कू.शुभम संतोष केसरकर

Drama

2.4  

कू.शुभम संतोष केसरकर

Drama

मैत्री !!

मैत्री !!

6 mins
1.0K


मित्र हा शब्द बोलायला किती सोपा वाटतो ना? अरे तो बघ तुझा मित्र , हा माझा जिवलग मित्र , अरे हा माझा शाळेतला मित्र आणि तो माझा कार्यालयातील मित्र असे म्हणून आपण आपल्या सर्व मित्रांची माहिती देतो. पण हे सर्व मित्र तुमच्यासोबत नेहमी राहतात का ?? तुमच्यासोबतची साथ ही पूर्ण आयुष्यभर देतात का ?? की कामापूर्ते आपले मित्रत्वाचे कर्तव्य पार पाडतात. नक्की ह्यावर विचार करा व त्याप्रमाणे बरोबर व्यक्तीची पाहणी करा व त्यानंतरच आपले संबंध त्याच्यासोबत ठेवा. बघा पटलं तर घ्या नाहीतर दुर्लक्ष करा.


मी पण काही महिन्यांपूर्वी असाच तुमच्यासारखा होतो. एकदम हसतमुख , सर्वांसोबत मिळून राहायचो, त्यांचे सुख - दुःख हे आपले समजून नेहमी त्यांची समजूत काढायचो. त्यांना कधी माझ्यामुळे त्रास होऊ नये असे समजून मी कधीही त्यांना वाईट बोलो नाही. त्यांचा नेहमी आदर व मानसन्मान करत राहिलो व त्यांना नेहमी आपलंसं व कुटुंबातील एक सदस्य आहे ह्या समजुतीने मी त्यांना नेहमी वागवत राहिलो. पण मला थोडं माहीत होतं की ह्यासर्व गोष्टींमध्ये फक्त मी होतो व माझ्याव्यतिरिक्त तिकडे कोणीही नव्हतं.


ज्या विचित्र काळातून मी आलो त्याबद्दल तुम्हा सर्वाना सांगण्याचा हा छोटासा प्रयत्न. त्यागोष्टी मला बोलायला पण अगदी विचित्र वाटत आहेत पण जे खरं आहे ते सर्व तुम्हाला सांगणे देखील तितकेच महत्वाचे आहे. मी पण कोणालातरी मित्र म्हणून मानले होते पण त्याची जेव्हा खरी बाजू जेव्हा माझ्या लक्षात आली तेव्हा सर्व काही बदलले. आमची मैत्री ही जेमतेम १ वर्षाची व त्यातले काही महिने हे आम्हाला एकमेकांना मित्र म्हणून स्वीकारण्यातच गेले. पण जेव्हा आम्ही पक्के मित्र झालो तेव्हा हे जग अगदी मनसोक्त वाटायला लागले. जणू कित्येक दिवस आम्ही एकमेकांविना कुठेही जात नसत. नेहमी जाऊ तर सोबतच नाहीतर नाही. आमच्या घरात देखील तो अगदी माझ्या आई-वडिलांचा लाडका होता. जेव्हाही तो घरी यायचा माझ्या आईच्या हातचे कांदापोहे नक्की खाऊनच जायचा.


दोन महिने हे त्याच्यासोबत कसे व्यतीत झाले हे मला सुद्धा समजले नाही. आमच्यातील घट्ट मैत्री ही वाढतच जात होती. व त्याचे उदाहरण हे प्रत्येकाच्या घरी दिले जात होते. त्याला मी माझा मित्र मानला होता पण त्याने मला नक्की मित्र मानले होते का ? ह्याचे उत्तर हे मला काही काळातच समजणार होते. पण त्यावेळी समजले असते तर आणखीन उत्तम झाले असते. व त्या चक्रव्यूहातून मी सुटलो असतो पण जे काही आपल्या नशिबात कोरलेले असते ते नक्की होतेच. आम्ही प्रत्येक दिवशी भेटायचो, एकमेकांच्या समस्यांचं निवारण करायचो व एकमेकांना आपल्या जीवनात जेवढे शक्य होईल तेवढे मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करायचो. काही महिने ह्यासर्व गोष्टींमध्येच गेले.


पण, आता जे काही पुढे सुरु होणार होते त्याची कल्पना ही मला सुद्धा नव्हती . मी माझ्या कार्यक्रमानिमित्त काही दिवस बाहेर जाणार होतो व त्याआधी मी माझ्या मित्राला भेटणार होतो पण त्याचा दूरध्वनी क्रमांक काही लागत नव्हता , मी त्याला थोड्या थोड्या वेळाने संपर्क करण्याचा प्रयत्न करीत होतो पण त्याचा दूरध्वनी क्रमांक काही लागत नव्हता. अगदी विचित्र वेळ त्यावेळी आमच्यात सुरू होती. त्याच संध्याकाळी मी त्याच्या घरीसुद्धा जाऊन आलो पण त्याची काही बातमी मिळाली नाही. त्याचे आई-वडील गावी राहत असल्याने तो इकडे एकटाच राहत होता. तो ज्याठिकाणी राहत होता तिकडे देखील घराला कुलूप लावले होते. त्यामुळे त्याच्याबद्दल कोणतीही बातमी मला मिळली नाही. मी माझ्या कार्यक्रमानिमित्त घरातून निघून गेलो . पण तरीही प्रवासादरम्यान मी त्याला संपर्क करण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न केला. पण कधी त्यास यश नाही मिळाले.


मी माझ्या कार्यक्रमामध्ये व्यस्त असल्या कारणाने मी देखील ह्यात जास्त काही वेळ दिला नाही. जेव्हा ह्या सर्व कामातून मी मुक्त झालो व घरी जाण्यास निघालो त्यावेळी माझ्या आईने मला संपर्क केला व त्यावेळी मला समजले की त्याने गैरव्यवहार केल्या प्रकरणी त्याला पकडले आहे , तू ताबडतोब तिकडे जाऊन त्याची चौकशी कर व पोलिसांना विनवणी कर की तो निर्दोष आहे व त्याला ह्यात मुदाम्महून फसवले आहे. आईचे हे वाक्य ऐकताच मी ताबडतोब पोलीस स्टेशन मध्ये दाखल झालो व त्याची त्याठिकाणी जाऊन चौकशी केली. पोलिसांना खूप काही समजवण्याचा मी अतोनात प्रयत्न करीत होतो पण त्यास कोणतेही यश आले नाही त्याविरुद्ध त्यांनी मला पुरावे आणायला सांगितले. काहींना काहीतरी करून त्याला जेल मधून सोडवण्यात मला यश आले . त्याला मी माझ्या घरी घेऊन आलो. आईने त्याच्या तब्बेतीबद्दल सर्व विचारले. आम्ही त्याला ह्या गोष्टीबद्दल विचारपूस केली असता त्याने सांगितलं की , जे काही माझ्यासोबत घडले त्याची मला जाणीव देखील नव्हती. जे काही माझ्यासोबत होत होते त्यामध्ये मी फक्त वाहत जात होतो व त्याचे परिणाम काय होतील ह्याची जाणीव देखील नव्हती. मी त्याला सांगितले की जे झालं ते झालं पण ह्यापुढे अस काही करू नकोस , तुला जी काय मदत हवी असेल ते मी करेन त्याबद्दल तू अगदी निश्चिंत हो , अशा प्रकारे त्याची समजूत काढून तो तिथून घरी निघून गेला.


पण हे इतक्यात काही संपणार नव्हते हे कधी मला जाणवलेच नाही. त्यादिवसापासून त्याच्या वागण्यात मला फारसा बदल जाणवू लागला , त्याचे बोलणे , त्याचे वागणे हे अगदी विचित्र वाटू लागले. उद्धटपणा , कामचुकारपणा , अनादर व असे बरेच काही गोष्टी तो सतत करत असे आणि आम्ही बोललो की त्याला वाईट वाटे. त्याच्या वागण्याने आई देखील आता संतापली होती व मला नेहमी बोलायची की तू लांब राहा त्याच्यापासून पण मी ऐकणं सोडा हो त्यागोष्टीकडे मी अजिबात लक्ष दिले नाही . ज्याप्रमाणे जसा तो आधी माझी समजूत काढायचा , मला नेहमी चांगल्या गोष्टी पटवून द्यायचा, तशी हुशारी त्याच्यात राहिलीच नव्हती. अगदी विचित्रपणे स्वतःभोवतीच तो हरवलेला दिसायचा, आम्ही दोघे भेटून सुद्धा न भेटल्यासारखेच होतो. ह्या सर्व गोष्टी पाहता मी देखील काही दिवस त्यासोबत राहण्यास वर्ज्य केले. जेमतेम महिनाभर आम्ही एकमेकांशी बोलो नव्हतो. आमच्यात कोणतेही संवाद झाले नव्हते. मला नेहमी प्रमाणे वाटत होते की पुन्हा त्या त्या गोष्टी कुरवाळत बसला असणार किंवा स्वतःच्या विश्वातच फिरत असणार. मी पुन्हा आपल्या कार्यक्रमानिमित्त बाहेर होतो व आई-बाबा ही आमच्या नातेवाईकांच्या लग्नानिमित्त बाहेर होते.


आईने मला त्यानिमित्त संपर्क केलाच होता , व ती बोली की घराची दुसरी चावी ही खालच्यांकडे दिली आहे. तू आलास की तिकडन घे असे बोलून तिने फोन ठेऊन दिला. कार्यक्रम संपताच मी घराकडे जाण्यास घराकडे जाण्यास निघालो पण तेवढ्यातच माझ्या मित्राचा फोन आला व अगदी विचित्रपणे माझी चौकशी करत होता , तू कुठे आहेस ? तुला घरी येण्यास किती वेळ लागेल? असे तसे वरचेवर प्रश्न मला विचारत होता. पण मला थोडा संशय हा आलाच होता पण त्याने मला स्वतःहून संपर्क करुन माझी विचारपूस केली ह्याचा मला आनंद होता , मनात विचार केला की त्याला उद्या भेटतो मी. पण त्याला ही चांगली बातमी सांगण्या अगोदरच त्याचा आणि माझा संपर्क तुटला व मी पुन्हा प्रयत्न केले असता त्याचा फोन हा बंद येत होता , मी नंतर प्रयत्न करतो ह्या भावनेने मी तिकडन घरी जाण्यास पुन्हा सुरवात केली व ज्याक्षणी मी घरी पोहचलो तेव्हा घराची अवस्था ही अतिशय बिकट वाटत होती.


आमच्या घरातलं सामान हे अस्ताव्यस्त व अगदी विचित्रपणे विखुरलेले होते . मी त्वरित क्षणांचाही विलंब न करता माझ्या आई-वडिलांना ह्यासर्व प्रकरणाबद्दल सांगितले तर ते सर्व हकीकत ऐकताच भयभीत झाले व त्या ठिकाणाहून घरी येण्यास निघाले. घरी आल्यावर बघताच क्षणी सर्व एकदम अचंबित होऊन बघू लागले कारण हे सर्व इतके लवकर झाले की कोणाला काहीच समजले नाही. आम्ही आमच्या येथील स्थानिक पोलिसांना ह्या प्रकरणाबद्दल माहिती दिली व त्यांनी त्यांचे प्रयत्न करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी आमच्या शेजाऱ्यांचीसुद्धा विचारपूस केली पण त्याचं म्हणणं ही एकच होत की त्यांच्या घरातून कोणताही तोडण्याचा अथवा पाडण्याचा कोणताही आवाज नाही आला. सलग दोन आठवडे विचारपूस केली असता , पोलिसांनी आम्हाला स्थानिक पोलीस ठाण्यात बोलावले व त्याठिकाणी जे घडले ते अतिशय वेदनादायक व विश्वास ठेवण्याजोगे होते कारण पोलिसांनी ज्या इसमाला संशयात ताब्यात घेतले होते तो दुसरा कोणी नाही तर माझाच मित्र होता.


आमच्या दोघांच्या त्यावर विश्वासच बसला नव्हता , पोलिसांचं असं म्हणणं होतं की त्याने त्याचा गुन्हा हा मान्य केला आहे व त्याने हे सगळं त्याच्या स्वार्थ्यासाठी केले आहे व तुम्ही ज्यांच्याकडे चावी दिली होती त्यांना तुमच्या मुलाचं नाव सांगून, तुमच्या मुलाने त्याला संपर्क केला होता असे दाखवून त्याने त्यांचा विश्वास जिंकून त्यांनी चावी त्याला दिली. व त्याने एकदम शांतपणे हे सर्व कृत्य केले व चावी त्यांना परत देऊन तिकडन निघून गेला . ह्यासर्व पुराव्यांच्या आधारे आम्ही त्याला पकडले व तुम्हाला इथे येण्यास सांगितले. हे सर्व अगदी मनास न पटणारे होते. त्याला तिकडन घेऊन गेले व आम्हाला त्यासर्व गोष्टी मिळाल्या ज्या त्याने चोरी केल्या होत्या व त्यादिवसापासून ते आतापर्यंत मी कोणावरही एवढा दृढ विश्वास ठेवला नाही व हा प्रसंग जेवढ्या लवकरात लवकर विसरता येईल तेवढे चांगलं हे नेहमी लक्षात ठेवल . 


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama