Aditya Kulkarni

Romance Tragedy

3.5  

Aditya Kulkarni

Romance Tragedy

भेट -10

भेट -10

1 min
2.7K


या विषयावर नंतर बोलू म्हणून आम्ही त्यावेळी बोलणं थांबवलं खरं पण नंतर या विषयावर सविस्तर असं बोलणं कधी झालंच नाही .इतर वेळी एकमेकांना दिवसाला 50-60 वेळ मेसेज करणारे आम्ही , 4-5 दिवसातून एखादं वेळी 8-10 मेसेज इथपर्यंत येऊन पोहचलो . भौगोलिक अंतरापेक्षा मनातलं अतंर वाढत गेलं , कधीही परत एकत्र न येण्याएवढं ......

मधे काही महिने एकमेकांशी आम्ही बोललोच नव्हतो , पण आठवणींचं काय ? त्या त्यांचं काम करतच होत्या .अगोदर कुठल्याही स्पर्धेच्या आधी तिचा तो फोन वरून मिळणारा आश्वासक ऑल दे बेस्टचा स्वर आमचं एकमेकांशी बोलणं पुर्णपणे थांबल्यावरही कायम सोबतच असायचा .

पुण्याच्या एका स्पर्धेवरून येताना अचानक फोन वाजला . बघतो तर चक्क तिचाच मेसेज आय मिस यु म्हणून ...

मी पण जरा कावराबावरा झालो होतो त्या वेळी .....पण सावरलो लगेच .

दिवस पुढे जात राहिले ..आयुष्य सरकत राहिलं ...... तोही दिवस उगवलाच जेव्हा मी तिच्याशिवाय जगायलाही शिकू लागलो .

एकेकाळी माझ्या जगण्याचा अविभाज्य भाग बनलेली ती शांतपणे आयुष्यातून वजा ही झाली .

समाप्त .....


Rate this content
Log in