बंधन मैत्रीचे (अलक)
बंधन मैत्रीचे (अलक)
आज सर्व मैत्रिणी गेट-टुगेदर साठी डेक्कन हॉल मध्ये जमलो होतो. जो-तो मैत्रिणींना भेटण्यासाठी घरात कशी थाप मारून मी इथे आले हे रंगवून सांगत होते. परंतु एका मैत्रिणीला आमच्यापर्यंत येताच आले नाही, कारण घरातील अडचणी होत्या.
*परंतु मैत्री असे नाते आहे, की दुसर्या क्षणी आम्ही सगळ्यांनी काहीही विचार न करता तिच्या घरी जाऊन तिला सरप्राईज दिले. तर पाहतो काय ती आणि तिचा नवरा मिळून, नवऱ्याच्या मित्रांची गेट-टुगेदर पार्टीचे आयोजन करण्यात व्यस्त होते. अचानक आम्हाला पाहताच तिचा आनंद गगनात मावत नव्हता. मैत्रीच्या बंधनाला जास्तच हुरूप चढला. पार्टीचा रंग अधिकच उजळला. शेवटी मैत्री नाते असे आहे, जिथे सर्व काही माफ आहे.*
