STORYMIRROR

कू.शुभम संतोष केसरकर

Children Stories

4.2  

कू.शुभम संतोष केसरकर

Children Stories

आई ( छोटी कथा ) !!

आई ( छोटी कथा ) !!

3 mins
24.1K


मायेची जाण तिला , स्वकीयांचा मान तिला , खंबीरतेची जाण तिला , ती माझी आई आहे , अरे काय लिहित आहेस किशोर ?? 


किशोर :- का रे तुला माहीत नाही का ??


जय :- काय रे ??


किशोर :- अरे उद्या मातृदिन आहे . आपल्या सर्वांची काळजी करणाऱ्या आपल्या आईचा .


जय :- अरे हो का , अरे हे तर मला माहीतच नव्हतं , तू बर झालं मला सांगितलंस , अरे किशोर ऐक ना तू उद्या काय देणार आहेस आईला ?? म्हणजे काय द्यायचा विचार आहे तुझा ??


किशोर :- मी का सांगू , मी माझ्या आईला एक विशेष गोष्ट देणार आहे , त्याने ती एकदम खुश होईल .


जय :- सांग ना रे किशोर काय देणार आहेस ते , म्हणजे मी पण तसच करण्याचा प्रयत्न करेन ना.


किशोर :- बघ मी ते तर तुला सांगू नाही शकत पण ते तुलाच शोधावं लागेल , कारण तुझ्याकडून मिळालेली विशेष गोष्ट ही तुझ्या आईला नक्की आवडेल बघ .


जय :- किशोर बोल ना रे 


किशोर :- नाही ( आणि किशोर तेथून आपल्या घरी निघून जातो )


आता जय ला प्रश्न पडला आहे की मी आता माझ्या आईला काय देऊ , विचार करत करत तो आपल्या घरी आला , आईला कळू नये म्हणून त्याने वेगळ्याच पद्धतीने स्वतःच्या आईकडून तिला काय आवडते ते सर्व तो जाणण्याचा प्रयत्न करत होता , पण त्याची आई त्याला नेहमी म्हणायची की तुमच्या सुखताच माझे सुख आहे , त्याहूनि मला काही नको. जय पुन्हा विचारात पडला , संपूर्ण दिवस त्याने विचारातच व्यतीत केला तरीही त्याला काहीच सुचले नाही . 

मन विचारात गुंतले होते , सुचण्यास काही पर्याय ही उरत नव्हता.


दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून ,&n

bsp;घरातील बहुतांश काम त्याने केली , का तर माझ्या आईला कोणतेही त्रास होऊ नये , आजच्या दिवशी तरी ती थकु नये ह्याचा पुरेपूर विचार तो करत होता. जयची आई सकाळी उठताच तिने पाहिले की , जय घरातील सर्व काम करत होता , तेव्हा ती काही बोली नाही , कारण हे चित्र त्याची आई पहिल्यांदाच पाहत होती , जय सर्व काही काम करत होता पण त्यादिवशी तो आईला काही विशेष गोष्ट देऊ शकला नाही , ह्याची जाणीव त्याला होत होती , तो आई जवळ गेला व तिला सांगितले


जय :- आई मला माफ कर .


आई :- अरे काय झालं , अस माफी का मागत आहेस ??


जय :- आई , आज मातृदिन , आणि ह्यादिवशी मी तुला काहीच देऊ शकलो नाही , ह्याचा खूप राग येतोय.


आई:- अस बोलत आहेस , एवढं सगळं तर दिलंस??


जय :- काय कुठे दिल मी , तू खोट नको बोलूस .


आई :- हो का , मी खोट बोलतेय , मग सकाळी उठुन माझी सर्व काम कोण करत होत .


जय :- तू तर झोपली होतीस ना , तू कधी पाहिलस ??


आई :- हे बघ जय , तुझं जरी लक्ष नसलं ना तरीही माझं लक्ष हे नेहमी तुझ्यावर आहे , आज मातृदिन आहे , त्याबद्दल विशेष गोष्ट मला तू दिली आहेस , आणि ते पाहून मी खूप आनंदी आहे.


जय :- म्हणजे ??


आई :- तू तुझ्या आईबद्दल विचार केलास , तिच्या कार्याला तू ओळखलं , त्याहूनि तू पूर्ण दिवस फक्त माझा विचार करत होतास , त्याहूनि काय हवं असतं आईला , आणि तू माझ्यासाठी काही तरी करण्याचा प्रयत्न केलास एवढं पुष्कळ आहे माझ्यासाठी .


दोघांनीही तो दिवस अगदी आनंदात साजरा केला व त्यानंतर आई व मुलांमधील नात , अत्यंत घट्ट व अतूट झाले.



Rate this content
Log in