अलक (आईची माया)
अलक (आईची माया)
लग्न झाल्यावर मुलगा बायकोला म्हणाला, "आई बरोबर तुला ऍडजस्ट करावे लागेल".
बायकोने आकांत-तांडव केल्यावर, आई लगेच म्हणाली, "असु दे रे! तिने नाही केलं ॲडजस्ट, तरी मी घेईन तिला सांभाळून."
आणि दुसऱ्याच दिवशी माये खातिर आई समोरच्या फ्लॅटमधे शिफ्ट झाली.
विभक्त राहूनही एकत्र असल्याची जाणीव करून दिली.
