उदरभरण की नुसतं भरणं ?
उदरभरण की नुसतं भरणं ?


काय एक एक माणसांचे नमुने मुंबईत बघायला मिळालेत .
आयुष्य धन्य पावतयं अगदी .
मगाशी एका चायनीजच्या गाडीवर ऐकलेला संवाद -
( मी तिथे काय करत होतो हा प्रश्न विचारू नये. आजारातून उठून एक दिवस पण झालेला नाहीये त्यामुळे पुढचा एक महिना तरी नो चायनीज .)
गि-हाईक - एक नुडल्स आणि एक राईस दे....चिकन हां ....
गाडीमालक ( पो-याला) - एक चिकन नुडल और राईस बना रे...
गि-हाईक - थोडा झणझणीत बनव रे राईस ...आणि नुडल्स मिडीयम ....पोरांना तिखट चालत नाही माझ्या .... ते पीस जरा जास्त टाक ना बे ..
कशाला कंजूसी करतो..?
कोबी घाल की जरा अजून ... सॉस पण जास्त घाल .
( **** , सकाळी *****तून धुर निघेल , एवढा चिली सॉस घालायला सांगितलास तर ...इति मी )
गाडीमालक पैसे मोजत उभा होता... त्याने फक्त बनवणार्या पोराकडे बघितलं ...दोघेही एकमेकांकडे बघून सहेतुक हसले ....
साहेबांची बडबड चालूच होती ....
" भाय , थोडा कोबी चटनी दे ना "
पोरगं - साब , वैसा अब नही मिलता .... एक्स्ट्रा दस रुपया देना पडेगा .....
" दे बे , त्याचे कसले पैसे घेता तुम्ही ?
" सॉरी साब , मालिक ने मना किया है "
साहेब मालकाला - "क्या यार एक प्लेट कोबी चटनी भी नही दे सकते क्या आप" ?
मालक - नही , दस रूपया दो और एक प्लेट दुंगा ।
फोकट मे नही .....
साहेब - छोड दे फिर ... ऑर्डर कॅन्सल ...
नाय पायजे तुझं चायनीज .....
" *******, एक प्लेट साठी एवढा माज ?
साला समजतो कोण स्वतःला *****, ****** बघ या पुढं गि-हाईक येऊन देतो का तुझ्या गाडीवर ...... ***** ......" असं म्हणतं तो तिथून पैसे न देताच निघून गेला.
( तो पर्यंत दोन्हीही गोष्टी बनवून झालेल्या होत्या.)
नशीबाने तिथे आलेल्या दोन नवीन गि-हाईकांनी तीच ऑर्डर केल्यामुळे त्याने बनवलेलं जेवण फुकटं गेलं नाही ....
ती ऑर्डर त्या लोकांना देऊन पुढच्या गि-हाईकांच्या ऑर्डर घेण्यात मालक आणि ते बनवण्यात तो पोरगा दोघेही परत व्यस्त झाले .
_________________________________
आपण जसं पोटासाठी कष्ट करतो तसाच समोरचा माणूसही त्या एक वीत पोटासाठीच राबत असतो ....
हे लक्षात घेऊन त्याच्या कामाला शाबासकी दिली नाही तरी चालेल ( त्याचीही तशी अपेक्षा नसते ) किमान नावे तरी ठेऊ नयेत .....
महिना 20000 पगार घेणारा माणूस माज तर असा घालत होता की जसं काय five star हॉटेल मधे त्याला सर्वीस मिळाली नाही .....
80 रू. ची नुडल्स खाणार आणि आव असा आणत होता की जणू ह्याने आज तिथून पार्सल घेतलं नाही तर तर ती माणसं उपाशी मरणार होती ....
जनाब ..... ज्याने चोच दिली तो ज्याच्या त्याच्या कुवती प्रमाणे दाण्याचीही सोय करून ठेवतो ....!!
असो ......
अशीही असतात माणसं .....
© आदित्य कुलकर्णी