SHUBHAM KESARKAR

Abstract

2  

SHUBHAM KESARKAR

Abstract

ठिकाण

ठिकाण

1 min
187


काही दिवसांपूर्वी मी माझे सहकारी आपापल्या कामातून वेळ काढून एकमेकांना भेटण्यासाठी आमच्या नेहमीच्या ठिकाणावर जमलो होतो. मित्र भेटतात म्हटल्यावर मस्ती, मस्करी आणि गप्पा गोष्टी तर आल्यात आणि त्यातच कुठेतरी जाऊन एकांतात बसावं आणि निसर्गाचा आनंद घ्यावा अशी भावना काही होईना माझ्या मनात आली आणि ती कल्पना मी माझ्या सहकाऱ्यांना सांगितली आणि माझी इच्छाशक्ती बघा तर सगळ्यांनी माझा प्रस्ताव स्वीकार केला आणि बघता बघता त्या ठिकाणावर जाण्याचे ह्या रविवारी ठरले. रविवारी सकाळी आम्ही सर्व एकत्र भेटलो आणि बाईक वरून त्याठिकाणी जाण्यासाठी निघालो. सकाळची वेळ म्हणजे अंत्यत मनमोहक आणि अल्लाहदायी वातावरण, मनापासून खूप प्रसन्न वाटत होते, आणि आम्ही आमच्या ठिकाणावर पोहचलो आणि ते ठिकाण म्हणजे पालघर इथे वसलेले टकमक किल्ला, अत्यंत अल्लाहदायी वातावरण आणि निसर्गाच्या सान्निध्यात वसलेला हा सुंदर किल्ला. जेमतेम आम्हाला किल्ला सर करण्यासाठी अडीच तासाचा वेळ लागला, पण जेव्हा आम्ही किल्ल्याच्या टोकाला पोहचलो तेव्हा जे दृश्य आम्ही पाहिले ते सुंदर आणि अप्रतिम होते. आम्ही सर्वांनी एकत्र ह्या गोष्टीचा अनुभव घेतला आणि आमच्या स्मरणात राहिलेलं हे सुंदर असे निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले टकमक किल्ला. आपणही नक्की भेट द्यावी.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract