहेरी भूमिका वठवते. माय मध्ये जिद्द असते लेकरांना घडविण्याची------------
आणि लेकरं घडतात, ती करून दाखवते जसे माता जिजाई ने स्वराज्याला छत्रपती दिले. याउलट माय गेली तर बापाला लेकरं सांभाळता सांभाळता नाकी नऊ येतात.
पुरुष दोन्ही जबाबदाऱ्या एकाच वेळी नाही पेलू शकत. अपवाद असतो एखादा ते वेगळे पण 99% बाप दुसरं लग्न करून मोकळा होतो. बापाचं प्रेम द्यायला तो कोताही नाही करत पण मायची माया देने नाही जमत त्याला., म्हणून स्त्री जे सोसते, जे भोगते , ते तीच करू शकते------
आई माझी हो आहे आमराईचा मळा
गोड गोड निम्बाची कौसम्बी
चुका घालते पोटात खाण वात्सल्याची
मला वाटते ती जणु वडाची पारंबी
आई विना कल्पनाच नाही जगन्याला
दुधारी प्रेमळ वाहता सागर करुणेचा
पदराचा तिचा आडोसा जशी भिंत मजबुत
मला वाटते ती नक्षत्र जणू आकाशगंगेचा
आई ही आईचं असते आणखी दुसरे काहींचं नसते. आई जशी धरणीमाय, सगळं सोसून पोटात घालते. काम करून कितीही दमली असली तरी तिच्या चेहऱ्यावर जराही थकल्याचे भाव येत नाही, विसावा न घेता अहोरात्र कुटुंबाची धुरा आपल्या खांद्यावर वाहत असते . माऊलीचा चेहरा नेहमी हसरा, निरागस, निर्मळ, स्थितप्रज्ञ असतो, अगदी देवालाही लाजविल अशी करुणामयी जागती जिवंत मूर्ती . निरपेक्ष भावनेनं , निस्वार्थी मनानं कोणत्याही गोष्टीचा फायदा तोटा न बघता प्रामाणिकपणे घरच्यांची अविरत सेवा करते.पोटच्या पोरासाठी माय ही कडेकोट किल्ला उतरते, जीवाची तमा न बाळगता, उरी एकचं ध्यास , बाळं एकटं घरी आणि मला जायलाच पाहिजे मग कितिही संकटांना सामोरे जावे लागले तरी बेहत्तर-----अशी असते माय----न भूतो न भविष्यती -------ज्या मातेचा सत्कार शिवाजी महाराजांनी हिरकणी नांव संबोधून केला---- केवढं मोठं साहस, केवढी मोठी हिम्मत----त्या माऊलीची----आणि हे फक्त आणि फक्त मायचं करू शकते !!!
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी
उगाचंच नाही म्हंटल---तिच्या बोलण्यात प्रेम, वागण्यात प्रेम, रागात प्रेम, तिचं प्रेम हे प्रत्येक गोष्टींमधून व्यक्त होतं. आपल्याजवळ पाहिजे असते फक्त नजर ओळखायसाठी. एक माय ती आपली आणि दुसरी माय धरणीमाय, तीही तशीच , काळ्या मातीचं लेणं लेवून आमच्या साठी धान्य पिकविते--- आपली अन्नपूर्णा---पाणी पाऊस, उन्हाळे, हिवाळे, भूकंप, महापूर, दुष्काळ सहन करून आमचे जीवनयापन करते. एक नैसर्गिक वसुंधरा आणि दुसरी आई नावाची वसुंधरा दोघींची प्रकुर्ती एकचं.
जगविण्याची, घडविण्याची, देत राहण्याची कुठलीही अपेक्षा न करता---