सूनबाई
सूनबाई
एकाच घरात दोन चुली करून घराला वेगळे करून सासू सासऱ्यापासुन वेगळं राहण्यासाठी प्रयत्न करणारी सून आज अचानक सासू सासऱ्यावर अतोनात जीव ओतीत होती... काजू बदाम खायला आणून देत होती... नवीन कपडे, साडी व सहा महिन्यांपासून तुटलेला चष्मा नीट करून आणून देत होती... वृद्ध झालेल्या म्हाताऱ्या माणसाची हल्ली इतकी काळजी... काही रहस्यच कळत नव्हतं... तेवढ्यात वृद्धाश्रमातून फोन आला... दोन जागा रिक्त आहेत... आपण मागे विचारायला आला होतात... म्हणून सांगितले..!