SHUBHAM KESARKAR

Comedy

2  

SHUBHAM KESARKAR

Comedy

अशी ही बनवाबनवी

अशी ही बनवाबनवी

1 min
188


धनंजय माने , सुधा , पार्वती आणि शांतानू जेव्हा घराच्या शोधात लिलाबाई काळभोर ह्यांच्या घरी जातात तेव्हा त्यांचे जे नियम असतात त्यांच्या नियमांच्या विरोधात जाऊन सुधीर आणि परशुराम बाईच्या वेशात येऊन त्याघरी राहतात पण त्याऐवजी जर त्यांनी आपल्या गरजा लिलाबाई काळभोर ह्यांना सांगितले असते तर एवढी खटाटोप करण्याची गरज नव्हती पण त्यानी स्त्रिवेशात येऊन , आपली काम सांभाळून त्यांनी हे स्त्री पात्र अगदी योग्य रीतीने पार पाडले , आणि त्यांच्यावर पाळत ठेवणारी बळी काळभोर ह्याची बहीण तनु. चित्रपटामध्ये सरळ सरळ दाखवण्यात आले की ती ह्या सगळ्यांवर पाळत ठेवत आहे त्याचवेळी ह्या सगळ्यांपैकी जर एकाने त्या तनु वर लक्ष ठेऊन लिलाबाई काळभोर हिला तिच्या सत्यतेची जाणीव करून दिली असती तर बळीला ते घर हिसकवण्याची संधीच मिळाली नसती. सुधीर मनीषाला भेटायला जेव्हा त्या बाथरूम मधून उडी मारतो तेव्हा तनु तिथेच उभी असते पण तिला त्याचठिकानी उभी न राहता सुधीरचा पाठलाग करून तो जेव्हा मनिषाला भेटतो तेव्हा ती सत्यता ती लिलाबाई काळभोर हिला सांगू शकली असती आणि त्यांना ही सत्यात अगोदरच समजली असती आणि सर्व काही बाहेर आल असत.


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy