अलक (अती लघुकथा)जाणीव अन्नाची
अलक (अती लघुकथा)जाणीव अन्नाची
सायली रोज ताटात हि भाजी नको ती भाजी नको म्हणून रडायची. आईने एकदा तिला रस्त्याच्या किनारी बसलेल्या लहान मुलांना दाखवले. जी एका जागी बसून चार मुले एका डब्यात उष्टे अन्न खात होती. अशा मुलांची बिकट अवस्था पाहून सायलीला रडू कोसळले. आईने तिला समजावून सांगितले की अन्न हे परब्रह्म आहे. तेव्हापासून सायली अन्न खाण्याला कधीच नको नको करत नव्हती. जे असेल ते ताटात संपूर्ण खात होती आणि स्वतःहून त्या मुलांना देखील खायला देत होती.
