स्वयंसिद्धा
स्वयंसिद्धा
आज प्रिया न संपणाऱ्या दुःखात नखशिखांत बुडली होती. आज तिच्या पतीचा देहांत झाला होता. रडून रडून तिचे डोळे सुजले होते. केसं विस्कळीत झाले होते. आप्त नातेवाईक, ऑफिस मधले सहकारी, सर्वच आज प्रियाला सात्वना द्यायला आले होते. प्रिया पण मागच्या 22 वर्षांपासून नोकरी करीत होती. प्रियाचा नवरा पण मागील 25 वर्षांपासून अन्न पुरवठा निगम मध्ये नोकरीत होता.
प्रिया च्या लग्नाला जवळपास 28 वर्ष झाले होते. पण प्रियाला कधीच कुटुंबाचं सुख मिळालं नव्हत. प्रियाला दोन मुलं होती, होती काय झाली नाही म्हणता म्हणता. आई व्हायचं सुख मिळालं पण पत्नीचा मान सन्मान कधी ना मिळाला.
प्रकाश प्रियाचा म्हणायला फक्त नवरा होता लोकांसाठी पण घराच्या चार भिंतीत ते एकमेकांसाठी अनोळखी होते.
शरीराची भूक बायको कडून भागवावी बस्स एव्हढीच प्रिया त्याला हवी असे.
प्रकाश च्या निधनानंतर ही प्रियाला तिला मिळणारे फायदे मिळाले नव्हते, कारण पत्नी म्हणून प्रकाशने तिला सर्विस रेकॉर्ड वर नॉमिनी म्हणून नमूद केले नव्हते.
कारण त्याला त्याच्या मनासारखी बायको मिळाली नव्हती. जिच्यावर त्याच प्रेम होतं तिने दुसऱ्या सोबत लग्न केलं होतं.
नाईलाजास्तव आईवडीलांच्या आग्रहाखातर प्रकाशने प
्रियाशी लग्नाला होकार दिला होता. पण मनाने तो तिच्याधी कधीही एकरूप होऊ शकला नाही.
जाता जाता निवृत्तीचे फायदे ही तो तिला देऊ शकला नाहीं. पत्नी म्हणून प्रियाला रेकॉर्ड वर नमूद करणे त्याला जमलेच नाही.
ह्यात प्रियाची काय चूक होती. प्रकाश च्या मनात दुसरी प्रेयसी होती तर त्याने प्रियाशी लग्न करायलाचं नको होतं. प्रियाचं जीवन नरक बनवून प्रकाशला काय मिळालं. ,
वरून तोंड दाबून बुक्यांचा मार.
आजही स्त्रीला तिच्या मनानुसार नवरा निवडता येत नाही. समाजात नवऱ्याशिवाय काहीच मानाचं स्थान नाही.
नवऱ्याने बायकोला टाकले तर स्त्रीच्याच चारित्र्यावर शिंतोडे उडवायला कोणीच मागेपुढे पहात नाही.
वरवरून चित्र जरी बदलल्या सारखे वाटत असले तरी समाजाची, पुरुषांची मन स्तिथी होती तशीच जैसेथे आहे.
उलट तिची स्तिथी अजूनच हलाखीची झाली आहे. घराचा त्राण, ऑफिस चा त्राण, स्वतः ची तब्बेत, हक्काच्या गोष्टी नाही,नातेवाईकांच घेणेदेणे सर्वच तारेवरची करसत झाली आहे. त्यावर नवऱ्याची मर्जी सांभाळणे म्हणजे स्त्री , स्त्री न राहून मशिन बनून गेली आहे.
म्हणून सध्याच्या स्तिथीत तरी महिला स्वयंसिद्ध झाली नाही. तिला अजून वाट पहावी लागेल. संघर्ष करावा लागेल.