भेट -7
भेट -7


शांत मनाने मी परत स्पर्धा सभागृहात येऊन बसलो
स्पर्धा संपली. बक्षीस घेऊन मी आनंदाने परत निघालो. दुपारी तिच्याशी बोलणं झाल्यावर मी phone सायलेंट करून ठेवला होता .
बाहेर पडलो आणि पहिला मेसेज तिला केला. रिप्लाय ❤❤❤❤ एवढाच आला .
पोहचायला उशीर होणार होता म्हणून मग वाटेतच खायला थांबलो. ऑर्डर दिल्यावर फोन चेक केला .
Call me एवढीच अक्षरं होती .
कॉल केला.
' आदि .. '
'बोल बाळा ..'
' मला कळत नाहीये '
' काय '?
' आपल्या दुपारच्या बोलण्यावर काय रिअॅक्ट होऊ ते '
' का ' ?
' मला विचारच करता येत नाहीये ....म्हणजे मी दुपारपासून आपलं पहिल्या भेटीपासून बोलणं आठवत्ये ... M totally blocked '
' पण एवढ्या घाईत निर्णय का घेत्येस ... वेळ जाऊ दे की ...Take your own time '
' पण माझ्या डोक्यातून ते विचार जातच नाहीयेत , त्याचं काय '?
' विचार करूच नको ना ..! तुझं daily routine follow कर फक्त '
'............'
' नक्की काय होतंय बाळा तुला ...'?
' तू इथे का नाहीयेस आत्ता '?
' आणि आलो तर ...पुढे काय '?
'मला आत्ताच भेटायचं होतं तुला '...
'
******* , तुला पण माहित्ये ..मला आत्ता नाही येता येणार तिकडे ' ....
' हम्मम ...'
' एक गेम खेळूया '?
'आत्ता ' ?
' हो ' .....
' मी एक शब्द सांगेन तो ऐकल्यावर तुझ्या मनात असलेला शब्द तू सांगायचा .... विचार अजिबात करायचा नाही ... त्या क्षणी येणाराच शब्द असायला हवा ' ....
' चालेल ' ....
' करू सुरू ' ?
'हो ' ..
' नांदेड ' ?
'विद्यापीठ महोत्सव '
' गुलाबी ' ?
'प्रेम '
'कॉलेज ' ?
' मी एकटीच '
' PJ आणि मनमुराद हसणं ' ?
' आपली पहिली भेट '.....
' तुझा निघायचा दिवस ' ?
' मुड ऑफ ' ....
' ****पूर ' ... ?
' आठवणी '
' झोप ' ?
' आठवण '
' पुस्तक '.. ?
' दुसर विश्व '.....
' पाऊस ' ?
'आनंद ' ....
' प्रेम ' ?
' तू '
' प्रेमी ' ?
'मी '
काय ....?
' ........... '
' बोल ना ' .....
चल बाय .... मी जेवायला जात्ये ...
' अगं ए .... हॅलो ....हॅलो .....U there ?'
क्रमशः
© आदित्य शेखर कुलकर्णी .