थॅनोसला खुले पत्र...
थॅनोसला खुले पत्र...
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
मत्प्रिय थॅनोस ,
विश्वातली अर्धी लोकसंख्या एका चुटकीवर संपवून जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात कोणाच्यातरी शेतात कवच उतरवून तु राखणदारी करत असल्याचे पाहण्यात आले. 'रिकामं मन सैतानाचे घर' या उक्तीनुसार तुझ्या हातालाही काम मिळाले हे बघून बरं वाटलं. प्रत्येक ठिकाणी सरकारी योजनेतूनच काम मिळायला हवे असा नियम नसल्याने स्वयंरोजगाराचा तुझा मार्ग बघून अनेकांना प्रेरणा मिळेल यात शंकाच नाही. मात्र "युद्ध अजून संपलेले नाही कारण आमची पोरं अजून जिंकलेली नाहीत" त्यामुळे तुझ्यापुढे काय वाढून ठेवलंय याची तुला कल्पना नसेलच. असो ... "ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते" या विचारांचे आम्ही पाईक असल्याने तुझ्या अपरोक्ष काय झालं याची कल्पना तुला असायलाच हवी म्हणून हा पोस्टप्रपंच.
बाइलवेड्या स्टारलॉर्डने ऐन मोक्याच्या क्षणी माती खाल्ल्याने तुझ्या हातातला अनंतमण्यांचा पंजा काढता काढता राहून गेला. सगळ्यांनी तुला एकत्र कोपच्यात घेतल्याचा सूड तू तुझ्या परीने घेतलासच. लेकिन जो बात तू नहीं जानता वो ये है कि ( बाजीराव -निझाम भेटीप्रसंगी बाजीरावांच्या हाय पीच मधे वाचावे ) डॉ. स्ट्रेंजने तुला दिलेला कालमणी हा संपूर्ण कालमण
ीचा केवळ एक अंश आहे. तुझ्यासोबत लढाईच्या १४ लाख शक्यता अगोदरच बघितलेला डॉ. स्ट्रेंज तुला संपूर्ण कालमणी सोपवण्याइतका गाढव असेल असं वाटलंच कसं तुला ?
ज्या एका शक्यतेत आमची पोरं जिंकणार आहेत त्याची तयारी म्हणून काळावर स्वामीत्व असणाऱ्या डॉ. स्ट्रेंजने कालमण्यातल्या बऱ्याचशा शक्तीचा भाग अगोदरच भविष्यात पाठवून ठेवलाय. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने अशक्य गोष्टी शक्य करून ( 'अशक्य ते शक्य करतील स्वामी' या सुरात वाचून विनाकारण स्वामीभक्ती दाखवण्याचा प्रयत्न करू नये.) दाखवणारा आमचा टोन्या "समांतर ब्रह्मांडात" तुला जिंकण्याचा मार्ग शोधून काढेलच याबद्दल शंका नाही . शेवटच्या सीनमध्ये चुटकी वाजवल्यावर तुझ्या हातातला पंजा काही प्रमाणात डॅमेज झाला हा त्याचाच परिपाक. सोबतीला कॅप्टन मार्वेलही येणार आहेच.
स्पायडरमॅन का , ब्लॅक पँथर का , डॉ. स्ट्रेंज का , फॅलकॉन का सबका बदला लेगा रे टोनी ......
तुझाच ,
.........
( माझी पण राखच झाली आहे मात्र कल्पनाविलासाला देहाचं बंधन नसल्याने मी तुला कल्पनेतच खुले पत्र लिहिले आहे. )