सत्ता (अती लघुकथा)
सत्ता (अती लघुकथा)
दिवसभर राब राबल्या नंतर, रात्री जेव्हा गणपतराव आणि इतर कामगारांची बैठक बसली तेव्हा कामगारांच्या मजुरी बाबत बरीच चर्चा झाली. शेवटी निर्णय झाला की याबाबत दाद मागायची. सरपंचाकडे याचे गाऱ्हाणे सांगायचे. सर्वांचा ठराव मंजूर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळे सरपंचच्या घरी रात्री झालेल्या विषयाबद्दल चर्चा करण्यासाठी गेले, परंतु सरपंचाने त्यांच्या विचारांना कानाडोळा केला.
पुढच्याच महिन्यात ज्या वेळी निवडणुका लागल्या तेव्हा सत्ता गणपतरावांच्या हाती गेली तेव्हा जुन्या सरपंचांना कळले की त्यांनी मजुरांच्या प्रश्नावर कानाडोळा करून किती मोठी चूक केली होती.
सत्तेचा माज लोकांना माणुसकी विसरण्यास भुरळ पाडतो आणि क्षणात सत्ता पलटून दाखवतो.
