बाळू आणि आजी
बाळू आणि आजी
अलक (अति लघू कथा)
एका गावात आठ वर्षांचा बाळू आणि त्याची म्हातारी आजी राहत होती.बाळूचे आईवडील बालपणीच मरण पावले होते.त्यामुळे बाळुला आजीच सांभाळायची.आजीने बाळुवर खूप चांगले संस्कार केले होते.एक दिवस बाळू बाजारात गेल्यावर त्याला सोन्याची अंगठी सापडली.बाळुची परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना सुध्दा बाळुने ती अंगठी पोलीसांना दिली.पोलिस बाळुला घेऊन घरी आले.पोलिसांना पाहून आजीचा चेहरा गंभीर झाला होता.पण पोलिसांनी बाळुचा प्रामाणिकपणा सांगितल्यावर आजीचा ऊर अभिमानाने भरून आला.आजीला सार्थक झाल्याचं वाटलं.
तात्पर्य- चांगले संस्कार दिल्यावर चांगलेच घडते