मोबाईलचे वेड
मोबाईलचे वेड
1 min
873
एक आजी आपल्या नातीला म्हणाली."मुग्धा मला पाणी आण बाळा". त्यावर मुग्धा म्हणाली "काय गं आजी? "मी टीकटॉक बघतेय ना" उठून घे तू...! तेवढ्यात मुग्धाचे बोलणे आईने ऐकले.आणि आई हातात लाटणंच घेऊन बाहेर आली.तशी मुग्धा चटकन उठली.पळत स्वयपाकघरात जाऊन पाण्याचा ग्लास आजीच्या हातावर ठेवला.आई मुग्धाला म्हणाली. "माणसांपेक्षा टिकटॉक प्रिय आहे का? आण तो मोबाईल...!" मुग्धा शरमेने मान खाली घालून निघून गेली.
