Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published
Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published

Aditya Kulkarni

Romance Tragedy


0.8  

Aditya Kulkarni

Romance Tragedy


भेट -8

भेट -8

2 mins 8.2K 2 mins 8.2K

भेटच्या निमित्ताने ......

साधारण 4 महिन्यांपूर्वी माझ्या मनात भेट लिहायचा विचार आला होता. सुरवातीचे 3 भाग लगोलग लिहीले सुद्धा पण नंतर जरा थांबावसं वाटलं कारण त्या वेळी लिहीलेली प्रत्येक भेट ही फार भावनिकतेच्या प्रवाहात लिहीली गेली .
आता तिच्याच भेटीबद्दल का ह्या प्रश्नाचं उत्तर मलाही नीट नाही सांगता येणार , पण एका मित्राने  फार आग्रह केला होता तेव्हा त्याला जे उत्तर दिलं तेच इथे देतो .
'काही माणसं आपल्या आयुष्यात फार कमी वेळासाठी येतात .पण त्यांच्यासोबतचा प्रत्येक क्षण आपल्याला आयुष्यभरासाठी आपली साथ देतो . ही माणसं  आपलं आयुष्य अगदी मुळापासून बदलतात. तिला भेटण्याअगोदरचा मी आणि आत्ताचा मी यातला फरक केवळ मलाच माहित आहे . 
यात कुठेही स्वतःविषयीच्या अहं ची दर्पोक्ती नाही तर तिच्यामुळे माझ्यात झालेला सकारात्मक बदल माझ्या अत्यंत जवळच्यांनाही फार जवळून अनुभवायला मिळाला आहे. 
2012 ते 2014 पर्यंत माझ्यासोबत असलेली / आणि आता नसलेली ती अशा या आठवणींच्या प्रवासाचं  वर्णन मी केवळ अविस्मरणीय या एकाच शब्दात करेन . 
भविष्यात माझा स्मृतीभ्रंश वगैरे झालाच तर तर इतर काही आठवो न आठवो ... मनाच्या एका कोपऱ्यात तिची जागा मात्र  अढळ असेल .

काही जणांना या पोस्ट ला भावनांचा बाजारही वाटला होता /वाटेल , त्यांच्यासाठी एवढंच की ..... 
एखादी आठवणं बराच काळ मनात दाबून ठेवल्यावर अचानक तिचा स्फोट होऊन सगळं बेचिराख होण्यापेक्षा हळूहळू बाहेर काढून तिची तिव्रता कमी करावी या विचारांचा मी आहे . 
फेसबुकच्या माध्यमातून मला तो मार्ग मिळाला .
त्यामुळे मला जे पटलं , रूचलं तेच मी केलं ज्याबद्दल मला काडीमात्र खेद नाही .

यानंतर भेट चे केवळ दोनच भाग पोस्ट होणार आहेत . शेवटच्या काही आठवणी सखोल लिहीण्याचा प्रयत्न करेन आणि लेखणीला पुर्णविराम देईन . 

© आदित्य शेखर कुलकर्णी .


Rate this content
Log in

More marathi story from Aditya Kulkarni

Similar marathi story from Romance