अलक - एप्रिल फूल
अलक - एप्रिल फूल
आज सकाळी गडबडीत शाळेत गेले. पहिलाच तास आठवीच्या वर्गावर होता. गडबडीत वर्गात आत गेले आणि मुलांना वह्या उघडायला सांगितले. कालचा अभ्यास केला का म्हणून त्यांना विचारत होते, तोपर्यंत दुसरे सर आले आणि म्हणाले की तुमच्या वर्गावर मुख्याध्यापक मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत. हे ऐकून मुले, जी गोंधळ करत होती ती सर्व शांत झाली आणि मलाही काही सूचेनासे झाले. मार्गदर्शन म्हणजे नक्की काय सांगणार आहेत?
पूर्ण तास होईपर्यंत मी मुलांनां शिस्तीत बसवले आणि शिकवलेला भाग परत एकदा शिकवू लागले. थोड्यावेळाने बेल वाजली माझा तास संपला. तरीही आम्ही मुख्याध्यापकांची वाट पाहत होतो. परत तेच सर आले आणि म्हणाले काही नाही हो एप्रिल फूल बनवले.
