MEENAKSHEE P NAGRALE

Children Stories Action

2  

MEENAKSHEE P NAGRALE

Children Stories Action

क्रांतिरत्न

क्रांतिरत्न

3 mins
200


*जगातल्या अनमोल रत्नांपैकी एक रत्न म्हणजे क्रांतीरत्न होय*


   स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या,ज्ञानाचा दीप लावणाऱ्या क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आलेख जगाला एक महाग्रंथाची ओळख करून देणारा (संदर्भग्रंथ )महाग्रंथाची निर्मिती प्रेरणा राजेश खवले यांच्या संकल्पनेतून प्रशासकीय अधिकारी, प्राध्यापक, शिक्षक,लेखक, कवी, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्रितपणे चालवलेला उपक्रम म्हणजे क्रांतिरत्न जगातल्या अनमोल रत्ना पैकीच एक रत्न होय.

    शिक्षणाचे बीजारोपणपन करणारे फुले दांपत्य यांचे कार्य आद्वितीय आहे. 'फुले असुनी काठी वेचिले' या उक्तीप्रमाणे आयुष्यभर इतरांसाठी झटणारे,त्याग,समर्पण करणारे, स्त्री शिक्षणाचा पाया रोवणारे महापुरुष म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीआई फुले यांच्या जीवनावर आधारित महाराष्ट्रातून १९४ लेखकांनी लिहिलेले लेख या महा ग्रंथामध्ये समाविष्ट आहेत.या ग्रंथाचे प्रकाशक वर्षा चिमणकर अकोला, मुद्रक- सुरज कार्ड, नागपूर, मुखपृष्ठ सचिन थेटे, रेखाचित्र रवींद्र शिरसागर यांची आहेत. या ग्रंथाचे मार्गदर्शक विश्वनाथ शेगावकर (आय.ए.एस.से.नि.) तथा प्रधान सचिव तामीळनाडू व अशोक गेडाम (उपजिल्हाधिकारी) सेवानिवृत्त हे आहेत तर निर्मिती मंडळ प्रकाश अंधारे( विशेष कार्यकारी अधिकारी) प्रताप वाघमारे (तहसीलदार )नागपूर, विजय लोखंडे (तहसीलदार आकोला ) अतुल दोड (खनिकर्म अधिकारी औरंगाबाद )राहुल तायडे (तहसीलदार नांदुरा) विनय गोसावी (उपजिल्हाधिकारी जळगाव) इ. आहेत.१००० पानांचा महाग्रंथ तयार करण्यासाठी एका प्रतिसाठी आठशे रुपये खर्च हा फक्त छपाईसाठी लागला आहे. प्रत्येक घरातली स्त्री शिकली पाहिजे म्हणून आयुष्यभर त्याग करणाऱ्या फुले दांपत्याच्या कार्याची माहिती येणाऱ्या पिढीला माहित होण्यासाठी प्रत्येक घरात हा महाग्रंथ असला पाहिजे. हा महाग्रंथ येणाऱ्या पिढीला दिशादर्शक ठरणार आहे.या ग्रंथाच्या मुख्य संपादक डॉक्टर पुष्पा तायडे, सहसंपादक डॉ.दीपक सूर्यवंशी, डॉ. सतीश पावडे, डॉ.चंद्रकांत सरदार, सतीश दामोदर , प्रकाश अंधारे आहेत. फुले दाम्पत्याने दांभिक रुढी परंपरेला छेद देऊन, अंधश्रद्धेची मूठमाती करून, सत्यशोधक समाजाची स्थापना करून, बाल हत्या, बालविवाह प्रतिबंधक कायदा करून, विधवांना स्वावलंबनाचे धडे गिरवायला शिकवून, विधवांचे केशवपन थांबवून, स्त्रियांच्या शिक्षणासाठी अहोरात्र मेहनत करून, शिक्षणाचे ध्येय साध्य करण्याकरिता संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. त्यांच्या कार्याला अभिवादन करण्याकरता या ग्रंथाची निर्मिती झाली. त्यामुळे क्रांतिरत्न हे जगातील अनमोल रत्न पैकी एक रत्न आहे असे म्हणावे लागेल. या महान ग्रंथनिर्मितीस अनेक मंत्री, खासदार, आमदार व अनेक विद्यालयाचे प्राचार्य, विद्यापीठाचे कुलगुरू इत्यादी जणांच्या शुभेच्छा लाभल्या आहेत. महाराष्ट्रातील थोर प्राध्यापक, लेखक,कवी,पत्रकार, शिक्षक,सामाजिक कार्यकर्ते यांचे उत्कृष्ट लेख निवडून घेतले आहेत या ग्रंथांमध्ये सुरुवातीला महात्मा फुलेंचा संपूर्ण जीवनक्रम व सावित्रीआईचा संपूर्ण जीवनक्रम दिलेला आहे. त्यानंतर लेखकांची अनुक्रमणिका यादी देण्यात आली आहे.

     स्त्री शिक्षणाचे आद्यजनक महात्मा ज्योतिबा फुले यांनी अनेक शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाचा पाया रचला. सावित्री आईची खंबीर साथ होती म्हणून फुले दाम्पत्यांने समाजातल्या स्त्रिया शिकल्या पाहिजेत यासाठी अहोरात्र मेहनत करून अनेक समाजोपयोगी कामे केलीत. अंधश्रद्धेवर कडाडून टीका केली.समाजातील अज्ञान दूर करण्यासाठी शिक्षण हेच ध्येय गाठले. समाजातल्या स्त्रिया शिक्षित करण्यासाठी अनेक अन्याय सहन केले पण आपल्या मार्गांवरून तसूभरही हलले नाहीत. विधवा पुनर्विवाह घडवून आणले, विधवा केशवपन,बाल प्रतिबंधक कायदा बनवला. विधवा आत्महत्या थांबवून, शंभर विधवा गरोदर मातांची बाळंतपणे स्वतःच केलीत. इतकेच नाही तर प्लेगच्या साथीमध्ये अनेकांना जेवण मिळत नव्हते तेंव्हा स्वतः अन्नछत्र चालवले. अशा महान क्रांतीज्योतीस खरं तर भारत सरकारने भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार द्यायला हवा आहे पण ती एक शोकांतिकाच ठरली आहे. आज सावित्री ज्योतिबा मुळेच अनेक स्त्रिया प्रत्येक क्षेत्रामध्ये उंच भरारी घेताना दिसत आहेत. क्रांतिरत्न या महान ग्रंथामुळे समाजाला व येणाऱ्या भावी पिढीला एकाच ठिकाणी फुले दाम्पत्यांच्या कार्याची ओळख एक संदर्भग्रंथ म्हणून उपयोगी पडेल यात शंकाच नाही. या महान ग्रंथ निर्मिती साठी झटणार्‍या प्रत्येक व्यक्तीचे मनापासून अभिनंदन... आज पर्यंत सावित्री- ज्योती यांच्या जीवनावर आधारित १००० पानांचा महाग्रंथ कुठेही प्रकाशित झाला नाही. या ग्रंथाची द वर्ड ऑफ गिनीज बुक मध्ये नोंद होणार आहे. त्यासाठी सर्व टीमचे अथक प्रयत्न चालू आहेत. असा महान ग्रंथ प्रत्येक घरातल्या प्रत्येकाकडे असायलाच हवा. महाराष्ट्रात ११ एप्रिल २०२१ रोजी या ग्रंथाचे १३१ ठिकाणाहून एकाचवेळी प्रकाशन होणार आहे. त्यासाठी खूप खूप शुभेच्छा....!!

      ग्रंथ हवा असल्यास मा. प्रकाश अंधारे सर यांच्याशी खालील नंबर वर संपर्क साधू शकता

मोबाईल नंबर- 8484906992

   क्रांतिरत्न म्हणजे सावित्रीआई आणि ज्योतिबा फुले यांच्या कार्याचा आलेख जगासमोर मांडणारा एकमेव महाग्रंथ होय.


   कलेक्टर ते तहसीलदार

   यांनी केले अथक प्रयत्न

   साऊज्योतिस अभिवादन करण्या

    निर्मिले महाग्रंथ क्रांतिरत्न....!!


Rate this content
Log in