Nurjahan Shaikh

Abstract Drama

4  

Nurjahan Shaikh

Abstract Drama

वाढती महागाई

वाढती महागाई

2 mins
254


*संवादातील पात्र : रश्मी (बायको), प्रदीप (नवरा)*

----------------------------------


रश्मी:- अहो ! आज एवढीच भाजी ? वांगी, बटाटे, कांदे, लसूण.... देखील कमी आणले आणि हे काय कोथिंबीर तर परत विसरलात ? 


प्रदीप :- (वैतागून) विसरलो वगैरे काही नाही. हे.... हे ..... भाजीपाला विकणारी....जणू सोनच विकल्या सारखे करताहेत. अगं एवढीशी कोथिंबीर पन्नास रुपये भाव लावलाय. आणि म्हणे फ्रेश आहे, आत्ताच रानातून आणली. 


रश्मी :- शांत व्हा आधी..... हे घ्या पाणी. महागाईच तेवढी वाढली त्यात त्यांचा तरी काय दोष. सगळीकडे एकच भाव आहे. 


प्रदीप:- हो मला मान्य आहे. पण.... पन्नास रुपयाला साजेल एवढी जुडी तर असायला पाहिजे ना ? 


रश्मी:- आणि हे काय ? टमाटे मात्र खूप आणलेत. 


प्रदीप :- हो. कारण ते स्वस्त होते ना ! इथून पुढे तू देखील लागेल तेवढेच जेवण बनवायचं. शिल्लक काही ठेवायचं नाही. काटकसरीने करायचं सगळं.


रश्मी:- हो.. हो... कळतंय मला. या महागाईला तर आपण थांबवू शकणार नाही, पण निदान पैसे कमावण्याचे मार्ग तर वाढवू शकू ना. 


प्रदीप:- म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? मी पैसे कमवत नाही. 


रश्मी :- तसं मी कुठे म्हटले, एवढ्या तुटपुंज्या पगारात कसं घर खर्च चालवायचा ? सगळ्या गोष्टीसाठी पैसा तर लागतोच ना ? खाद्यतेलाचा बघा किती महाग झालय. 


प्रदीप:- हो....जिथे तीन हजार रुपयात सर्व किराणा भरत होतो, तिथे एका तेलाच्या डब्याला तेवढे पैसे मोजावे लागतात. 


रश्‍मी:- म्हणून तर म्हणते, आता वरचेवर महागाई वाढणारच. त्याला कोणी आळा घालणार नाही. ज्याला त्यालाच तजवीज करावी लागणार. जेवढी मागणी तेवढा पुरवठा करावाच लागेल, आणि मला सांगू नका काटकसर करायला. 


प्रदीप:- म्हणजे ? मग उधळपट्टी करणार का ?


रश्मी:- अहो काय म्हणताय ? उधळपट्टी कशाला करते मी , पण खाण्यापिण्यात कसली आलीय उधळपट्टी ? येथे काय काटकसर करायची ? खायला तर तेवढेच लागतं ना ?


प्रदीप :- (मस्करीत) हो.. डायेट सुरू करायचा आजपासून सगळ्यांचा. 


रश्मी :- छान...!! जो डाएट तुम्ही फॉलो करणार आहात ना तो किती महाग पडतो ते बघा आधी, आणि म्हणे डायेट सुरू करायचा. 


प्रदीप :- हे बघ रेशू , काही असो या महागाईमुळे आपल्यात वाद नको.

( चिडवत )

करतो मी पैसे कमावण्यासाठीची तजवीज. आता एक कप चहा मिळाला तर बरं होईल. 


रश्मी :- दूध संपलं. आणता का जाऊन? त्या दूधवाल्या ने देखील पाच रुपये जास्त वाढवलेत आजपासून. 


प्रदीप:- अरे देवा ! देवा !! आता काही खरे नाही. जो तो पैसे लुटण्याचा काम करतोय. कधी ही महागाई थांबेल आणि आपल्यासारख्या सामान्य जनतेला याच्या वेढ्यातून सुटका मिळेल?  


रश्मी:- मग उद्यापासून तुम्ही देखील तुमच्या ट्युशनची फी वाढवा. म्हणजे मग बरोबर समतोल साधला जाईल. 


प्रदीप:- हे बरं सांगितलं. आता पुढच्या महिन्यापासून सगळ्यांची फी वाढवतो, म्हणजे आपला बजेट देखील बरोबर होईल. 


रश्मी:- कसा तरी तोडगा काढावाच लागणार महागाईवर.


*सारांश*

 *महागाई अशी समस्या आहे की यामध्ये फक्त आपण गुंतत जातो. यावर मार्ग काही मिळत नाही. महागाईचा आलेख फक्त वाढतच जातो. सामान्य जनता या महागाईच्या विळख्यात होरपळून निघते. चलन व्यवस्थेचे नियोजन बरोबर नसल्याने, आयात-निर्याततिचे दर योग्य नसल्याने, या समस्येने देशाला प्रगतीच्या वाटेवर रोखून धरले आहे. याच्यावर खरंच विचार व्हायला पाहिजे.*


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract