MEENAKSHEE P NAGRALE

Tragedy Others

3  

MEENAKSHEE P NAGRALE

Tragedy Others

स्त्रीभ्रूणहत्या मोठं पाप

स्त्रीभ्रूणहत्या मोठं पाप

3 mins
494


स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी शासनाने अनेक उपाययोजना केल्या.मोठ्या प्रमाणपत्र अनेक सामाजिक संस्थानी अटोकाट प्रयत्न केले.लींगभेद ओळखणा-या मशिनी बंद केल्या हे जरी खरे असले तरीही आजसुद्धा लपून छपून लींगभेद चाचणी करणा-या टोळ्या सर्रासपणे सुरूच आहेत.आजही कित्येक मुलींना जन्माला येण्याअगोदरच गर्भातच मारलं जातं ही खरंच खूप लाजिरवाणी गोष्ट आहे.आज सुशिक्षित लोकं सुध्दा अमाप पैसा टाकून लींगभेद चाचणी लपून छपून करून घेतात आणि मुलगी असली की तिची गर्भातच हत्या केली जाते.म्हणून तर येणाऱ्या काळामध्ये परत मुलीचं प्रमाण कमी होणार.ग्रामिण भागामधले लोक सुद्धा शहरात जाऊन चाचण्या करतात आणि स्त्रीभ्रूणहत्येच पाप आपल्या माथी घेऊन फिरतात.चारचौघात मोठ्या दिमाखाने सांगतात.मुलगामुलगी एकसमानच आहेत.आणि हेच दोन तीन मुली मारलेला असतात.एका स्त्री अर्भकाची हत्या करणं म्हणजे १०० गायींना मारल्याच पाप आपल्या माथ्यावर घेऊन फिरणं.कुठं फेडणार हे पाप? याचा कुणीच विचार करत नाही की विचार करण्याची त्यांची गरजच वाटत नाही.खूप मोठी शोकांतिका आहे.

     जसा मुलगा वंशाचा दिवा आहे तशी मुलगी वंशाची पणती आहे.एक वेळ दिवा लवकर विझतो पण पणती तेवत राहते एकसारखी.मुलगी दोन्ही घरात प्रकाश देते इतकेच नाही तर आज आपण पहातो की प्रत्येक क्षेत्रामध्ये मुली अव्वल ठरलेल्या आहेत.प्रत्येक वर्षी दहावी बारावीच्या बोर्डात पहिल्या मुलीच येत आहेत.

     मुलांपेक्षा मुलगी बरी

     प्रकाश देते दोन्ही घरी...!!

 या वरील उक्तीप्रमाणे मुलांपेक्षा मुलीच आपल्याला जास्त जीव लावतात.कोणत्याही क्षणी आईवडीलांसाठी काहीही करायला मुली लगेच तयार होतात.एक नाही तर माहेर आणि सासर दोन्ही घर सांभाळतात.प्रत्येक पुरूषाचा जन्म स्त्रीच्या कुशीतच होतो मग त्याच स्त्रीची हत्या का केली जाते? हे कुठंतरी थांबायला हवं.जे हॉस्पिटल मध्ये फक्त बाहेर बोर्ड असतो इथे लींगभेंद चाचणी केली जात नाही.लींगभेद चाचणी करणे कायद्याने गुन्हा आहे.आणि पेशंटसोबत सलामसलत होते शिजवणारे आपली दाळ शिजवून घेतात.सर्वच ठिकाणी लींगभेद चाचणी होतेच असं नाही काही अपदाव ही असतील...पण प्रत्येक जिल्ह्यात कुठं ना कुठं लपून छपून स्त्रीभ्रूणहत्या करण्याचं काम चालूच आहे.पुर्वी स्त्रीभ्रूणहत्या करूध बाहेर फेकलं जायचं त्यामुळे सर्व लोकांना ते माहीत पडलं.आता तर मारलेलं स्त्रीभृण दवाखान्यातच योग्य विल्हेवाट लावली जाते.त्यामुळे जगाला दिसण्याचा प्रश्नच नाही.प्रत्येक पालकांनी जर ठरवलं मी हे असलं पाप करणारच नाही तर स्त्रीभ्रूणहत्या होणारच नाहीत.पण पालकांना मुलगा सून सांभाळेल याची शाश्वती असल्यासारखे मुलींची हत्या करतात.आज अनेक वृध्दाश्रम आहेत.का आहेत? ज्याला कोणीच नातेवाईक नाहीत अशा लोकांसाठी वृध्दाश्रम असावेत.पण सर्रासपणे आजकाल वृध्दाश्रमात मुलं मुली असणारे पालक राहतात कारण त्यांना आई-वडील नको वाटतात.ज्या आईवडीलांनी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी हाडाची काडं करतात.तेच मुलं म्हातारपणी आई वडीलांपासून विभक्त राहतात.या सारखं माठं दुर्दैव दुसरं नाही.

      मुलींना ओढ,जिव्हाळा,माया खूप असते.मुली भावनिक असतात, संवेदनशील असतात.एकवेळ मुलगा जन्मदात्यांना टाकून देईल पण मुलगी नाही.स्त्रीभृणहत्या करणा-या मध्ये शिकले सवरलेल्या लोकांचं प्रमाण जास्त आहे.आजही काही भागात मुलगा झाला की थाटामाटात स्वागत केलं जातं.घरोघरी पान साखर वाटली जाते.बॅंडबाजा वाजवला जातो,पेढे वाटले जातात.मग हा मुलीसोबत भेदभाव नाही का? मुलींच का थाटामाटात स्वागत केलं जात नाही.बरेच पालक दोन मुलींवर खूश असतात.पण अशा खूश पालकांना हा समाज कायम टोमणे मारत असतो.कुणासाठी करताय एव्हढं? त्यांना कोण आहे मागेपुढे? याला मुलगाच नाही? यांना वंशाला दिवाच नाही.ही मानसिकता लोकांची बदलली पाहिजे.तरच समाज ख-या अर्थाने जागृत होईल.पापपुण्याचा हिशोब करायला स्वार्थानं बरबटलेल्या लोकांकडे अजिबात वेळ नाही.पण सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे.मुलगा असो वा मुलगी आपल्या सोबत अंतीम समयी कुणीच येणार नाही.ही सर्व मोहमाया आहे.आज कितीतरी वृध्दांना मुलगा -सून,मुलगी जावई असून सुद्धा वृध्दाश्रमात रहावं लागतं.खरच खूप मोठी शोकांतिका आहे.पहिले व दुसरे अशी दोनच अपत्य असावे मग ते जे असेल ते.ज्यांना मुलगा होण्यासाठी खूप मुलींचा जीव घेणा-या पालकांनाच स्वतःची मुलं सांभाळत नाहीत.मुलगा-मुलगी भेद करण्यापेक्षा मुलांवर चांगले संस्कार करा.माणुसकी शिकवा.माणूस बनायला शिकवा.त्यांच्यावर चांगले संस्कार करा.त्याच्यामुळे लोकं तुम्हाला ओळखायला लागतील.अशी वागणूक म्हणजे समानतेची वागणूक ठेवा.मुलामुलींना दोघांनाही शिकवा हीच तुमची खरी कमाई आहे.म्हणून स्त्रीभ्रूणहत्या थांबवण्यासाठी चांगले विचारांची गरज आहे.चांगले आचारविचार ठेवा.स्त्रीभृणहत्येचं पाप आयुष्यभर माथ्यावर घेऊन फिरू नका.त्यासाठी मनपरिवर्तनाची खरी गरज आहे.ज्यांना फक्त मुलीच आहेत ते खरंच खूप नशिबवान आहेत.किस्मतवालोंको मिलती है बेटीयाॅं..या उक्तीप्रमाणे ज्यांना मुलगी नाही त्यांनी एखादी गरिब परिस्थिती असलेल्या किंवा ज्या मुला मुलींना आई-वडील नाहीत अशा लोकांची मुलगी दत्तक घ्या...यासारखं दुसरं मोठं पुण्य नाही.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy