Aditya Kulkarni

Inspirational

2.2  

Aditya Kulkarni

Inspirational

मुंग्यांचं मॅनेजमेंट

मुंग्यांचं मॅनेजमेंट

2 mins
16.2K


दिवसभर वाकडमधे मड आर्किटेक्चरच्या वर्कशॉपला होतो . एफ.वाय , एस वायची सुमारे 170 मुलं-मुली गेले तीन दिवस चिखल तुडवण्यात , त्याच्या विटा बनवण्यात आणि पाया सोडून बाकी संपूर्ण मातीची रचना ( खोली) तयार करण्यात बिझी होती . वर्कशॉप संपलं . फोटोसेशनही झालं .वर्कशॉप मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या एका प्राध्यापकांनी त्यांच्या वेळी घडलेला एक किस्सा सांगितला .

"असंच एक मड आर्किटेक्चर वर्कशॉप .असेच सगळे विद्यार्थी . बांधकाम पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांनी पहाणी करायला प्राध्यापक आणि विद्यार्थी गेले होते .बघतात तो भिंतीला अनेक ठिकाणी तडा गेल्या होत्या , काही ठिकाणी मुंग्यांची वारूळं तयार झाली होती .एका प्राध्यापकाने हातातल्या काठीने तीन-चार ठिकाणी भिंतीवर फटके मारले .त्या फटक्यात एका बाजूचं वारूळ मोडलं गेलं . काही विद्यार्थ्यांनी ते बघितलं होतं .चहा पिऊन आल्यावर त्यांनी जवळ जाऊन त्या बाजूचं निरीक्षण केलं . पहातात तो अनेक मुंग्यांनी एकत्र येऊन वारूळ पुन्हा तयार करायला सुरुवात केली होती. कसं फुटलं , कोणामुळे फुटलं या पेक्षाही ते पुन्हा उभारलं जाणं जास्त गरजेचं आहे या भावनेने त्या मुंग्या पुन्हा कामाला लागल्या होत्या . आयुष्यात अनेक चूका होतात .बहुतांशी वेळेला आपण काय चूक - काय बरोबर यापेक्षा कोण चूक - कोण बरोबर यावरच वाद घालण्यात धन्यता मानतो. प्राप्त परिस्थितीत सगळ्यांनी एकत्र येऊन वाद घालण्यापेक्षा संवाद साधून परिस्थिती बदलण्याचा विचार आणि कृती केली तर किती चांगली कामं आयुष्यात करता येतील ? "

किस्सा संपला .पोरांना तो किती कळला आणि किती डोक्यावरून गेला हे त्यांचं त्यांनाच माहीत पण आज अजून एक नवीन धडा शिकायला मिळाला या समाधानी भावनेने मी परतीच्या प्रवासाला निघालो .


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational