मधू (अलक)
मधू (अलक)
1 min
682
एके दिवशी मधूच्या बाबांनी मधूला बाहेरुन आवाज दिला."मधू काय करतेस?" "ही पिशवी घे बाळा!" तेवढ्यात मधू बाहेर आली आणि बाबाला म्हणाली "काय हो बाबा! "तुम्हाला किती वेळा सांगितले आहे की बाहेर जाताना तोंडाला मास्क लावा म्हणून!" बाबा म्हणाले अरे काय होतंय? "मी गावातच गेलो होतो भाजीपाला आणायला." त्यावर मधूने घरात जाऊन हॅन्डवॉश आणून बाबांच्या हातावर ठेवत म्हणाली..."मला तुम्ही पाहिजेत शेवटपर्यंत...!" बाबा स्तब्धपणे उभे पाहातच राहिले.आपली मुलगी केवढी काळजी घेते याचं समाधान ही वाटलं...