SHUBHAM KESARKAR

Children Stories

3  

SHUBHAM KESARKAR

Children Stories

सूर्यप्रकाश

सूर्यप्रकाश

2 mins
317


सकाळी उठण्याचा नादात आज पुन्हा अक्षताला एवढी गाढ झोपली लागली की ती सूर्यप्रकाश होण्याच्या आधी उठुच शकली नाही आणि पुन्हा शाळेत उशिरा गेली.आता हे मधेच कस असा तुम्हाला प्रश्न पडला असेल पण हे काही मध्ये वैगरे नाही तर त्याच अस झालं की पहिली ते चौथी दुपारची शाळा असल्या कारणाने तिला उशीर उठण्याची सवय लागली होती आणि आता चौथीतून पाचवीत आल्यानंतर आता सूर्योदय अगोदर उठाव लागेल असे तिला समजले होते.आईने अक्षताला आधीच बजावून ठेवलं होतं आता उशिरा पर्यन्त झोपण्याची काहीच गरज नाही कारण आता शाळा ही सकाळची आहे आणि तुला सूर्योदय अगोदर उठावच लागणार. चौथीची परीक्षा पूर्ण झाली आणि निकाल लागून उन्हाळ्याची सुट्टी सुद्धा संपली आणि आता पुढच्या दोन दिवसात शाळेत लवकर उठाव लागणार. एकतर तिला आधीपासून सवय ही उशिरा उठण्याची आणि जर सकाळी उठण्याची जर वेळ आली तर उठण्या अगोदर तयारी कशी करणार आणि झोपेत शाळेपर्यंत जाणार कस, अक्षताच्या मनात हा संभ्रम होताच. शाळा सुरू होण्याचा पहिला दिवस आणि त्याच दिवशी शाळेला दांडी त्यानंतर काही दिवस उशिरा जाणे चालुच होते. अक्षताच्या आईने मग एक शक्कल लढवली आणि तिला एका परीची आणि सूर्याची गोष्ट सांगितली आणि एका चित्रफीतद्वारे परी आणि सुरप्रकाशाची असलेली घट्ट मैत्री दाखवली आणि तीच परी तू आहेस आणि त्या परीप्रमाणे तुला देखील त्या कोवळ्या आणि लख्ख सूर्यप्रकाशाची मैत्री करावी लागेल असे म्हणत अक्षताला आईचे म्हणणे पटले आणि थोडयाच दिवसांनी सूर्यप्रकाशाच्या सोबतीने अक्षता वेळेवर शाळेत जायला लागली आणि आनंदाने सगळ्या गोष्टी आपल्या आईच्या सांगण्यावरून करायला लागली.


Rate this content
Log in