लबाड कोल्हा
लबाड कोल्हा
शब्दावरून कथालेखन
शब्द- कासव,कोल्हा,जंगल
एका जंगलात एक कोल्हा राहत होता.कोल्हा खूप लबाड होता.एके दिवशी कोल्हा शिकार शोधत शोधत एका तळ्याकाठी आला.दिवसभर त्याला कोणीही दिसले नाही.मग अचानक तळ्याच्या काठावर एक कासव आलेले कोल्ह्याला दिसले.कोल्हा खूश झाला.चला आज आपल्याला शिकार मिळाली म्हणून मनात खूश झाला.कोल्ह्याने कासवाला पकडले तसे कासवाने पाय कवचाच्या आत घेतले.कोल्ह्याने कासवाला खाण्याचा खूप प्रयत्न केला.पण कासवाची पाठ कठीण असल्याने कोल्ह्याला काही कासवाला खाता आले नाही.कासवाला एक युक्ती सुचली.कासल कोल्ह्याला म्हणाले मी थोडा वेळ पाण्यात भिजत राहतो मग माझी पाठ मऊ होईल नंतर मी पाण्याबाहेर आल्यावर मला खा.कोल्ह्याने कासवाच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि कासवाला सोडून दिले.कासव पटापटा पाण्याच्या खोल तळाशी जाऊन बसले ते बाहेर आलेच नाही.इकडे कोल्हा वाट पहातच बसला.शेवटी लबाड कोल्ह्याला कासवाची चतुरी कळाली.
तात्पर्य:-शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ
जशास तसे