नामा ...
नामा ...
तुझी माझी सामाजिक ओळख आणि अस्तित्व फार वेगळं आहे रे ..
पण तू आणि तुझ्या समाजाने जे शतकानुशतके भोगलं त्यातला टक्काही आम्ही भोगलं नाही. गांधी हत्या झाल्यावर काही ब्राह्मण लोकांची घरदार जाळून लोकांनी विद्रोह आणि संताप व्यक्त करण्याचा प्रयत्न केला .त्यानंतर साठ वर्षं माणसं किमान माणसासारखं वागण्याचा प्रयत्न करत होती .किती खरं किती खोटं त्यांचं त्यांनाच माहीत!
तुझी लेखणी सुरू झाली आणि वर्षानुवर्षे गटारातल्या घाणीत जगण्याची सवय करून घेतलेल्या माणुसरूपी किड्यालाही स्वतःचं वेगळं अस्तित्व असण्याची जाणीव झाली .
तो उठला, जागा होण्याचा प्रयत्न करू लागला, तुझ्या शब्दांनी त्याला बळ दिलं .
p>
माणूस असाल तर माणसासारखंच वागा हे मेंदू पोखरून मेंदूचा भुगा करणारे तुझे भुंग्यासारखे शब्द आत्माही पोखरून काढायला लागले रे ...
तथाकथित समाज आणि सामाजिक आस्था मानणाऱ्या लोकांमधे आता जीभ आणि जीव गुदमरतो रे नामा ..
तुझा विद्रोह कळतो पण शिव्यांशिवाय आम्ही बाकी काहीच आत भिनवत नाही .
काही दिवसांपूर्वी तुझा तुझ्याच शेवटच्या काळातही माजात सिगरेट ओठात पकडलेला फोटो बघितला ,
तुझ्याच शब्दात सांगायचं तर जिंदगीचं नाव लवडा ठेऊन जगणाऱ्यांनी खुशाल जगावं, मी मात्र तसा जगणार नाही ...
आयुष्य असं जगता यायला हवं रे नामा ..!
थोड्या उशिरानेच पण मनःपूर्वक आदरांजली .