छंद
छंद
आयुष्य सुंदर बनवायचे असेल तर "छंद जोपासले पाहिजेत", नाहीतर शेवटी आहे, "रोजचे जगणे त्यात काय शोधे नवे बहाणे."
रटाळ जीवनाचे चलचित्र कोणासही आवडत नाही त्यात थरारक गोष्टी, सुखदुःखाचे अनुभव, रोमांच, विरह अशा अनेक गोष्टींमुळे ते चलचित्र खास बनत असते. आपले जीवन ही असेच आहे. रोजच्या समस्या, जीवनातील धकाधकी, सुख दुःखाचा लपंडावाचा खेळ आणि धावपळीचे जीवन चालूच आहे. पण या सर्वातून आपल्याला काय आवडते? आपला आनंद कशात आहे? हे सर्व आपण विसरत चाललो आहे. त्यासाठी आपल्याला जे आवडते ते एक छंद म्हणून जोपासावे. आपण आपल्या आवडीचे काम करून समाधानी व आनंदी होऊ शकतो. अन्यथा जीवन तर जगायचे आहे त्याला रोज बहाने शोधण्याची गरजच नाही.
आपले छंद शोधा, निवडा, जोपासा मग पहा आपले जीवन आपल्यालाच खूप खूप आवडते.