कू.शुभम संतोष केसरकर

Tragedy

3  

कू.शुभम संतोष केसरकर

Tragedy

कोरोनाचे सावट !!

कोरोनाचे सावट !!

5 mins
12.1K


संपूर्ण जगभरात घातलेल्या कोरोनाच्या ह्या थैमानात आपण आपलेच रक्षण करणे हे अतिशय महत्वाचे आहे. ह्या संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी संयम व धीर धरणे अतिशय महत्वाचे आहे , तरीही आपल्यातील काही असे आहेत की त्यांना अजून ह्या गोष्टीचे गांभीर्य कळलेले नाही त्याबद्द्ल सरकार देखील त्याबद्दल ठोस पावलं उचलत आहेत व आपणही त्यात सहकुटुंब एकत्र येऊ व घरातच बसू त्याने हा संसर्ग वाढणार नाही व त्याचे प्रमाण कमी होऊन तो नाहीसा होईल , हे सर्व माहीत असताना सुद्धा त्यात काही असे माणस आहेत की ते घरातल्या घरात काही विचित्र अफवाना प्रतिसाद देऊन गरजेच्या वस्तूस सुद्धा संसर्ग आहे ह्याबद्दल चुकीचं माहिती पोहचवत आहे , त्यातील एक गोष्ट ह्यात मला सांगावीशी वाटते की, ह्याबद्दल एक उदाहरण देतो .


कोरोना मुळे संपूर्ण देश हा अतिशय भयभीत होऊन घरीच बसून आहे , त्यात काही विचित्र संदेशाद्वारे लोकांनी आता जेवणावरही बंधन आणले आहेत . मी ते खाल्यावर मला संसर्ग होईल किंवा माझ्या शरीरात त्या विषाणूचा शिरकाव होईल. लोकांमध्ये पसरणाऱ्या ह्या अंधविश्वासात आता खूप जन बळी पडू लागले आहेत , व दुसरीकडे लोकांची अन्ननाविना दशा होणे , लोक अक्षरशः बाहेर जाऊ लागले आहेत ते सुद्धा पायी आपल्या मूळ गावी त्यात सर्वात जास्त हाल होय आहेत ते म्हणजे मजुरांचे किंवा त्यात समाविष्ट अशी लोक की ज्यांचे जीवन हे त्यांच्या रोजच्या कमाई वर अवलंबून आहे , तरीही आपल्यातील काही जागृक नागरिकांमुळे त्यांच्या खाण्याची सोया ही होत आहे. महाराष्ट्र व भारत सरकार ह्या संपूर्ण कोरोनाचे विल्हेवाट लावण्यास तत्पर आहे फक्त त्यांना आपल्या सहकार्याची गरज आहे व ती आपण द्यायला हवी .


एका कुटुंबाची गोष्ट आज तुमच्यासमोर मांडतो , त्याकुटुंबात चार जण , व चौघही कोरोनाच्या भीतीने आपल्या घरातच आहेत . वडिलांचे संपूर्ण लक्ष हे बातम्या व चालू घडामोडी वर स्थिरावले होते , आई ही घरकामात मग्न होती , मुलांचं तुम्हाला माहीतच असेल त्यांची मजा अजून काय……!! वडिलांचा स्वभाव हा अतिशय चिंताजनक , कुठेही काही झाले तरी त्यांना भीती वाटत व स्वतःबरोबर ते दुसऱ्यांना त्याचप्रमाणे घाबरवत असे , आमच्यावर तर त्यांनी सर्वप्रकारचे बंधनच लादले होते व ते ही अतिशय कडक , आम्ही फक्त दार ओलांडल तरीही त्यांना राग येत असे व बाहेरून जर आम्ही घरी आलो तर इथे तिथे न बसता लगेच हाथ-पाय धुण्यास सांगत लगेच स्वछताकक्षेत पाठवत . आईचा स्वभाव म्हणजे वडील काही बोले की त्यांच्या पाठी बोलणे व आम्हाला ओरडणे , पण आम्ही काही ऐकण्यातले नव्हतो , त्यांनी सांगितलेल्या कुठच्याही गोष्टीचा विचार आम्ही गांभीर्याने घेतला नाही , त्यादिवशीही तसेच झाले , मी त्यांना न सांगता की कुठे जातोय मी त्वरीत घराबाहेर पडलो आणि काही तासानंतर मी घरी परत आलो , घरी आल्यानंतर मी काहीच Precaution घेतले नाही , साधारणतः ३-४ दिवसानंतर मला ताप , खोखला , सर्दी व घसा दुकण्यास सुरवात झाली , आधी मला वाटले की सर्व Viral आहे , त्यामुळे मी तिथेही दुर्लक्ष केले , माझ्या शरीरात काही तरी विचित्र घडत आहे ह्याची अनुभूती मला येणाऱ्या दिवसात जाणवत होते , तरीही मी हे सर्व दुर्लक्ष केले ,


माझ्या छातीत आता विचित्र वेदना होत होत्या व मला श्वास सुद्धा घेण्यात अडथळा निर्माण होत होता , वेदना व ताण हा अतिउच्च प्रमाणत वाढत होता , माझ्या वडिलांना समजले होते की मला Covid-१९ हा भयानक रोगाने घेरले आहे , त्यांनी लगेच मला वेगळे केले व तिघंही हे एका बाजूला जाऊन उभे राहिले व त्यांनी त्वरित Covid-19 Helpline क्रमांकावर संपर्क करून ह्याची माहिती दिली व त्यांना त्वरित येण्यास सांगितले. त्यात माझ्या कुटुंबाचा एक निर्णय अतिशय उत्तम होता व मला झालेला संसर्ग हा दुसर्यास होऊ नये त्यासाठी त्यांनी लगेच उपाय योजना केल्या , संपूर्ण रुम त्यांनी Sanitize घेऊन घेतली व लगेच आपल्या चेहऱ्यास Mask ने झाकून घेतले . मला ताबडतोड हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले . माझ्या एका चुकीमुळे आज मला माझ्या कुटुंबापासून दूर करण्यात आले , त्यामुळे तुम्ही देखील घरी रहा, घराबाहेर पडू नका , कधी कुठे तुमच्यासोबत काय होईल हे कधीही सांगू शकत नाही , त्यामुळे घरीच रहा , उगाच आपली हुशारी दाखवू नका धन्यवाद . ह्या गोष्टी मध्ये तुम्हाला मी एवढंच सांगू शकतो की फक्त घरी बसा , आपली शासकीय यंत्रणा ही सतर्क आहेत फक्त तुमच्या मदतीची त्यांना गरज आहे. एवढं मी सगळं सांगितलं , पण तरीही खाली जाऊन बघितले तर लोक जणू असं वागत होते की जणू कोणतेही संकट हे आलेच नव्हते सर्व काही ठीक आहे, अशीच एक घटना आमच्या कॉलॉनीत घडली .


घरातील धान्य संपल्यामुळे ते आणण्यासाठी त्यांचा मुलगा हा त्याच्यासोबत Lockdown च्या वेळी घरातुन बाहेर जातो , बाबा नाही बोले तरी तो त्यांच्याकडे हट्ट करतो , बाबांना तो सोडतही नाही , सगळे त्याला समजून सांगत आहे पण तो काही ऐकत नाही , शेवटी तो बाबांसोबत गेलाच , थोड्यावेळाने ते दोघेही परत आले , पण राहुल च्या चेहऱ्यावर मला विचित्र एका वेगळ्याच गोष्टीची चाहूल लागली , तो अगदी गप्प राहत होता , आम्ही सगळे बोलतोय पण त्याचे काही त्यात लक्ष नाही व नाही तो आम्हाला प्रतिउत्तर करत होता , ह्याला नक्की झाले तरी काय , ह्या विचारात आम्ही गुंतलो होतो , मी विचारते आहे , त्याचे वडील त्यास विचारत आहेत पण तो काही सांगण्यास तयार नव्हता . त्याचे गप्प राहणे हे कोणत्यातरी प्रश्नास उभारी देणारे होते , पण काही वेळाने तो स्वतःहून आमच्याकडे आला व त्याने आम्हाला सांगितले की आई , बाबा मला नेहमी सांगत असतात की खाली जाऊ नको , तुझ्यात आणि अन्य व्यक्तीमध्ये किमान एक फूट अंतर ठेव , कोणाबरोबर निकटचा संबंध ठेऊ नकोस आणि कोणालाही सध्यातरी स्वतःजवळ येऊ देऊ नकोस , मी हे सगळं पाळतो पण जेव्हा मी खाली गेलो तर तिथे काही वेगळच चालू होतं , माणसं खाली गर्दी करत होती , त्यांच्यात एक मीटर सोड एक फूटसुध्दा अंतर नव्हते , लोक अगदी एकमेकांसोबत हाथ मिळवत होते , एकमेकांच्या सानिध्यात येत होते , मग त्यांना बाबांनी सांगितलेले नियम लागू होत नाही का आई-बाबा , मला सांगा बाबा…………!! तुम्हीच बोलतात ना की सरकार आपल्या भल्यासाठी हे सगळं करत आहे मग आपणही ही शिस्त पाळावी , मग अजूनही माणस खाली का फिरत आहेत , एकमेकांजवळ का येत आहे ……?? कोरोना हा आजार संसर्गाने होत आहे असेच सांगितले होते ना तुम्ही बाबा , मग सांगा ना का अस होत आहे………….( बाबा - आई अगदी आश्चर्याने एकमेकांकडे बघत होते ) .

-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy